आजकालच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याला प्राथमिकता राहिलेली नाही. म्हणून आपल्या शरीरात रक्ताच्या कमतरते सारख्या अनेक गंभीर समस्या होतात. विशेषतः लहान मुले आणि स्त्रियांमध्ये दिसून येतात.
आवश्यक त्या पोषक तत्वांची शरीराला पुर्तता झाली नाही, आपण वेळेवर आहार घेतला नाही, तर शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमजोर होऊ लागते ज्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाब, रक्ताची कमतरता आणि इतर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या शरीरात ठराविक प्रमाणत रक्त असेल तरच आपली रोग प्रतिकार शक्ती उत्तम राहते कारण शरीराच्या शेवटच्या पेशी पर्यंत अन्न पुरवण्याचे काम हे रक्त करत असते.
[read_also content=”सर्व प्रकारचे फंगल इन्फेकशन होईल मुळापासून दूर!; करा हा सोपा घरगुती उपाय https://www.navarashtra.com/latest-news/all-types-of-fungal-infections-will-be-eradicated-do-this-simple-home-remedy-nrng-157876.html”]
लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी, बिंबिका आणि पाणी या घटकांनी रक्त बनले जाते. पण लाल रक्त पेशी कमी झाल्यावरच आपण रक्त कमी झाले ज्याला आपण ऍनिमिया झाला असे म्हणतो. धावपळीच्या आयुष्यात आपण याकडे जास्त लक्ष देत नाही पण रक्त कमी झाल्यावर शरीर वेगवेगळे संकेत देत असते तेची काही लक्षणे परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात जे पुढे जाऊन गंभीर समस्येचे रूप धारण करतात असेच काही लक्षणे आज आपण पहाणार आहोत.
रक्ताची कमतरता प्रामुख्याने ग-र्भधारणा, बाळंतपण, मा-सिक पा ळी किंवा गंभीर आजाराचे सं क्र म ण यामुळे होत असते. लहान मुलांना अन्नातून रक्त वाढीसाठी पोषक असलेले अन्न घटक मिळाले नाहीत तर त्यांना ऍनिमिया होण्याचा धोका असतो. रक्ताच्या कमतरतेची महत्त्वाचे लक्षण म्हणजे डोळ्याची दृष्टी कमी होणे दूरचे कमी दिसू लागते आणि डोळ्यांची जळजळ होऊन आळस येऊन लवकर झोप येते.
शरीरात आळस निर्माण झाल्याने थोडासा अंतर चालल्यावर देखील आल्याला धाप लागते. रक्ताची कमतरता असल्यास नखे पांढरे दिसू लागतात आणि ओठांचा रंग बदलू लागतो.