मुंबईमध्ये(Mumbai) मुसळधार पावसाला (Heavy Rain) सुरुवात झाली आहे. मात्र पाऊस सुरु झाल्या झाल्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापुर्वीची कामे पूर्ण झाल्याचा दावा नुकताच मुंबई महापालिकेने केला होता.मात्र तो आता फोल ठरला आहे. आमदार ॲड. आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी यावरून पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. (Ashish Shelar Tweet) दोन ट्विटच्या माध्यमातून त्यांनी निशाणा साधला आहे.
डेब्रीजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात
पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात…
आणि मलाईच्या गोण्या मात्र
कंत्राटदारांच्या खिशात!आता तरी मुंबईकरांची खरी काळजी करा!#MumbaiRainBMCFail pic.twitter.com/xcHpfL5t2h
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 9, 2021
एका ट्विटमध्ये त्यांनी ‘डेब्रीजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात, पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात…आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात! असे म्हणत टीका केली आहे.
मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलेय.. घरात पाणी घुसू लागलेय
नालेसफाई कधी 107%..कधी 104%… दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने “वाझे”
पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे!
मुंबईकर हो!
सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा
नेमेची येतो पावसाळा…
पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा!!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 9, 2021
दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबल आहे. लोकांच्या घरात पाणी घुसू लागल आहे. नालेसफाई कधी १०७% तर कधी १०४%… झाल्याचे दावे केले जातात. पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे झाले आहेत.
[read_also content=”चायनीज ॲपच्या थापांना भुलले अन् पैसे गमावून बसले, १५ दिवसांमध्ये रक्कम डबल करण्याचे आमिष दाखवून तब्बल २५० कोटींची फसवणूक https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/man-done-fraud-of-250-crore-using-chinese-app-police-arrested-an-accused-nrsr-139960/”]
पुढे ते म्हणतात, मुंबईकर हो!सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा…पाच वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा!!
दरम्यान मुंबईत रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. पावसात मुंबईकरांचे हाल व्हायला पुन्हा सुरुवात झाली आहे.