विचित्र परंपरा! या ठिकाणी जिवंत व्यक्तीची काढली जाते अंत्ययात्रा, झोपलेला माणूस तिरडीवरच उठून उभा राहतो
आपला देश हा अनेक रूढी-परंपरांनी भरलेला आहे. जगभरात अनेक विचित्र परंपरा अस्तित्वात आहेत. यातील काही अशाही आहेत ज्याबद्दल ऐकूनच आपल्या अंगावर शहारा येईल. आज या लेखात आम्ही तुम्हाला देशातील अशाच एका विचित्र परंपरेविषयी माहिती सांगत आहोत, ज्याविषयी ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. राजस्थानातील भीलवाडा भागात एका विचित्र परंपरेचे पालन केले जाते. ही परंपरा भारतातच काय तर जगात कुठेही साजरा करण्याची कुणाची हिम्मत नाही.
या परंपरेनुसार एका जिवंत तरुणाला तिरडीवर झोपविले जाते आणि त्या तरुणाची जिवंतपणीच अंत्ययात्रा काढली जाते. होय तुम्ही बरोबर ऐकले, हे खरे असून आजही भीलवाडा भागात या परंपरेचे पालन केले जाते. ही अंत्ययात्रा साधी नसते. तर एकादी वरात काढली जावी, अशा प्रकारे ती वाजत गाजत आणि रंग उधळत काढली जाते. डीजेचाही उपयोग यावेळी केला जातो. एका ठिकाणापर्यंत ही अंत्ययात्रा काढली जाते. येथे या युवकाच्या दहन संस्काराची सर्व सज्जता केलेली असते. ही तिरडी या चितेवर ठेवली जाते. तथापि, चितेला अग्नी देण्याच्या आत तिरडीवर झोपविण्यात आलेला युवक तेथून पलायन करतो. हा विधी शीतला सप्तमी या तिथीला केला जातो. ही परंपरा थोडीथोडकी नव्हे, तर गेली 427 वर्षे सलगपणे पाळली जात आहे.
ही अंत्ययात्रा पाहण्यासाठी प्रचंड संख्येने लोक जमतात. या परिसरातील लोकांसमवेत बाहेरुन आलेले लोकही याचा आनंद लुटतात. होळी पौर्णिमेनंतर 7 दिवसांनी शीतला सप्तमीला ही परंपरा साजरी केली जाते. या ‘अंत्ययात्रे’चा प्रारंभ चितोड येथील एका राजवाड्यापासून केला जातो. तिरडीवर झोपविलेला तरुण तसा जागाच असतो. तो कधी या तर कधी त्याचा एक हात अजब-गजब तिरडीवरच उठून बसतो किंवा पाय बाहेर आलेला असतो.
जीवित इंसान की शवयात्रा!
कहने और सुनने में बड़ा अजीब लगता है कि जीवित इंसान की शवयात्रा निकाली गई. लेकिन यह सत्य है भीलवाड़ा में शीतलाष्टमी पर 425 वर्ष पुरानी परम्परा आज भी निभाई जा रही है. इस दौरान गाजे बाजे के साथ निकाली जाने वाली अंतिम यात्रा में भारी संख्या में लोग रंग… pic.twitter.com/TBnf2pMCHW
— Balmukund Joshi (@balmukundjoshi) March 21, 2025
ही परंपरा दरवर्षी पाळली जाते आणि मिरवणुकीदरम्यान कोणीही रडत नाही. या अंत्ययात्रेत महिलांना मात्र प्रवेश नसतो. या अंत्ययात्रेस समाविष्ट लोक अचकट विचकट हावभाव आणि भाषेचा वापर करतात. नंतर ही अंत्ययात्रा ‘बडा मंदीर’ येथे पोहचते. ही प्रथा लोकांच्या मनातील वाईट भावना त्यांना बोलून व्यक्त करता याव्यात आणि त्यांचे मन पुढे वर्षभर शुद्ध रहावे यासाठी आहे, अशी स्थानकांची मान्यता आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.