Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली जिल्हा बँक निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीच्या उमेद्वाराविरुद्ध तक्रार

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये (Sangli District Bank Election) ओबीसी गटातून निवडणूक लढवत असणारे मन्सूर खतीब एका संस्थेचे थकबाकीदार असून, एक संस्था सुरू होण्यापूर्वीच बंद पाडण्याचे काम केले आहे. त्यांची उमेदवारी बेकायदा आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 17, 2021 | 05:24 PM
सांगली जिल्हा बँक निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीच्या उमेद्वाराविरुद्ध तक्रार
Follow Us
Close
Follow Us:

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये (Sangli District Bank Election) ओबीसी गटातून निवडणूक लढवत असणारे मन्सूर खतीब एका संस्थेचे थकबाकीदार असून, एक संस्था सुरू होण्यापूर्वीच बंद पाडण्याचे काम केले आहे. त्यांची उमेदवारी बेकायदा आहे. ही बाब जिल्हा उपनिबंधक सांगली यांच्या निदर्शनास आणून दिली असून, येत्या चार दिवसांमध्ये याबाबत कायदेशीर तक्रार करणार असल्याची माहिती डफळापूर येथील नेते यशवंत चव्हाण, विजय चव्हाण व रणजीत जाधव यांनी दिली आहे. अशा माणसाला जिल्हा बँकेमध्ये निवडून देणे म्हणजे चुकीच्या माणसाच्या हातात कारभार देण्यासारखे आहे, असा दावाही केला आहे.

डफळापूर येथील या तिघांनी याबाबत पत्रकार बैठक घेऊन खतीब यांनी केलेल्या चुकीच्या कामांचा पाढा पत्रकार बैठकीमध्ये वाचला. चव्हाण यांनी सांगितले की, खतीब यांनी 1991 साली डफळापूर गावातील शेतकर्‍यांना आर्थिक विकासाचे प्रबळ प्रलोभन दाखवून राजहंस यंत्रमाग विणकर सहकारी संस्था काढली. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले. आज तागायत एक मीटरही कापड निर्माण करू शकले नाहीत. वेगवेगळ्या कारणांनी कर्ज मात्र उचलली.

संपूर्ण कारभाराबाबत सभासदांना कायमचा अंधारात ठेवले. जिल्हा बँकेने वसुलीचा तगादा लावून शेवटी सहकार न्यायालयातून बँकेच्या बाजूने निकाल मिळवला. यंत्रमाग इमारत व जागा बँकेने लिलावात विकली. खतीब व त्यांचे सहकारी यांच्यावर अद्यापही 56 लाख रुपये थकीत असल्याचा व संबधित सातबारावर बँकेचा बोजा नोंद असल्याचा दावा करत या सर्वाचा प्रमुख कर्ता-करविता खतीब हेच आहेत, असा दावाही चव्हाण यांनी केला आहे.

चव्हाण म्हणाले, खतीब यांनी 2015 च्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ही थकबाकीदार असल्याची माहिती लपवून ठेवत निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी हायकोर्टात तक्रार दाखल केली. त्याच दरम्यान खतीब यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र, यावेळी पुन्हा फसगत करत माहिती लपवून ठेवत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. जिल्ह्यातील अनेक नामवंत बँका व पतसंस्था काही चुकीच्या लोकांमुळे अडचणीत आलेल्या आहेत. त्यामुळे अशी चुकीची माणसे जिल्हा बँकेसारख्या सहकार क्षेत्रातील जिल्ह्याची शिखर संस्था असणाऱ्या ठिकाणी संचालक पदावर येणे धोक्याचे आहे.

या अशा लोकांचा या आधीचा कारभार पाहता बँकेत चांगलं काही करतील अशी आशा ठेवणे गैर वाटत आहे. बाजार समितीत असतानाही या व्यक्तीने नातेवाईकांना नोकरी लावली आहे. ही व्यक्ती जिल्हा बँकेत आल्यास पुन्हा वैयक्तिक स्वार्थ साधणार आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे बँकेच्या सभासदांनी अशा व्यक्तीला संचालक पदापासून दूर ठेवावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Complaint against mahavikas aghadi candidate before sangli district bank election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2021 | 05:24 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Sangli District Bank

संबंधित बातम्या

राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावणार; सर्वच पक्षांची जोरदार तयारी
1

राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावणार; सर्वच पक्षांची जोरदार तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.