Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा असामान्यरीत्या गरम होण्याच्या प्रक्रियेला अल नीनो म्हणतात. सामान्य परिस्थितीत व्यापारी वारे उबदार पाणी आशियाच्या दिशेने ढकलतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 16, 2026 | 07:28 AM
७० वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट

७० वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : वर्षअखेरीस भारतासह उत्तर गोलार्धातील अनेक देशांसमोर सुपर अल नीनोचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरात अत्यंत शक्तिशाली अल नीनो विकसित होत असून, हा १९५० नंतरचा सर्वात तीव्र अल नीनो ठरू शकतो, असा दावा अमेरिकेची राष्ट्रीय महासागर व वातावरणीय प्रशासन संस्था (एनओएए) च्या अहवालात करण्यात आल्याचे वृत्त आहे.

सप्टेंबरपासून त्याचा प्रभाव जाणवण्यास सुरुवात होऊन वर्षअखेरीस त्याची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा असामान्यरीत्या गरम होण्याच्या प्रक्रियेला अल नीनो म्हणतात. सामान्य परिस्थितीत वारे उबदार पाणी आशियाच्या दिशेने ढकलतात. मात्र, हे वारे कमकुवत झाल्यास उबदार पाणी मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या दिशेने सरकते. परिणामी, जगभरातील वातावरणीय परिसंचरणावर परिणाम होऊन विविध देशांमध्ये पाऊस, तापमान आणि हवामानाच्या पद्धतीत बदल होतात.

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

दरम्यान, सुपर अल नीनोच्या संभाव्य प्रभावाच्या वेळेमुळे भारताला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सामान्यतः अल नीनोचा हिंद महासागर आणि भारताच्या आसपासच्या भागांवर परिणाम दिसून येण्यासाठी सुमारे ४० ते ४५ दिवसांचा विलंब होतो. त्यामुळे अल नीनोचा प्रभाव अधिक स्पष्ट होईपर्यंत भारतातील मान्सून अंतिम टप्प्यात पोहोचलेला असण्याची शक्यता आहे. याशिवाय, इंडियन ओशन डायपोल प्रणाली अल नीनोचा प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकते.

हिवाळ्यात प्रभाव वाढण्याची भीती

यंदाचा अल नीनो अत्यंत शक्तिशाली होण्याची शक्यता सुमारे ७० टक्के आहे. तसेच उत्तर गोलार्धातील हिवाळ्यात अल नीनोची स्थिती अत्यंत मजबूत राहण्याची शक्यता सुमारे ९० टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे भारतातील हवामानाच्या स्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता असून, काही भागांत पावसाचे प्रमाण घटल्यास दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही काळाच्या विश्रांतीनंतर, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत मुंबईसह कोकण, विदर्भ, खानदेश आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Web Title: The most powerful natural disaster in 70 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 07:23 AM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
1

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
2

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
3

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…
4

Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.