Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील आदिवासींकरिता शासनाचा निर्णय! परसबागेसाठी 40 लाख रुपयांच्या निधीस मान्यता

राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन 2024-25 मध्येही राबविणार आहे. या योजनेसाठी  40 लाख रुपये एवढ्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे

  • By नारायण परब
Updated On: Jul 26, 2024 | 08:24 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील आदिवासींसाठी शासनाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन 2024-25 मध्येही राबविणार आहे. या योजनेसाठी  40 लाख रुपये एवढ्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील ठाणे, पालघर ,पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर ,अमरावती व गोंदिया या 14 जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्यासाठी अर्थसंकल्पित केलेल्या 40 लाख रुपये एवढ्या निधीच्या कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील 14 जिल्ह्यातील आदिवासी भागात कुपोषणाची समस्या आहे. या कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टिक आहार पुरवण्यासाठी, आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत पौष्टिक भाजीपाला व फळांची निवड करून त्याची लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी “आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड” ही योजना राज्यात राबविण्यात येते.

योजनेच्या लाभार्थींची निवड:

  • आदिवासी भागातील  कुपोषण ग्रस्त गावातील आदिवासी कुटुंबाकडे शेतजमीन किंवा परसबाग उपलब्ध असेल असे लाभार्थी निवडले जातात.
  • ज्या आदिवासी कुटुंबात कुपोषीत बालके असतील अशा आदिवासी  कुटुंबाला योजने अंतर्गत प्राधान्याने लाभ देण्यात येतो.
  • या योजनेचा आदिवासी कुटुंबाने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • ज्या जिल्ह्यातील सर्व आदिवासी शेतकरी यांना यापूर्वी योजनेचा लाभ घेतला असेल तर, चक्रीय पद्धतीने किमान 5 वर्षाच्या कालावधीनंतर पुनश्च लाभ देण्यात यावा.
योजनेत  दिली जाणारी फळझाडे कलमे/रोपे आणि भाजीपाला बियाणे 

फळझाडे व भाजीपाला लागवड योजनेत चिकू,आंबा, पेरू, दोडका, गवार, मेथी , पालक, दुधी भोपळा तसेच इतर भाजीपाला उदा.अळू, वांगी इ .स्थानिक गरजेनुसार आवश्यक मागणी असलेली फळझाडांची कलमे, रोपे  आणि भाजीपाला रोपे आणि बियाणे पुरविण्यात येतात.

Web Title: Governments decision for tribals in the state approval of a fund of forty lakh rupees for backyard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 08:24 PM

Topics:  

  • maharashtra
  • State Governments

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.