(फोटो सौजन्य:Instagram)
अपघाताचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील थरारक दृश्ये पाहून अनेकदा लोक हादरतात. रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा कोणतीही अनुचित घटना अशा व्हिडिओंमध्ये सर्रास पाहायला मिळते. लोक असे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पाहतात आणि शेअर करतात. आजकाल सर्वचजण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले आहेत अशात लोकांना हे व्हायरल व्हिडिओ पाहायला फार आवडते. यातून अनेक घटनांचे खरे सत्यही उघडकीस येते. सध्या मात्र इथे एका थरारक घटनेतील दृश्य व्हायरल झाले आहे, ज्यात एक महिला विचित्र आणि धोकादायक अशा अडचणीत सापडल्याचे समजते. यात नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
नुकताच झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती खरी घटना दिसते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उसाच्या रसाच्या मशीनमध्ये एका महिलेचे केस अडकले आहेत. हे दृश्य असे आहे की ते पाहूनच आपले हातपाय थरथर कापू लागतील. व्हिडिओत एक पुरुष मशीनमध्ये अडकलेली महिलेची वेणी काढण्याचा प्रयत्न करताना दिसून आहे. तुम्ही पाहू शकता की ती व्यक्ती त्या मशिनमधून हळू हळू महिलेची वेणी काढत आहे. खूप प्रयत्नानंतर महिलेची वेणी कशीतरी बाहेर काढण्यात आली. सुदैवाने या अपघातात महिलेचा जीव वाचला आणि ती थोडक्यात वाचली.
घटनेचा हा थरार तेथील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताच तो मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर व्हायरल झाला. लोक यातील दृश्य भावून घाबरले, अनेकांना पुढे काय होईल याची भीती वाटली. दरम्यान याआधीही सोशल मीडियावर अशा अपघातांचे अनेक व्हिडिओज शेअर करण्यात आले आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @sarcasmicbhaii नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे तर अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे यात तिचा जीव देखील जाऊ शकला असता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आमच्या इथे एका महिलेचे केस उसाच्या मशीनमध्ये पूर्णपणे उपटले होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.