Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : इतिहासातील कटू आठवण होलोकॉस्ट पीडित स्मृतीदिन; जाणून घ्या 27 जानेवारीचा इतिहास

दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने ज्यू लोकांवर केलेल्या भयानक अत्याचारांची आठवण म्हणून होलोकॉस्ट पीडित स्मृती आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने सहिष्णुता, शांतता यांची जपवूक केली पाहिजे असा संदेश दिला.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 27, 2026 | 10:39 AM
international holocaust remembrance day on 27 January Marathi dinvishesh

international holocaust remembrance day on 27 January Marathi dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी 27 जानेवारीला होलोकॉस्टमध्ये जीव गमावलेल्या लाखो निरपराध पीडितांच्या स्मृतीसाठी होलोकॉस्ट पीडित स्मृती आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने ज्यू लोकांवर केलेल्या भयानक अत्याचारांची आठवण म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. यात ज्यू, रोमा, अपंग व्यक्ती आणि इतर अनेकांचे जीव घेतले गेले. या दिवसाचा उद्देश जगाला इतिहासातील या क्रूर घटनेची जाणीव करून देणे, मानवतेविरुद्ध घडलेल्या अपराधांचा निषेध करणे आणि भविष्यात असे अपराध होऊ नयेत यासाठी जागरूकता निर्माण करणे हा आहे. स्मृती दिनानिमित्त अनेक ठिकाणी कॅन्डल मार्च, चर्चासत्रे, ग्रंथ प्रदर्शने आणि होलोकॉस्टबद्दल माहिती देणारे उपक्रम आयोजित केले जातात. इतिहासातील या काळ्याकुट्ट पानातून आपण सहिष्णुता, शांतता आणि मानवी हक्कांच्या मूल्यांची जपणूक केली पाहिजे. (Dinvishesh)

27 जानेवारी रोजी देशाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 98: ट्राजन रोमन सम्राट झाला.
  • 1980: थॉमस अल्वा एडिसन यांनी विद्युत दिव्याचे पेटंट घेतले.
  • 1888: वॉशिंग्टन, डी.सी. येथे नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना झाली.
  • 1926: जॉन लोगीबेअर्ड यांनी पहिला टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.
  • 1945: दुसरे महायुद्ध – रशियन रेड आर्मीने पोलंडमधील ऑशविट्झ छळछावणी शिबिरातून कैद्यांना मुक्त केले.
  • 1967: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. ही संस्था आता बाल भारती म्हणून ओळखली जाते.
  • 1967 : केनेडी स्पेस सेंटरमध्ये अपोलो-1 ला लागलेल्या आगीत अंतराळवीर गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट आणि रॉजर चाफी यांचा मृत्यू झाला.
  • 1973: पॅरिस करारावर स्वाक्षरी करून 31 वर्षे चाललेले व्हिएतनाम युद्ध संपले. अमेरिकेसारख्या शक्तिशाली राष्ट्राला व्हिएतनाममधून माघार घ्यावी लागली.
  • 1983: होन्शु आणि होक्काइडो या जपानी बेटांच्या दरम्यान जगातील सर्वात लांब पाण्याखालील बोगदा (53,900 किमी) उघडण्यात आला.
  • 2010: अ‍ॅपलने आयपॅडची घोषणा केली.
  • 2017: अमेरिकेत टेनेसिन या रासायनिक घटकाचे नामकरण समारंभ पार पडला.
हे देखील वाचा : आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया घसरतोय…! शेअर बाजारावर होतोय विपरित परिणाम

27 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1756: ‘वूल्फगँग मोझार्ट’ – ऑस्ट्रियन संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 5 डिसेंबर 1791)
  • 1795: ‘एली व्हिटनी ब्लेक’ – अमेरिकन शोधक, मोर्टिस लॉक कंपनीचे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 18 ऑगस्ट 1886)
  • 1850: ‘एडवर्ड जे. स्मिथ’ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान यांचा जन्म. (मृत्यू: 15 एप्रिल 1912)
  • 1901: ‘लक्ष्मण बाळाजी जोशी’ – विचारवंत यांचा जन्म. (मृत्यू: 27 मे 1994)
  • 1926: ‘अरुणकुमार वैद्य’ – भारताचे 13 वे लष्करप्रमुख जनरल यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑगस्ट 1986)
  • 1967: ‘बॉबी देओल’ – हिन्दी चित्रपट कलाकार यांचा जन्म.
  • 1976: ‘श्रेयस तळपदे’ – बॉलीवूड भारतीय अभिनेते यांचा जन्म.
हे देखील वाचा : स्टोनहेंजचे सर्वात मोठे रहस्य उलगडले! ५००० वर्षापूर्वीचा ‘तो’ दावा ठरला खोटा, शास्त्रज्ञही हैराण

27 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1311: युआन देशाचे सम्राट – कुलुग खान (जन्म: 4 ऑगस्ट 1281)
  • 1947: ‘पॉल हॅरिस’ – रोटरी क्लबचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 19 एप्रिल 1868)
  • 1967: ‘एडवर्ड हिगिन्स व्हाईट (दुसरे)’ – स्पेसवॉक करणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1930)
  • 1968: ‘सदाशिव अनंत शुक्ल’ – नाटककार व साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 26 मे 1902)
  • 1986: ‘निखिल बॅनर्जी’ – मैहर घराण्याचे सतारवादक यांचे निधन. (जन्म: 14 ऑक्टोबर 1931)
  • 2006: ‘जोहान्स राऊ’ – जर्मनी देशाचे 8वे फेडरल अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 16 जानेवारी 1931)
  • 2007: ‘कमलेश्वर’ – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1932)
  • 2008: ‘सुहार्तो’ – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 8 जून 1921)
  • 2009: ‘आर. वेंकटरमण’ – भारताचे 8 वे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1910)

Web Title: International holocaust remembrance day on 27 january marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Stonehenge Stones : स्टोनहेंजचे सर्वात मोठे रहस्य उलगडले! ५००० वर्षापूर्वीचा ‘तो’ दावा ठरला खोटा, शास्त्रज्ञही हैराण
1

Stonehenge Stones : स्टोनहेंजचे सर्वात मोठे रहस्य उलगडले! ५००० वर्षापूर्वीचा ‘तो’ दावा ठरला खोटा, शास्त्रज्ञही हैराण

भारतामध्ये सुरु झाले लोकशाही पर्व! प्रजासत्ताक दिन साजरा; जाणून घ्या 26 जानेवारीचा इतिहास
2

भारतामध्ये सुरु झाले लोकशाही पर्व! प्रजासत्ताक दिन साजरा; जाणून घ्या 26 जानेवारीचा इतिहास

सेवासदन संस्थापिका थोर समाजसेविका रमाबाई रानडे यांची जयंती; जाणून घ्या 25 जानेवारी इतिहास
3

सेवासदन संस्थापिका थोर समाजसेविका रमाबाई रानडे यांची जयंती; जाणून घ्या 25 जानेवारी इतिहास

स्वरसम्राट पंडीत भीमसेन जोशी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जानेवारीचा इतिहास
4

स्वरसम्राट पंडीत भीमसेन जोशी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जानेवारीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.