औरंगाबाद : नेहमी कोणत्या कोणत्या ना चर्चेत राहणाऱ्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) पुन्हा एकदा आपल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना अब्दुल सत्तार यांची घसरली. त्यांनी सुप्रिया सुळेंबाबत (Supriya Sule) बोलताना गलिच्छ भाषेत टीका केल्यााचा प्रकार उघडकीस आला आहे.
[read_also content=”डोक्यात पाणी साठण्याची कारणे आणि त्यावरील उपचार काय करावे; जाणून घ्या https://www.navarashtra.com/latest-news/causes-of-water-retention-in-the-head-and-what-to-do-about-it-find-out-nrrd-342536.html”]
औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी सुप्रिया सुळेंबाबत अपशब्द वापरले. सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.
So the mysoginistic leaders continue their tirade against Supriya and by default all women, who stand up to their macho behaviour and expose their character and abilities. (1/3) pic.twitter.com/zIBWhVFsNu
— sadanandsule (@sadanandsule) November 7, 2022