
पाणी हे शरिरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पण तेच योग्यरित्या पिणंही आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. निरोगी राहण्यासाठी आपण दिवसातून किमान ८ ग्लास पाणी प्यायले पाहिजे. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन, ओटीपोटात दुखणे, उलट्या आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत दिवसभर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरासाठी पाणी जितके आवश्यक आहे, तितकेच पाणी पिण्याची योग्य पद्धत जाणून घेणे देखील आवश्यक आहे. आजकाल बहुतेक लोक बाटलीतूनच पाणी पितात. उभे राहून पाणी पिणे, सतत घटाघट पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने शरीराच्या अनेक भागांवर वाईट परिणाम होतो. उभे राहून पाणी पिण्याचे काय दुष्परिणाम आहेत, हे माहीत आहे का?