Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॅम्पियन्स ट्रॉफीला जाण्याचे नाकारल्यानंतर बीसीसीआयकडून श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडिया 3 वनडे आणि 3 टी-20 खेळणार

बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीला जाण्याचे जवळजवळ नाकारल्याने आता श्रीलंका दौऱ्याचे शेड्यूल जाहीर करण्यात आले आहे. 

  • By युवराज भगत
Updated On: Jul 11, 2024 | 08:45 PM
BCCI Announces Sri Lanka Tour Schedule

BCCI Announces Sri Lanka Tour Schedule

Follow Us
Close
Follow Us:

BCCI Announces Sri Lanka Tour Schedule : चॅम्पियन्स ट्रॉफीकरिता पाकिस्तानला जाण्याचे नाकारल्यानंतर बीसीसीआयकडून लगेच श्रीलंका दौऱ्याचे शेड्यूल जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रकच ट्विट करीत याची माहिती दिली. भारतीय संघ होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीकरिता पाकिस्तानला जाण्यास जवळ जवळ नकार दिला आहे.

बीसीसीआयकडून श्रीलंका दौऱ्याचे शेड्यूल

🚨 NEWS 🚨

Fixtures for the upcoming India tour of Sri Lanka announced! 📢#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/oBCZn0PlmK

— BCCI (@BCCI) July 11, 2024

BCCI कडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे शेड्यूल

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात सकाळीच मोठी अपडेट आली होती. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. त्याचे सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळवण्याची मागणी तो करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. तो ICC ला आपले सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्यास सांगणार आहे. त्यामुळे जवळ जवळ चॅम्पियन्स ट्रॉफीला न जाण्याचे संकेत बीसीसीआयने दिले होतेच, परंतु आता श्रीलंका दौऱ्याचे आयोजन आणि शेड्यूल टाकत हे स्पष्टच केले आहे.

या कारणाने बीसीसीआयने जाणे नाकारले

भारतीय सीमेवरील दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानच्या सतत सहभागामुळे पहिली द्विपक्षीय मालिका बंद आहे. सीमेवर त्याचे नापाक इरादे वेळोवेळी उघड होत असतात, तर त्याचे राजकारणी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरुद्ध आग भडकवण्याचे धाडस करत असतात. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक अद्याप आलेले नाही, परंतु तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीकडे तारखा आणि ठिकाणांसह प्रस्तावित सामन्यांची यादी पाठवली आहे.

त्यानुसार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आठ संघांची ही स्पर्धा तीन ठिकाणी आयोजित केली जाईल, ज्यामध्ये कराची, रावळपिंडी आणि लाहोर येथे १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत सामने खेळवले जातील. 19 फेब्रुवारीला सुरुवात होईल, तर अंतिम सामना 9 मार्चला होणार आहे. 50 षटकांच्या फॉर्मेटसह आयसीसी ही स्पर्धा जवळजवळ 8 वर्षांनंतर आयोजित करीत आहे. त्यात गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकातील अव्वल आठ संघांचा समावेश असेल. आठ संघांची चारच्या दोन गटात विभागणी केली जाईल, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. यजमान पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी भारत, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह अ गटात आहेत, तर ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

Web Title: Bcci announces sri lanka tour schedule after denying champions trophy team india will play 3 odis and 3 t20is

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2024 | 08:45 PM

Topics:  

  • bcci
  • Champions Trophy
  • ICC

संबंधित बातम्या

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
1

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय
2

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद
3

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद

Asia Cup 2025: आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच; ‘या’ खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता
4

Asia Cup 2025: आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच; ‘या’ खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.