कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर(Corona Second Wave) मराठी नाट्यप्रेमींकडून नाट्यगृहे उघडण्याची वाट पाहिली जात असतानाच, ठाणे महापालिकेच्या(Thane Corporation) ‘लेट लतीफ’ कारभारामुळे गडकरी रंगायतनमध्ये नाटकाची २२ ऑक्टोबरला तिसरी घंटा वाजणारच नाही, अशी टीका भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी केली आहे.
राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर २२ ऑक्टोबरपासून राज्यातील नाट्यगृहे व मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे मराठी नाट्यरसिकांना पुन्हा नाटक पाहण्याची ओढ निर्माण झाली आहे. ठाणे शहराचे सांस्कृतिक प्रतीक म्हणून गडकरी रंगायतनची ओळख आहे. ठाणेकरांची नाटक पाहण्यासाठी पहिली पसंती गडकरी रंगायतनलाच असते. मात्र, आता नाट्यगृह सुरू होत असतानाच गडकरी रंगायतनचा पडदा महिनाभर उघडणार नाही व तिसरी घंटाही वाजणार नाही. ठाणे महापालिकेने गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम काढले असून ते आणखी महिनाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांबरोबरच रसिकांना नाटकालाही मुकावे लागेल.
[read_also content=”शिक्षक नव्हे हा तर राक्षस – विद्यार्थ्याने होमवर्क केला नाही म्हणून गुरुजींनी सातवीतल्या पोराला इतक मारलं की….. https://www.navarashtra.com/latest-news/teacher-killed-seven-standard-student-for-not-completing-homework-nrsr-194524.html”]
यापूर्वी नाट्यगृहे बंद असताना महापालिकेने दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची अपेक्षा होती. मात्र, आता नाट्यगृह सुरू होण्यापूर्वी गडकरी रंगायतनची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेच्या या कारभाराचा उगागच नाट्यरसिकांना फटका बसणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी मराठी माणूस व मराठी संस्कृतीच्या पोकळ गप्पा मारत मारतात. मात्र, त्यांना मराठी नाट्य रसिकांविषयी आस्था नसल्याचेच या प्रकारातून उघड झाले आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.
राज्यात विविध घटकांना केव्हाच सवलत देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने मुळातच नाट्यगृहावरील निर्बंध खुले करण्यास विलंब केला. त्या विरोधात कलावंतांनी आंदोलन छेडले. तर भाजपाने रेटा वाढविल्याने राज्य सरकारला जाग आली आणि नाट्यगृह खुले करण्याचा मुहूर्त ठरला. पण ठाणे महापालिकेच्या लेट लतिफमुळे ठाणेकरांची उपेक्षा संपलेली नाही, असे डावखरे यांनी सांगितले.