Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Milk Union Election Twist: गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीवरून संघर्षाच्या टप्प्यात प्रशासकीय धक्का; मोसमी बर्डे-चौगुलेंची बदली

Gokul Milk Union Election 2026: मौसमी चौगुले यांना निवडणुकीच्या अधिसूचित पदावर कार्यरत असल्याने तातडीने नव्या पदाचा कार्यभार स्वीकारता येणार नाही, असेही सांगितले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुरू असलेली विशेष सखोल मतदार पुनरीक्षण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना कोल्हापुरातील सध्याच्याच पदावर काम करावे लागणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 02, 2026 | 02:24 PM
Gokul Milk Union Election 2026, Mosami Barde Chougule Transfer, Satej Patil vs Hasan Mushrif Gokul

Gokul Milk Union Election 2026, Mosami Barde Chougule Transfer, Satej Patil vs Hasan Mushrif Gokul

Follow Us
Follow Us:
  • निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बदली
  • मोसमी चौगुले यांना सध्या कोल्हापुरातच राहावे लागणार
  • अध्यक्ष निवडीचा वाद थेट न्यायालयात
Gokul Milk Union Election Twist: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेक अनपेक्षित घटना घडल्या. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या खेळीने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पॅनेलचा दारूण पराभव केला. पण त्यानंतरही या निवडणुकीतील ट्विस्ट अद्यापही कायम आहेत. गोकुळची निवडणूक प्रक्रिया अद्याप सुरू असतानाच राज्य सरकारने निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांची पदोन्नती करत एक मोठा धक्काच दिला आहे.

राज्य सरकारने मोसमी चौगुले यांची अपर जिल्हाधिकारी (गट-अ) पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) पदी पाठवण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार ३१ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला.

ED Arrest: ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; सागर डॅशला अटक, मुंबई कनेक्शनची चौक

मौसमी चौगुले यांना निवडणुकीच्या अधिसूचित पदावर कार्यरत असल्याने तातडीने नव्या पदाचा कार्यभार स्वीकारता येणार नाही, असेही सांगितले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुरू असलेली विशेष सखोल मतदार पुनरीक्षण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना कोल्हापुरातील सध्याच्याच पदावर काम करावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून ही प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे रुजू होता येईल. गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक ऐन टप्प्यात असताना झालेल्या या निर्णयामुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीवरून न्यायालयात लढाई

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या, तर महायुतीला १२ जागां मिळाल्या. पण गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या सभेत आवश्यक १४ संचालकांचा कोरम पूर्ण न झाल्याने त्यामुळे ती निवडणूक होऊ शकली नाही.

India Post Recruitment 2026: दहावी पास तरुणांसाठी खुशखबर! सरकारी नोकरीत मिळणार 63 हजार

यानंतर समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे याचिका दाखल केली. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १४ संचालकांची उपस्थिती अनिवार्य नसल्याचा दावा समविचारी आघाडीने केला. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर पहिल्या सभेलाही महायुतीच्या १२ संचालक अनुपस्थित राहिले. त्यामुळे न्यायालयाने महायुतीच्या १२ संचालकांना नोटीस बजावली आहे. तसेच राज्य सरकारसह या संचालकांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.

महायुतीचे नेते पुढील बैठकीला उपस्थित राहणार

कोल्हापूर सर्किट बेंचच्या सुनावणीनंतर महायुतीने भूमिका स्पष्ट केली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी होणाऱ्या पुढील बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. एकीकडे अध्यक्षपदाच्या निवडीवरून न्यायालयीन लढाई सुरू असताना दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पदोन्नतीवर बदली झाल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड नेमकी कधी होणार आणि पुढील प्रक्रियेत कोणते वळण येणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांची कुठे बदली झाली आहे?

    Ans: मोसमी चौगुले यांची पदोन्नतीने अपर जिल्हाधिकारी (गट-अ) पदावर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) पदी बदली करण्यात आली आहे.

  • Que: गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड का रखडली आहे?

    Ans: नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या शाहू आघाडीला १३ जागा मिळाल्या, पण अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला १४ संचालकांचा कोरम पूर्ण न झाल्याने ही निवड प्रक्रिया थांबून हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.

  • Que: मोसमी चौगुले तात्काळ नवीन पदाचा कार्यभार का स्वीकारू शकत नाहीत?

    Ans: त्या सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण प्रक्रियेच्या अधिसूचित पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा होईपर्यंत त्यांना कोल्हापुरातच राहावे लागेल.

Web Title: Gokul milk union returning officer mosami barde chougule transferred on promotion as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Gokul Milk
  • Hasan Mushrif
  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल
1

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला
2

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला

Nilesh Rane : ‘नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं !’ निलेश राणे यांच सडेतोड प्रत्युत्तर, भाजप शिंदे गटातील वाद कायम!
3

Nilesh Rane : ‘नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं !’ निलेश राणे यांच सडेतोड प्रत्युत्तर, भाजप शिंदे गटातील वाद कायम!

Eknath Shinde Mahayuti Rift: निकालानंतर महायुतीत अंतर्गत धुसफूस; एकनाथ शिंदेकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला
4

Eknath Shinde Mahayuti Rift: निकालानंतर महायुतीत अंतर्गत धुसफूस; एकनाथ शिंदेकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.