मदतीच्या अपेक्षेने येणारे लोक किंवा कार्यकर्ते यांची गोड बोलून दिशाभूल न करता ते स्पष्टपणे काम होणार की नाही हे सांगतात. “ अशक्य गोष्टीला नाही म्हणणे” ही त्यांची ख्यातीच आहे. तरीही त्यांच्या दालना बाहेर लोकांची प्रचंड गर्दी असते! खरेतर एवढे स्पष्ट बोलायला हिंमत लागते, कारण राजकारणात कोणालाच नाराज करून चालत नाही. पण लोकांच्या नाराजीपेक्षा अशक्य असलेल्या गोष्टी त्यांना समजावून सांगणे आणि त्यातून काही मार्ग काढता येईल का, हे पाहणे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. त्यांच्याइतका स्पष्टोक्ता माणूस मला राजकारणातच नव्हे तर इतरक्षेत्रातही माहित नाही. आजही एखादा प्रस्ताव त्यांच्यासमोर घेऊन गेलो की त्याचा अर्थमंत्री म्हणून सारासार विचार करून ते लगेच होकार किंवा नकार कळवतात. पण जर काम होणार असेल आणि बहुसंख्य जनतेच्या हिताचे असेल तर त्यासाठी ते शक्य तेवढा पाठपुरावा करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. अलीकडेच माझ्या कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागाने प्रतिवर्ष राज्यातील एक लाख युवकांना महाराष्ट्र राज्य ॲप्रेंटींशीप योजनेंतर्गत विद्यावेतन देण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. अजित दादांना हा प्रस्ताव खूपच आवडला आणि राज्यात आर्थिक तंगी असूनही त्यांनी टप्प्याटप्प्याने हा निर्णय लागू करण्यास मान्यता दिली.
“माणसाची खरी कसोटी ही चांगल्या क्षणांमध्ये लागत नाही, तर आव्हानात्मक काळात तो काय निर्णय घेतो यातून त्याची प्रतिभा दिसून येते” – अमेरिकेतील मानवीहक्क कार्यकर्ते मार्टिन ल्युथरकिंग ज्युनिअर यांचे हे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल लिहिताना आज मला विशेष आठवते. एखाद्या नेत्याने आव्हानात्मक काळामध्येच त्याचे नेतृत्वगुण दाखवून त्याच्या पक्षाला, त्याच्या समर्थकांना योग्य मार्गदर्शन करणे अपेक्षित असते. अजितदादा हे कायम आमच्यासाठी या मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये राहिले आहेत. ते पक्षाचा, आजच्या महाविकास आघाडी सरकारचा मोठा आधार आहेत आणि आम्हा सर्व सहकाऱ्यांचे नेते आहेत. प्रत्येक प्रसंगामध्ये ते पक्षाचे नेते म्हणून सरकारधील एक महत्त्वाचे मंत्री म्हणून आपली भूमिका निभावतात आणि सगळ्यांचा आधार बनतात.
मी राजकीय जीवनात असताना १९९० च्या दशकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरदचंद्र पवार यांच्याकडे आदर्श म्हणून पहात होतो. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आम्हा तरुणांच्या मनात नितांत आदर होता. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करण्याची इच्छा होती. ते राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि पुढे १९९० च्या सुमारास अजित पवार यांना पहिल्यांदा लोकसभेमध्ये पाठवले. तेव्हा त्यांचे नाव पहिल्यांदा ऐकले. शरद पवार यांचे पुतणे म्हणून आणि तरुणचे हरा म्हणून अजितदादांच्या प्रती आपसुकच एक उत्सुकता होती. तेही पवारसाहेबांप्रमाणे नेतृत्व कुशल असतील, याची खात्री होती. पण त्यांच्याशी लगेच प्रत्यक्ष संबंध तेव्हा आला नाही. मी 1996 मध्ये पोटनिवडणुकीत विधानसभेवर निवडून गेलो तेव्हा अजितदादा विधानसभा सदस्य होते आणि तिथे त्यांच्याशी पहिली भेट झाली. पहिल्या भेटीतच समोरच्या लाभारावून टाकेल, असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रासाठी काम करण्याची तळमळ होती. सामाजिक जाणिव होती. जनतेबद्दल प्रेम आणि प्रत्येक सहकाऱ्याबद्दल मग तो दुसऱ्या पक्षाचा का असेना एक आदर ते बाळगून असायचे. १९९९ साली जेव्हा मी पहिल्यांदा राज्यमंत्री बनलो तेव्हा अजित यांच्याशी माझा जवळचा संबंध आला आणि त्यांची कार्यपद्धती नीट पाहता आली. खूप काही त्यांच्याकडून शिकता आले. त्यानंतर सन २००१ साली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून अजित पवार यांच्याशी सातत्याने संपर्क येत गेला आणि आमचा संबंध घनिष्ट झाला. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आजही मी काम करत आहे.
इतकी वर्ष त्यांना विविध भूमिकांमध्ये पाहताना मला त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि स्पष्टवक्तेपणा हा कायम प्रभावित करून जातो. राज्य सरकारमध्ये त्यांनी विविध खाती हाताळली आहेत, पक्षाचे नेतृत्व ते करतात, विधानसभेमध्ये ते सरकारचे महत्त्वपूर्ण मंत्री आहेत आणि सर्वसामान्य जनतेसाठी सतत काम करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे. अविरत काम करणे, वेळेचे भान ठेवणे, लोकांना योग्य मार्गदर्शन करणे, कुशल प्रशासक, सरकारी यंत्रणेवर पकड, त्वरित आणि योग्य निर्णय घेण्याची अफाट क्षमता, गरीब-वंचितांसाठी सातत्याने राबणे हे त्यांच्या स्वभावाचा सहज भाग आहेत. मेहनत घेऊनही एखाद्यामध्ये एवढे गुण येणार नाहीत. मदतीच्या अपेक्षेने येणारे लोक किंवा कार्यकर्ते यांची गोड बोलून दिशाभूल न करता ते स्पष्टपणे काम होणार की नाही हे सांगतात. “ अशक्य गोष्टीला नाही म्हणणे” ही त्यांची ख्यातीच आहे. तरीही त्यांच्या दालनाबाहेर लोकांची प्रचंड गर्दी असते! खरेतर एवढे स्पष्ट बोलायला हिंमत लागते, कारण राजकारणात कोणालाच नाराज करून चालत नाही. पण लोकांच्या नाराजीपेक्षा अशक्य असलेल्या गोष्टी त्यांना समजावून सांगणे आणि त्यातून काही मार्ग काढता येईल का, हे पाहणे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. त्यांच्याइतका स्पष्टोक्ता माणूस मला राजकारणातच नव्हे, तर इतरक्षेत्रातही माहित नाही. आजही एखादा प्रस्ताव त्यांच्यासमोर घेऊन गेलो की त्याचा अर्थमंत्री म्हणून सारासार विचार करून ते लगेच होकार किंवा नकार कळवतात. पण जर काम होणार असेल आणि बहुसंख्य जनतेच्या हिताचे असेल तर त्यासाठी ते शक्य तेवढा पाठपुरावा करायलाही मागे पुढे पहात नाहीत. अलीकडेच माझ्या कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागाने प्रतिवर्ष राज्यातील एक लाख युवकांना महाराष्ट्र राज्य ॲप्रेंटींशीप योजनेंतर्गत विद्यावेतन देण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. अजित दादांना हा प्रस्ताव खूपच आवडला आणि राज्यात आर्थिक तंगी असूनही त्यांनी टप्प्याटप्प्याने हा निर्णय लागू करण्यास मान्यता दिली.
मंत्रिमंडळामध्येही ते कायम त्यांच्या नावाप्रमाणे मोठ्या भावाची भूमिका निभावतात. एखाद्या मंत्र्याची काही चूक असेल तर त्याला समजावून सांगतात. योग्य मार्गदर्शन करतात. तरुण मंत्र्यांच्या कामाकडे त्यांचे विशेष लक्ष असते. विभाग कोणताही असो, अजितदादांना त्यातील बारकावे, अडचणी, प्राधान्यक्रम माहित नाही, असे होतच नाही. दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्यालाही मार्गदर्शन करायला, त्यांच्याशी चर्चा करायला ते भेदभाव करत नाहीत. एखाद्या विषयाबद्दल इत्यंभूत माहिती घेणे, अभ्यास करणे, अधिकाऱ्यांशी चर्चा करणे, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेणे यामुळे ते वेगळे ठरतात. पक्षातील मोठ्या नेत्यांपासून ते लहान कार्यकर्त्यांपर्यंत ते प्रत्येकाशी संपर्क ठेवतात. सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत ते झपाटल्याप्रमाणे काम करतात.
सुडाचे राजकारण कधीच नाही
प्रत्येक राजकारण्याच्या आयुष्यामध्ये चढउतार येतात. कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. पण त्यावेळी डगमगून न जाता, टिकेची पर्वा न करता आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची हिंमत त्यांनी अनेकदा दाखवली आहे. प्रसंगी कटू निर्णयही घेतले आहेत. पण स्पष्टवक्ते असले तरी सूडाचे राजकारण त्यांनी कधी केले नाही त्यावर त्यांचा विश्वास नाही. ते ज्या पक्ष शिस्तीची अपेक्षा इतरांकडून करतात ती आधी स्वतः पूर्ण करतात. स्वच्छता, नीटनेटकेपणा हे सुद्धा त्यांच्या स्वभावाचे पैलू आहेत. जे त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यातूनच ते इतरांसाठी आदर्श घालून देतात. त्यामुळेच त्यांच्या प्रती आदर आणि दरारा अशा दोन्ही भावना कार्यकर्त्यांमध्ये आहेत.
नेतृत्व गुणांमध्ये अजितदादांची भाषण शैलीही विशेष वाखाणण्याजोगी आहे. निवडणुकीची सभा असो किंवा पक्ष कार्यकर्त्यांना करायचे मार्गदर्शन असो, ते उत्कृष्ट वक्ते आहेत. अगदी विधानसभेत केलेली त्यांची किती तरी भाषणेही पुन्हा पुन्हा ऐकावी अशीच आहेत. विरोधकांना कोपरखळी मारणे, कधी गंभीर होणे तर कधी श्रोत्यांमध्ये हास्याचे फवारे उडवणे हे त्यांना सहज जमते. एखाद्या प्रस्तावावर उत्तर देताना तर ते इतके बारीक-सारीक तपशील पुढे आणतात, की विरोधकांना बोलायला काहीही जागा राहत नाही. विधानसभा असो की निवडणुकीचा आखाडा, त्यांचे भाषण ऐकणाऱ्या श्रोत्यांना आपला मुद्दा पटवून सांगितल्या शिवाय ते रहात नाहीत.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून ते उपमुख्यमंत्री पदासह अर्थखाते सांभाळत आहेत. पण जवळजवळ दीड वर्ष कोविडमुळे जागतिक अर्थव्यवस्थाच कोलमडून गेली आहे. अशावेळी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी फारच मोठी भूमिका निभावली आहे. आरोग्य व्यवस्थेसाठी राज्याच्या तिजोरीवर असलेला आर्थिक ताण, कोविडमुळे बदललेल्या गरजा, आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी तातडीने घ्यावयाचे निर्णय, त्याचवेळी सुरू असलेल्या विकास कामांसाठी लागणारा निधी, कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे याबद्दल कठोर निर्णय, अनेक खर्चांना लावलेली कात्री, केंद्र सरकारकडे सातत्याने निधीसाठी केलेला पाठपुरावा हा वाखाणण्याजोगा आहे. निधीची कमतरता, महसूल तूट असूनही त्यांनी राज्याची आर्थिक घडी टिकविण्यासाठी तारेवरची कसरत केली आहे. अशी दूरदृष्टी असलेला नेताच महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये हातभार लावू शकतो आणि विकासाला दिशा देऊ शकतो.
आपला,
नवाब मलिक
मंत्री, रोजगार आणि कौशल्यविकास, महाराष्ट्र राज्य