• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • What Is Epilepsy Understanding Misunderstanding And Truth

Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

एपिलेप्सी आजाराबाबत बऱ्याच जणांना पूर्ण माहिती नसते. फिट्स येण्याची प्रक्रिया बऱ्याच जणांना माहीत आहे मात्र, याबाबत आजही अनेक गैरसमज आहेत आणि याचे सत्य नेमके काय आहे याबाबत जाणून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 17, 2026 | 04:01 PM
एपिलेप्सी म्हणजे नक्की काय (फोटो सौजन्य - iStock)

एपिलेप्सी म्हणजे नक्की काय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • एपिलेप्सी आजार नेमका काय आहे 
  • या आजाराबाबत कोणते गैरसमज आहेत 
  • फिट्स येण्याबाबत सत्य समजून घ्या 
अनेकांना एपिलेप्सी या आजाराबाबत माहिती आहे. मात्र अजूनही फिट्स येण्याबाबत अनेकांचे गैरसमज आहेत. मिर्गी म्हणजे नक्की काय आहे आणि याची कारणे कोणती आहेत याबाबत डॉ. यतीन सागवेकर, कन्सल्टंन्ट, न्यूरोलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी अधिक माहिती दिली आहे. 

एपिलेप्सी म्हणजे काय?

वारंवार येणारे झटके हे एपिलेप्सीचे मुख्य लक्षण आहे. हा मेंदूशी संबंधित एक आजार असून, जेव्हा मेंदूत अचानक आणि अनियंत्रित विद्युत लहरी निर्माण होतात, तेव्हा हे झटके येतात. या स्थितीलाच ‘मिर्गी’ किंवा ‘फिट्स येणे’ असेही म्हणतात. झटक्यादरम्यान मेंदूचे कार्य तात्पुरते विस्कळीत होते, ज्यामुळे शरीराच्या हालचालींवरून नियंत्रण सुटते किंवा शुद्ध हरपते. याबात असणारे गैरसमज दूर करू या. 

एपिलेप्सी म्हणजे नेमकं काय? मेंदूसंबंधित गंभीर आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे

गैरसमज: एपिलेप्सी असलेल्या व्यक्तीशी लग्न करू नये

वास्तव: ‘अनुवांशिक’ एपिलेप्सी होण्याचे प्रमाण अत्यंत कमी (५ ते १० टक्क्यांहून कमी) आहे. पालकांकडून हा आजार मुलांकडे जाईलच, असा कोणताही ठोस पुरावा नाही. या आजारामुळे वैवाहिक आयुष्य, प्रजनन क्षमता किंवा मुलांचे संगोपन यावर कोणताही गंभीर परिणाम होत नाही. 

गैरसमज: एपिलेप्सी असलेल्या महिलांनी गरोदर राहू नये

वास्तव: सध्या बाजारात अशी काही नवीन औषधे उपलब्ध आहेत जी गरोदरपणात घेणे सुरक्षित मानले जाते. एपिलेप्सीमुळे गरोदरपणात कोणत्याही मोठ्या गुंतागुंती निर्माण होत नाहीत. गरोदरपणात औषधे सुरू ठेवणेच हिताचे असते, कारण औषधांच्या दुष्परिणामांपेक्षा अचानक येणाऱ्या झटक्याचा गर्भावर जास्त वाईट परिणाम होऊ शकतो.

गैरसमज: एपिलेप्सी असलेल्या व्यक्तींची बुद्धिमत्ता कमी असते

वास्तव: एपिलेप्सी असलेल्या व्यक्तींची बुद्धिमत्ता सामान्य किंवा त्याहूनही अधिक असू शकते. हा मेंदूशी संबंधित एक आजार आहे, त्याचा बुद्धिमत्तेशी कोणताही संबंध नसतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या अनेक व्यक्तींनी जीवनात मोठे यश मिळवले आहे आणि ते अतिशय समाधानी आयुष्य जगत आहेत.

गैरसमज: फिट्स आल्यावर शरीराची मोठी हालचाल होतेच किंवा ते सर्वांना लगेच दिसते

वास्तव: फिट्स येण्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. काही वेळा फिट आल्याचे व्यक्तीला स्वतःलाही समजत नाही. यात शरीराची हालचाल अगदी सूक्ष्म असू शकते किंवा व्यक्ती काही सेकंदांसाठी पूर्णपणे शुन्यात पाहू शकते (भान हरपू शकते). केवळ टक लावून पाहणे हे सुद्धा फिट्सचे लक्षण असू शकते.

गैरसमज: एपिलेप्सी असलेले लोक सामान्य आयुष्य जगू शकत नाहीत

वास्तव: एपिलेप्सी असलेल्या अनेक व्यक्ती अत्यंत सामान्य आणि सक्रिय आयुष्य जगतात. ते नोकरी करू शकतात, उच्च शिक्षण घेऊ शकतात, आपली ध्येये गाठू शकतात आणि नियमितपणे व्यायाम करू शकतात किंवा खेळ खेळू शकतात.

गैरसमज: एपिलेप्सी हा एक मानसिक आजार आहे

वास्तव: एपिलेप्सी हा मेंदूशी संबंधित एक शारीरिक आजार आहे, तो मानसिक आजार नाही. इतर कोणत्याही सामान्य व्यक्तीप्रमाणे, एपिलेप्सी असलेल्या काही व्यक्तींना मानसिक समस्या असू शकतात, परंतु खुद्द एपिलेप्सी ही काही मानसिक विकृती नाही.

एपिलेप्सीवर वेळीच उपचार केल्यास त्याचे अचूक व्यवस्थापन करणे शक्य – डॉ. निर्मल सूर्या

एपिलेप्सीची कारणे आणि ट्रिगर्स   

एपिलेप्सीची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:

  • अनुवांशिकता: एपिलेप्सीचे काही प्रकार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जनुकांमार्फत संक्रमित होऊ शकतात
  • डोक्याला दुखापत: डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे एपिलेप्सीचा त्रास होऊ शकतो.
  • संसर्ग: मेंदूज्वर किंवा एनसेफलायटीस यांसारख्या मेंदूच्या संसर्गामुळे एपिलेप्सी हा आजार होऊ शकते
  • मेंदूतील दोष: मेंदूतील गाठी/ट्युमर, स्ट्रोक किंवा मेंदूच्या रचनेतील इतर दोषांमुळे फिट्स येऊ शकतात
  • विशिष्ट औषधे: काही औषधांच्या वापरामुळे फिट्स येण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे फिट्स येऊ शकतात
  • रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित कारणे: काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्तीच मेंदूवर परिणाम करते, ज्यामुळे ‘ऑटोइम्यून एपिलेप्सी’ होऊ शकते
  • जन्मजात गुंतागुंत: मुलांमध्ये आढळणारे एपिलेप्सीचे काही प्रकार हे जन्माच्या वेळी झालेल्या गुंतागुंतीमुळे असू शकतात.
फिट्स येण्यास कारणीभूत ठरणारे काही सामान्य ट्रिगर्स:
  • झोपेची कमतरता: अपुरी झोप किंवा अतिशय थकवा असणे
  • कडक उपवास: दीर्घकाळ उपाशी राहणे किंवा रक्तातील साखर कमी होणे
  • तीव्र ताप: १०३° फॅरेनहाइटपेक्षा जास्त ताप असणे
  • मानसिक ताण: कामाचा किंवा वैयक्तिक जीवनातील अतिरेकी ताण
  • लुकलुकणारे प्रकाश: वेगाने चमकणारे दिवे किंवा विशिष्ट पॅटर्नमधील चित्रे (विशेषतः फोटोसेन्सिटिव्ह एपिलेप्सी असलेल्या रुग्णांसाठी)
  • औषधांमधील खंड: फिट्सची औषधे वेळेवर न घेणे किंवा डोस चुकवणे.
उपचार आणि व्यवस्थापन 

एपिलेप्सीवर खालील प्रकारे उपचार केले जाऊ शकतात:

  • फिट्स रोखणाऱ्या औषधांद्वारे या आजारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येते. सध्या कमीत कमी दुष्परिणाम असलेली अनेक नवीन औषधे उपलब्ध आहेत. यासाठी मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील तज्ञ न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या
  • काही प्रकरणांमध्ये, मेंदूचा जो भाग फिट्स येण्यास कारणीभूत असतो, तो शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्याचा पर्याय उपलब्ध असू शकतो
  • फिट्स येण्यास प्रवृत्त करणारे घटक टाळणे, पुरेशी झोप घेणे आणि तणावाचे योग्य नियोजन केल्यास लक्षणे कमी होण्यात मदत होऊ शकते
एपिलेप्सीसह सुरक्षित जीवन जगण्यासाठी काही टिप्स
  • मेडिकल अलर्ट ब्रेसलेट वापरा
  • पोहताना सोबत कुणीतरी असू द्या: एकटे पोहायला जाऊ नका
  • वाहन चालवणे टाळा: फिट्स पूर्णपणे नियंत्रणात येत नाहीत तोपर्यंत एकट्याने वाहन चालवू नका
हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला फिट आली, तर:
  • शांत राहा: घाबरून न जाता शांत राहून त्या व्यक्तीला मदत करा
  • त्यांना पडण्यापासून किंवा इजा होण्यापासून वाचवण्यासाठी सुरक्षित जागी झोपवा
  • श्वासोच्छवास घेणे सोपे व्हावे म्हणून त्यांना एका कुशीवर वळवून झोपवा
  • फिट्स येत असताना त्या व्यक्तीचे शरीर जोराने धरून ठेवू नका किंवा हालचाल थांबवण्याचा प्रयत्न करू नका
  • तोंडात काहीही घालू नका
योग्य काळजी आणि उपचारांच्या मदतीने एपिलेप्सीवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. अनेक व्यक्ती या आजारासह अतिशय यशस्वी आणि परिपूर्ण आयुष्य जगत आहेत.

Web Title: What is epilepsy understanding misunderstanding and truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Health News
  • Health Tips

संबंधित बातम्या

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे
1

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा
2

इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने
3

हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने

सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार
4

सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

Feb 17, 2026 | 04:01 PM
Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Feb 17, 2026 | 04:00 PM
Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Feb 17, 2026 | 04:00 PM
Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा

Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा

Feb 17, 2026 | 03:59 PM
Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

Feb 17, 2026 | 03:52 PM
IND W vs AUS W : भारतीय महिला संघात प्रतिका रावलची एंट्री! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय मालिकेत लागली वर्णी 

IND W vs AUS W : भारतीय महिला संघात प्रतिका रावलची एंट्री! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय मालिकेत लागली वर्णी 

Feb 17, 2026 | 03:47 PM
‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

Feb 17, 2026 | 03:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.