• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Parabhani News Preparation For Ssc Students

Parabhani News : दहावीच्या परीक्षेसाठी जय्यत तयारी! विद्यार्थ्यांची मोठी संख्या, या तारखेला होणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत १० फेब्रुवारीपासून बारावी व २० फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा होणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 04, 2026 | 03:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असून, १० फेब्रुवारीपासून बारावीच्या तर २० फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर विशेष दक्षता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी प्रभावी उपाय! हे टिप्स फॉलो कराल तर नक्कीच वर्गात पहिले याल

परभणी जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ६९ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, यासाठी २७ हजार २५० विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. तर दहावीच्या परीक्षेसाठी ९१ परीक्षा केंद्रांवर २९ हजार ९११ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांकडून परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग अवलंबला जाणार नाही, यासाठी शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन आणि परीक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार आढळल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच त्याला मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सविता बिरगे, पोलीस विभागाचे अधिकारी तसेच सर्व गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते. यावेळी परीक्षा नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि सुविधा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

परीक्षा केंद्रांवरील सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित केंद्रप्रमुखांना लेखी सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे आढळून येईल, त्या ठिकाणी शिक्षकांची तातडीने अदलाबदल करण्यात येईल. तसेच अशा केंद्रांची मान्यता रद्द करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर बॅटरी किंवा इन्व्हर्टरसारखी पर्यायी व्यवस्था ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच संवेदनशील परीक्षा केंद्रांच्या परिसरात गैरप्रकार टाळण्यासाठी व्हिडीओ शूटिंगची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. भरारी पथक आणि बैठे पथकांकडून सतत तपासणी करून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ! ‘या’ तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

दरम्यान, परीक्षा केंद्रांच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स दुकाने तसेच ध्वनीक्षेपके बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, हा आदेश परीक्षार्थी, परीक्षा कामकाजाशी संबंधित अधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही. एकूणच, यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतपणे परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Parabhani news preparation for ssc students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • Parbhani

संबंधित बातम्या

CTET Question Paper 2026 : सीटीईटी पेपर-२ वरून गोंधळ, दोन केंद्रांवर परीक्षा रद्द, १५ दिवसांत पुन्हा परीक्षा
1

CTET Question Paper 2026 : सीटीईटी पेपर-२ वरून गोंधळ, दोन केंद्रांवर परीक्षा रद्द, १५ दिवसांत पुन्हा परीक्षा

मुलांनो, चला तयारी सुरू करा! ‘ही’ Bank 5 हजार पदांची भरती करणार; प्रोसेस एकदम सोपी, वाचाच…
2

मुलांनो, चला तयारी सुरू करा! ‘ही’ Bank 5 हजार पदांची भरती करणार; प्रोसेस एकदम सोपी, वाचाच…

HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! कॉपी केल्यास थेट जेल; संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर
3

HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! कॉपी केल्यास थेट जेल; संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर

Career News: तरुणांनो तयार व्हा! कौशल्य विकास आणि विद्यापीठाचा पुढाकार; ११ फेब्रुवारीला ‘या’ शहरात  रंगणार रोजगार मेळावा
4

Career News: तरुणांनो तयार व्हा! कौशल्य विकास आणि विद्यापीठाचा पुढाकार; ११ फेब्रुवारीला ‘या’ शहरात रंगणार रोजगार मेळावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Suryakumar Yadav : सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav : सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM
IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

Feb 07, 2026 | 10:44 PM
WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

Feb 07, 2026 | 09:34 PM
सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

Feb 07, 2026 | 09:34 PM
कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

Feb 07, 2026 | 09:15 PM
T20 World Cup LIVE : वानखेडेवर टॉप ऑर्डरने टाकली नांगी! सूर्याच्या खेळीने राखली लाज; भारताचे USA समोर 162 धावांचे लक्ष्य 

T20 World Cup LIVE : वानखेडेवर टॉप ऑर्डरने टाकली नांगी! सूर्याच्या खेळीने राखली लाज; भारताचे USA समोर 162 धावांचे लक्ष्य 

Feb 07, 2026 | 08:51 PM
Abhishek Sharma Duck: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! वर्ल्ड कप पदार्पणातच ‘भोपळा’; ४ दिग्गज भारतीयांच्या पंक्तीत बसला

Abhishek Sharma Duck: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! वर्ल्ड कप पदार्पणातच ‘भोपळा’; ४ दिग्गज भारतीयांच्या पंक्तीत बसला

Feb 07, 2026 | 08:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.