Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा

तुमच्या नावावरील मोबाइल क्रमांक वापरून मुंबईत बँक खाते उघडले असून त्यातून दहशतवादी कारवायांना निधी दिला जात आहे, असे सांगत ७५ वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 03, 2026 | 11:56 AM
डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्...; महिलेला ३ कोटींना घातला गंडा

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्...; महिलेला ३ कोटींना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : तुमच्या नावावरील मोबाइल क्रमांक वापरून मुंबईत बँक खाते उघडले असून त्यातून दहशतवादी कारवायांना निधी दिला जात आहे, असे सांगत ७५ वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांचा गणवेश, मागे तिरंगा आणि पोलिसांचा झेंडा दाखवत क्राईम बँचचा धाक निर्माण केला. आरबीआयकडून खात्यांची तपासणी सुरू असल्याचे सांगून मुलाला अटक करण्याची तसेच कुटुंबाला इजा करण्याची धमकी देत १४ दिवसांत पाच बँक खात्यांतून आरटीजीएसद्वारे ३ कोटी ८० हजार रुपये वळवून घेतले. ही घटना १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान व्यंकटेशनगरात घडली आहे.

 

याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर एका क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने आपण नाशिक क्राईम ब्रँचमधून बोलत असून नाव राजन भिसे असल्याचे सांगितले. तुमच्या नावाचा मोबाइल क्रमांक कोणीतरी वापरत असून त्याद्वारे मुंबईतील कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले आहे. त्या खात्यातून दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवण्यात आला आहे, असे सांगून त्याने वृद्धेला घाबरवले. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने संबंधित खातेदाराला दोन कोटी रुपये मिळाले असून त्यातील कमिशनचे दोन लाख रुपये तुमच्या खात्यावर आल्याचे सांगितले. सर्व बँक खात्यांची माहिती आरबीआयकडून तपासली जाणार आहे. सहकार्य केले नाही तर अटक होईल; मुलालाही अटक केली जाईल, अशी भीती घातली. वृद्धेनी सांगतील तसे केले. वृद्धेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

खाकीचा बनाव अन् मागे तिरंगा ध्वज

संशयितांनी व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ कॉल केला. समोरील व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात बसलेली होती. मागे तिरंगा आणि निळ्या रंगाचा पोलिसांचा झेंडा दिसत होता. त्यामुळे फोन करणारे खरोखरच पोलिस अधिकारी असल्याचा विश्वास वृद्धेला बसला. त्यानंतर १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान दररोज सकाळी, दुपारी आणि सायंकाळी त्यांना फोन केले जात होते.

असा झाला व्यवहार 

२३ सप्टेंबर: देवगिरी नागरी सहकारी बँकेतून ६२ लाख रुपये

२८ सप्टेंबर : सेंट्रल बैंक ऑफ इंडियातून ८९ लाख रुपये

२९ सप्टेंबर : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून ५४ लाख रुपये

१ ऑक्टोबर : एचडीएफसी बँकेतून ५५ लाख रुपये

१ ऑक्टोबर: एसबीआयच्या खात्यातून ४० लाख ८० हजार रुपये

एकूण : ३ कोटी ८० हजार रुपये.

एफडीचीही माहिती घेतली वृद्धेकडून २१ सप्टेंबर रोजी संशयितांनी कुलकर्णी यांच्याकडील सर्व बँक व्यवहारांची माहिती घेतली. एफडी असल्याचे सांगत तिचीही खातरजमा केली. आरबीआयकडून तपास होणार असल्याचे सांगत आणि कुणाला काही सांगितल्यास कुटुंबाला इजा करण्याची धमकी दिली. वेगवेगळ्या बँक खात्यांतून सायबर भामट्यांनी सांगितलेल्या खात्यांवर आरटीजीएस करण्यास वृद्धेला भाग पाडले.

हे सुद्धा वाचा : बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…

मुलाला अटक करण्याची धमकी

महिला घरी एकट्याच राहतात. त्यांचा मुलगा जामनगर येथे रिलायन्स कंपनीत नोकरीला असून मुलगी अमेरिकेत राहते. तुमच्या मुलालाही अटक करू तसेच कुटुंबाला इजा करण्याची धमकी देत सायबर भामट्यांनी त्यांना धमक्या दिल्या

Web Title: An incident has occurred where a woman was defrauded by cyber fraudsters nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Fraud Case

संबंधित बातम्या

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…
1

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
2

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
3

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
4

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.