Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…

रात्री घरातून अचानक बेपत्ता झालेला १७ वर्षीय मुलगा दोन दिवसांनी नदीपात्रात मृतावस्थेत सापडला. तपासात पत्नीशी बोलण्याच्या संशयातून त्याला बर्निंग घाटात नेऊन मारहाण आणि त्यानंतर पाठलाग केल्याचे समोर आले; मात्र तो नदीत पडला की त्याचा घातपात झाला, हे अद्याप गूढच आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 01, 2026 | 02:18 PM
Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्...

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्...

Follow Us
Follow Us:
  • पत्नीशी बोलण्याच्या संशयातून मुलाला पळवले
  • बर्निंग घाटात मारहाण; दोन दिवसांनी नदीत मृतदेह
  • नदीत पडला की घातपात? चौघांना अटक
 

पुणे : ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’ असा संशय घेत १७ वर्षीय मुलाला पळवून नेऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. बंडगार्डन बंधाऱ्याजवळील बर्निंग घाट परिसरात मुलाला मारहाण केल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर दोन दिवसांनी चंदननगर परिसरातील नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलगा पळताना नदीत पडला की त्याच्यासोबत घातपात झाला, याचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

हेही वाचा: ट्रिपल सीट जाताना पोलिसांनी अडवले अन् भांडाफोड; मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी चोरल्या तीन दुचाकी!

२६ सप्टेंबरला घरातून बेपत्ता

२६ सप्टेंबरच्या रात्री १७ वर्षीय मुलगा अचानक घरातून बेपत्ता झाला. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून मुलाला पळवून नेल्याची तक्रार त्याच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस आणि नातेवाईकांकडून त्याचा शोध सुरू होता. मात्र, २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चंदननगर परिसरातील नदीपात्रात मुलाचा मृतदेह आढळला.

पत्नीशी बोलण्याचा संशय; बर्निंग घाटात नेले

पोलिसांच्या तपासानुसार, मुख्य संशयित आकाश रेड्डी याला १७ वर्षीय मुलगा त्याची पत्नी स्वाती रेड्डी हिच्याशी बोलत असल्याचा संशय होता. याच कारणातून आकाश आणि त्याच्या साथीदारांनी मुलाला दुचाकीवरून बंडगार्डन बंधाऱ्याजवळील बर्निंग घाट परिसरात नेल्याचा आरोप आहे. तेथे आकाशने मुलाला मारहाण करून धमकावल्याचे तपासात समोर आले आहे. घाबरलेला मुलगा जीव वाचवण्यासाठी तेथून पळू लागला. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: Crime News: ‘मंत्रजपाने आजार बरा करते’ म्हणत घरात शिरली; ओढणी उघडताच ७० वर्षीय आजीला बसला मोठा धक्का!

नदीत पडला की घातपात? गूढ कायम

पाठलागादरम्यान मुलगा नदीपात्रात पडला की त्याला ढकलण्यात आले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मुलाच्या आईच्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिसांनी पती-पत्नीसह सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

चौघांना अटक

या प्रकरणात आकाश रेड्डी, स्वाती रेड्डी, गौरव शिंदे आणि आशिष चाबुकस्वार यांना अटक करण्यात आली आहे. आनंद रेड्डी आणि सूरज उर्फ चन्या मोरे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण आणि तो नदीपात्रात कसा पोहोचला, याचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

 

Web Title: Pune 17 year old boy death wife suspicion burning ghat bundgarden sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • crime news
  • crime news in marathi
  • Death
  • Death Case
  • pune crime news

संबंधित बातम्या

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
3

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले
4

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.