Paytm पोस्टपेड वापरत असाल तर ही ढासू ऑफर तुमच्या खिशावरचा ताण हलका करणार आहे; जाणून घ्या ऑफर
मुंबई : पेटीएमचे पोस्टपेड युझर्सना त्यांचं मासिक बिल सोप्या इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट्समध्ये (EMI) रुपांतरित करता येणं शक्य होणार आहे, असं पेटीएम कंपनीने जाहीर केलं आहे. या फीचरचा मुख्य उपयोग म्हणजे, पेटीएम पोस्टपेड युझर्स कोणत्याही बजेटच्या मर्यादेशिवाय प्रॉडक्ट्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
या इएमआयवर त्यांना नाममात्र व्याजदर लागू होणार आहे. पेटीएम कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, बिल तयार करण्याच्या पहिल्या सात दिवसांतच पोस्टपेड बीलचं सोप्या इएमआयमध्ये रुपांतर करता येईल. पेटीएम पोस्टपेड सेवा पेटीएम मॉल, उबर, मिंत्रा, लेन्सकार्ट, गाना, पेपरफ्राय, हंगरबॉक्स, पतंजली या ठिकाणी ते ग्राह्य असणार आहे.
याशिवाय, पेटीएम पोस्टपेड युझर्स रिलायन्स फ्रेश, हल्दीराम, अपोलो फार्मसी, क्रोमा आणि शॉपर्स स्टॉप यासारख्या इतर किरकोळ विक्रेत्यांकडूनही घरगुती वस्तूखरेदी करू शकतात. पेटीएमने एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, पेमेंटचा फ्लेक्सिब्ल ईएमआय मोड आपल्या युझर्सना सध्याच्या कोव्हिड-19 परिस्थितीत मदतकरण्यासाठी सुरु केला आहे. क्रेडिट लिमिट वाढल्यावर ग्राहकांना दर महिन्याच्या खर्चासाठी पैसे बँकेतून काढण्याची गरज पडत नाही. हा विचार करून पेटीएमपोस्टपेडने ही क्रेडिट इएमआयची सोय उपलब्ध करून दिली आहे.
पेटीएम सेवेमध्ये एक लाख रुपयांपर्यंतचं क्रेडिटची मर्यादा उपलब्ध आहे, जे वेळेवर परतफेड केल्यास वाढवता येऊ शकतं. सध्या, 7 दशलक्षाहून अधिक युझर्स पेटीएम पोस्टपेड सेवा वापरतात आणि चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीला एकूण 15 दशलक्ष युझर्स होतील अशी आशा कायम आहे.
[read_also content=”मुंबईत ७०० कोटींचे वीजबिल थकीत, वीज वितरक कंपन्यांना मोठा आर्थिक फटका https://www.navarashtra.com/latest-news/700-crore-electricity-bill-in-mumbai-a-big-financial-blow-to-electricity-distribution-companies-55966.html”]
पोस्टपेड सेवेची ही नवी इएमआय योजना क्रेडिट लिमिटच्या तीन वेगवेगळ्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. लाईट, डिलाईट आणि एलिट. पोस्टपेड लाइट 20,000 रुपयांपर्यंत क्रेडिट लिमिट असेल. क्रेडिट स्कोअर नसलेल्या युझर्ससाठी हे डिझाइन केलं आहे. तर डिलाईट आणि एलिट वापरणाऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दरमहा 1 लाख रुपयांपर्यंतचं क्रेडिट लिमिट कंपनी देत आहे.
[read_also content=”१ डिसेंबरपासून रेल्वे सेवा बंद होणार? रेल्वे मंत्रालयानं असा दूर केला गैरसमज https://www.navarashtra.com/latest-news/railway-clears-its-stand-about-continuing-services-55969.html”]
यात प्रोसेसिंग किंवा कन्व्हेअन्स फी नसली तरीही घेतलेल्या क्रेडिटवर व्याज ग्राहकाला भरावं लागणार आहे. ईएमआय पर्यायाशिवाय पेटीएम आधीपासूनच युपीआय, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग सारख्या पोस्टपेड बील पेमेंटच्या सुविधा देतं. दोन लाख पेटीएम अँड्रॉइड पीओएस (पॉईंट ऑफ सेल) उपकरणांशी पोस्टपेड सेवा जोडण्याचा कंपनीचा प्रयत्न सुरू आहे.