Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जाणवली तरंदळे फाटा येथील उड्डाण पुलावरील दुभाजकाला आदळून कंटेनरचा अपघात !

गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा अपघा मुंबई गोवा महामार्गा झाला. हा कंटेनर जाणवली तरंदळे फाटा येथील उड्डाण पुलावरील दुभाजकाला आदळून महामार्गावर पलटी झाला.

  • By नारायण परब
Updated On: Oct 07, 2024 | 09:08 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

कणकवली(भगवान लोके): रत्नागरीहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली तरंदळे फाटा येथील उड्डाण पुलावरील दुभाजकाला आदळून महामार्गावर पलटी झाला. यात कंटेनर चालक सिद्दिकी (रा. कर्नाटक) याला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच नागरिक, कणकवली पोलीस, वाहतूक पोलीस व महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. हा अपघात सोमवारी दुपारी ३.४५ वा.च्या सुमारास झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

हे देखील वाचा- बेंचेस घोटाळ्यातील ठेकेदार नितेश राणेंच्या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप

महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली

कंटेनर चालक सिद्दिकी हा कर्नाटक येथून मासे घेऊन रत्नागिरी येथे गेला होता. तेथे कंटेनर खाली करून परत रत्नागिरीहून कर्नाटकच्या दिशेने जात होता. त्यादरम्यान कंटेनर जाणवली तरंदळे फाटा नजीक आला असता असता स्टेरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजकाला आदळला. त्यानंतर येथील संरक्षण कठड्यावर चढून महामार्गावर पलटी झाला. यामुळे महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात कंटेनरच्या डिझेल टाकी महामार्गावर पडल्याने सर्वत्र डिझेल पडले होते. तसेच कंटेनरच्या समोरील दोन्ही चाक महामार्गावरच तुटून पडली होती.

हे देखील वाचा- कोकणात राणेंच्या रुपाने सुरू असलेली घराणेशाही मतदारांनी हाणून पाडण्याची गरज- परशुराम उपरकर

नागरिकांनी केली कंटनेर चालकाला मदत

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी कंटेनर चालक सिद्दिकी याला खाजगी वाहनाने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. चालक सिद्दिकी याला डोक्याला उजव्या हाताला व पायाला दुखापती झाल्या आहेत. यानंतर या अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, पोलीस हवालदार दिगंबर घाडीगावकर, महिला पोलीस विनया सावंत, हवालदार विनोद चव्हाण तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संदेश आबिटकर, महामार्ग वाहतूक पोलीस नितीन चोडणकर, महादेव साबळे, श्री. घाडी, श्री.मुंबरकर आदी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Web Title: Accident of a container hitting the divider on the flyover at janwali tarandale fata at sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 09:08 PM

Topics:  

  • Kankavli
  • Road Accident

संबंधित बातम्या

कराड-ढेबेवाडी मार्गावर अपघात; कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा मृत्यू
1

कराड-ढेबेवाडी मार्गावर अपघात; कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा मृत्यू

कणकवली हादरली, दारूच्या नशेत संतापलेला मुलाने जन्मदात्या आईची केली हत्या, डोक्यात घातला कोयता आणि…
2

कणकवली हादरली, दारूच्या नशेत संतापलेला मुलाने जन्मदात्या आईची केली हत्या, डोक्यात घातला कोयता आणि…

कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर अपघात; भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक
3

कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर अपघात; भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक

डंपरखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; सकाळी कामावर जाताना काळाचा घाला
4

डंपरखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; सकाळी कामावर जाताना काळाचा घाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.