Photo Credit : Social Media
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या कुस्ती स्पर्धेतून (50 किलो वजनी गट) अपात्र ठरवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केवळ 100 ग्रॅम वजन हे जास्त भरल्याने तिला अंतिम फेरीतून अपात्र केल्याची माहिती आहे. पण आता तिच्या कुटुंबियांनी हे सर्व तिच्याविरोधील षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. भारतीय कुस्ती महासंघाकडून विनेश फोगाट विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
विनेश फोगटचे सासरे राजपाल राठी म्हणाले, 100 ग्रॅम वजन किती आहे. डोक्यावरील केसांमुळेही वजन 100 ग्रॅम वाढते. याशिवाय त्यांनी सरकार आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. यात सरकार आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांचा हात आहे. तिच्याविरोधात राजकारण केले जात आहे. हे एक षडयंत्र आहे. यात सरकारचा हात आहे. 100 ग्रॅम वजनामुळे डोके कोण काढते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
“मी अद्याप विनेश फोगाटशी बोललो नाही. पण माझ्याविरोधात कट रचला जात असल्याचे विनेशने वारंवार सांगितले आहे. विनेशने जयपूर आणि इतर ठिकाणी अनेकदा आपल्या विरोधात कट रचला जात असल्याचा दावाही केला आहे. तिला अपात्र केल्यामुळे आता लोकांमध्येही संतापाची भावना आहे. पण कालच्या मॅचमध्ये तिचं वजन वाढल नव्हतं का? असाही दावा राजपाल राठी यांनी केला आहे.
दरम्यान, उपांत्य फेरीत विनेश फोगटने क्यूबन कुस्तीपटू गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला. तिच्या श्रेणीतील पहिल्या सामन्यात. तिचा सामना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि जागतिक विजेता जपानच्या युई सुसाकीशी झाला. विनेशने सुसाकीचा 3-2 असा पराभव केला होता. त्यानंतर तिने इतिहास रचत अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र आता सर्वांच्या पदरी निराशा आली आहे.
प्री-क्वार्टर फायनलमध्ये विनेशने जपानच्या ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव केला. सुसाकी ही चार वेळा विश्वविजेती आहे आणि टोकियो ऑलिम्पिकची सुवर्णपदक विजेती सुसाकीने तिचे सर्व 82 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. पण, विनेशने स्वतःच्या युक्तीने सुसाकीचा पराभव केला.
सुसाकी कुस्तीमधील टेक-डाउन मॅन्युव्हर्समध्ये तज्ज्ञ आहे. सुसाकीनेही विनेशविरुद्ध त्याचाच वापर केला. पण तिची चाल उलटली कारण विनेशनेही तीच युक्ती वापरून आघाडी घेतली आणि विजय मिळवला.