
कमी पाण्याचे सेवन करणे बेतू शकते जीवावर! शरीरात दिसून येतात पाण्याच्या कमतरतेची 'ही' गंभीर लक्षणे
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला अन्नासोबतच पाण्याची सुद्धा आवश्यकता असते. खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नियमित २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. सकाळी उठून उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल. पण थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये काहींना खूप कमी पाणी पिण्याची सवय असते. दिवसभरात २ ते ३ लिटर पाण्याचे सेवन न केल्यास पचनक्रिया बिघडणे, ऍसिडिटी, डिहायड्रेशन, डोकेदुखी, गॅस, लघवीसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. संपूर्ण बॉडी डिहायड्रेट झाल्यानंतर त्वचा देखील सुरकुत्यासारखी वाटू लागते. चेहऱ्यावरील ग्लो कमी होऊन जातो. त्यामुळे नियमित भरपूर पाण्यासोबतच विटामिन सी युक्त पेयांचे आणि अन्नपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर ती वाढवणे आवश्यक आहे. बऱ्याचदा शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार करून शरीराची योग्य काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात कोणते बदल दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या बदलांकडे लक्ष देऊन शरीरात पाण्याची पातळी वाढणे आवश्यक आहे., डिहायड्रेशन झाल्यानंतर पाण्यासोबतच नारळ पाणी आणि इतर पेयांचे सेवन करावे.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर लघवीचा रंग बदलतो. तसेच लघवी करताना जळजळ होणे, वेदना, टोचल्यासारखे वाटणे इत्यादी समस्या उद्भवून शरीराला हानी पोहचते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे किडनी मूत्रातील टाकाऊ पदार्थ अधिक प्रमाणात केंद्रित करते, ज्याचा परिणाम लघवीवर दिसून येतो. कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे लघवी व्यवस्थित होत नाही.
डिहायड्रेशन झाल्यानंतर तोंडात कायमच कोरडेपणा जाणवतो आणि तहान कमी होऊन जाते. तोंड, ओठ आणि जीभ कोरडी पडणे ही लक्षणे कमी पाणी प्यायल्यानंतर उद्भवतात. लाळ ग्रंथींना लाळ तयार करण्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते, पण पाण्याचे सेवन कमी केल्यानंतर लाळ तयार होत नाही. तोंडात कोरडेपणा आणि चिकटपणा जाणवण्यासोबतच श्वसनाची दुर्गंधी आणि दातांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
शरीरात नाही B12 तर काही दिवसात व्हाल टकले! आजपासून सुरु करा हा डाएट
पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखीची समस्या उद्भवते. पाण्याच्या कमतरतेमुळे रक्ताचे प्रमाण कमी होऊन शरीराला जास्त ऊर्जा मिळते. यामुळे सतत तुम्हाला थकवा, आळस आणि ऊर्जेची कमतरता निर्माण होणे, तीव्र डोकेदुखी इत्यादी समस्या उद्भवू लागतात. मेंदूमधील रक्तवाहिन्यांना भरपूर पाण्याची आवश्यकता असते, पण पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर रक्तवाहिन्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. याचा परिणाम मेंदूच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते.
Ans: सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे आहेत, परंतु जास्त पाणी पिणे हानिकारक असू शकते.
Ans: दररोज 1.5 1 . 5 ते 1.8 1 . 8 लिटर (सुमारे 8 8 ग्लास) पाणी पुरेसे आहे.
Ans: शरीरातील प्रत्येक पेशी आणि ऊतींना कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.