Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

६ चौकार आणि ८ षटकार, Cameron Green चे वादळी शतक; पहिल्यांदाच घडला असा पराक्रम

ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज कॅमेरून ग्रीनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. त्याच्या आधी ट्रॅव्हिस हेड आणि मिशेल मार्श यांनी या सामन्यात शतके झळकावली होती.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 24, 2025 | 02:39 PM
६ चौकार आणि ८ षटकार, Cameron Green चे वादळी शतक; पहिल्यांदाच घडला असा पराक्रम
Follow Us
Close
Follow Us:

AUS vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांनी शतके झळकावली आणि संघाचा धावसंख्या ४०० च्या पुढे नेली. कॅमरून ग्रीनने (Cameron Green) ४७ चेंडूत धमाकेदार शतक ठोकले. या शतकासह तो ऑस्ट्रेलियासाठी वनडे क्रिकेटमध्ये दुसरे सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियासाठी वनडेमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे. मॅक्सवेलने 2023 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध 40 चेंडूत शतक केले होते.

ग्रीनने ४७ चेंडूत पूर्ण केले शतक

कॅमेरून ग्रीनने या सामन्यात ४७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि तो ५५ चेंडूत ११८ धावा करून नाबाद परतला. आपल्या या खेळीत त्याने ६ चौकार आणि ८ षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद शतक करणाऱ्यांच्या यादीत ग्रीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही ग्लेन मॅक्सवेल आहे, ज्याने २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ५१ चेंडूत शतक केले होते. याशिवाय, २०१३ मध्ये जेम्स फॉकनरने भारताविरुद्ध ५७ चेंडूत शतक ठोकले होते.

Cameron Green turned down an easy single and then went 6, 6, 6! 😱 #AUSvSA pic.twitter.com/voNCrHoZcV — cricket.com.au (@cricketcomau) August 24, 2025

हे देखील वाचा: AUS vs SA : ट्रॅव्हिस हेडने दक्षिण आफ्रिकेला धुतलं! 80 चेंडूत झळकावले शतक; 22 वेळा चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर

ऑस्ट्रेलियाच्या वनडे इतिहासात पहिल्यांदाच घडला असा पराक्रम

ऑस्ट्रेलियाच्या वनडे क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एकाच सामन्यात तीन फलंदाजांनी शतक ठोकले आहे. ग्रीनपूर्वी या सामन्यात ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनीही शतके झळकावली. ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त, वर्ल्ड क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडनेही हा पराक्रम केला आहे.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांपुढे आफ्रिकन गोलंदाज हतबल

या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २५० धावांची मोठी भागीदारी झाली. हेडने १०३ चेंडूत १४२ धावा केल्या, तर मार्शने १०० धावांचे योगदान दिले. त्यानंतर ऍलेक्स कॅरीने ३७ चेंडूत ५० धावा आणि ग्रीनने ११८ धावांची तुफानी खेळी खेळली. ५० षटकांच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने २ विकेट्स गमावून ४३१ धावांचा डोंगर उभा केला. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ हे लक्ष्य गाठू शकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Cameron green vicious century australia record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • AUS vs SA
  • Australia
  • South Africa
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

IND W vs SA W : दक्षिण आफ्रिकेने स्मृती मानधनासाठी तयार केला खास प्लान, डी क्लार्कने भारत सामन्याबद्दल दिले संकेत
1

IND W vs SA W : दक्षिण आफ्रिकेने स्मृती मानधनासाठी तयार केला खास प्लान, डी क्लार्कने भारत सामन्याबद्दल दिले संकेत

Virender Sehwag Wife : मैत्रीत धोका? BCCI अध्यक्ष मिथुन मनहास आणि वीरेंद्र सेहवागची पत्नी एकमेकांना डेट करत आहेत का?
2

Virender Sehwag Wife : मैत्रीत धोका? BCCI अध्यक्ष मिथुन मनहास आणि वीरेंद्र सेहवागची पत्नी एकमेकांना डेट करत आहेत का?

MS Dhoni: मुंबई इंडियन्सच्या जर्सीत धोनीचा फोटो Viral; चेन्नई सुपर किंग्ज सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण
3

MS Dhoni: मुंबई इंडियन्सच्या जर्सीत धोनीचा फोटो Viral; चेन्नई सुपर किंग्ज सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण

Prithvi Shaw: पृथ्वी शॉचे शतक आणि त्यानंतर मुशीर खानसोबत भांडण; भर मैदानात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ Viral
4

Prithvi Shaw: पृथ्वी शॉचे शतक आणि त्यानंतर मुशीर खानसोबत भांडण; भर मैदानात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.