Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Climate Change : IIT संशोधकांचा निष्कर्ष…तर एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणंही कठीण होईल

आयआयटीचे सहाय्यक प्राध्यापक फारूक आजम (Professor Farooq Azam) यांचं संशोधन अलीकडंच विज्ञान जर्नलमध्ये (Science Journal) प्रकाशित झालं. एका दशकापेक्षा जास्त काळापासून ते हिमालयीन हिमनद्यांवरील (Himalayan Glaciers) हवामान बदलाच्या (Climate Change) परिणामांचा शोध घेत आहेत. "हिमालय-काराकोरमच्या ग्लेशिओ-हायड्रोलॉजी" च्या नवीन संशोधनानुसार, हिमनद्यांवर होणाऱ्या विपरित परिणामामुळं हिम नद्यांवर अवलंबून असलेल्या भारतासह (India) शेजारच्या देशांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम (Water supply Affected) होण्याची शक्यता आहे, असे आजम म्हणाले.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 15, 2021 | 10:19 AM
Climate Change : IIT संशोधकांचा निष्कर्ष…तर एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणंही कठीण होईल
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : पृथ्वीवरील हवामान बदलांमुळं हिमालयातील बर्फ अधिक वेगानं वितळत आहे. हिमनद्या संकुचित होत आहेत आणि हिमालय-काराकोरम पर्वतरांगामध्ये हवामान बदलामुळं विविध प्रकारचे अनिष्ट परिणाम होत आहेत. हिमनद्या (Himalayan Glaciers) वितळणं थांबल्यास एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होऊ शकतं. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

आयआयटीचे सहाय्यक प्राध्यापक फारूक आजम यांचं संशोधन अलीकडंच विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झालं. एका दशकापेक्षा जास्त काळापासून ते हिमालयीन हिमनद्यांवरील हवामान बदलाच्या परिणामांचा शोध घेत आहेत. “हिमालय-काराकोरमच्या ग्लेशिओ-हायड्रोलॉजी” च्या नवीन संशोधनानुसार, हिमनद्यांवर होणाऱ्या विपरित परिणामामुळं हिम नद्यांवर अवलंबून असलेल्या भारतासह शेजारच्या देशांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे आजम म्हणाले.

याचा काय परिणाम होईल

प्राध्यापक फारूक आझम म्हणाले की, हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगांमधून वितरित होणाऱ्या हिमनद्यांमुळं सुमारे एक अब्जाहून अधिक लोकांना पाणी मिळतं. हवामान बदलामुळं या शतकात बहुतेक हिमनग वितळून जातील आणि पाणीपुरवठा खंडित होईल, तेव्हा इतक्या मोठ्या लोकसंख्येला पाणी मिळणार नाही. हिमनगांमधून वितळणारं पाणी आणि हिमनद्यांवरील हवामान बदलाचे परिणाम सिंधू खोऱ्यात लक्षणीयरित्या जाणवत आहे, असेही ते म्हणाले.

अधिक अचूक माहिती समजून घेण्यासाठी संशोधन पथकाने २५० हून अधिक अभ्यासपूर्ण संशोधन पत्रांचे (Research Paper) निष्कर्ष आता एकत्र केले आहेत. हवामान, तापमानवाढ, पर्जन्यवृष्टी बदल आणि हिमनदी संकोचन यांच्यातील संबंधांविषयी माहिती घेतली जात आहे. अमेरिकेच्या प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूट, या पेपरचे सह-लेखक जेफ कारगेल म्हणाले की, सर्व संशोधन पत्रांच्या निष्कर्षावरून या समस्येवर मार्ग काढण्यासाठी काही उपाय समोर येऊ शकतात.

हवामानातील विविधतेवरील पर्वतांची भूमिका

उत्तर ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक आणि अभ्यासाचे सह-लेखक डॉ. जोसेफ शिया म्हणाले की, हवामानातील फरक निश्चित करण्यात पर्वतांची भूमिका महत्त्वाची आहे. मुख्य पर्वतरांगा या आजूबाजूच्या परिसराची खरंतर सेवा करतात. पावसाळा आणि हिवाळ्यातील वादळांमुळे निर्माण झालेला हवेतील ओलावा नियंत्रित करतात.

Climate Change if himalayan glaciers stopped melting then one billion people will not get water says iit professor

Web Title: If himalayan glaciers stopped melting then one billion people will not get water says iit professor nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2021 | 10:19 AM

Topics:  

  • Climate Change
  • glaciers
  • people

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; तब्बल 8 तास धुवांधार पाऊस, पिकांना मोठा फटका
2

यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; तब्बल 8 तास धुवांधार पाऊस, पिकांना मोठा फटका

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पूरसदृश परिस्थिती
3

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पूरसदृश परिस्थिती

विदर्भातील दक्षिण भागात पावसाची काहीशी उघडीप; पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीतच
4

विदर्भातील दक्षिण भागात पावसाची काहीशी उघडीप; पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीतच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.