Stonehenge Stones : स्टोनहेंजचं सर्वात मोठं रहस्य उलगडलं! ५००० वर्षापूर्वीचा 'तो' दावा ठरला खोटा, शास्त्रज्ञही हैराण (फोटो सौजन्य: iStock)
अखेर गुपित उलगडलं! ११.५ अब्ज वर्षांपूर्वीच्या अद्भुत आकाशगंगेचा लागला शोध, वैज्ञानिकही चक्रावले
गेल्या अनेक दशकांपासून स्टोनहेंज स्टोन्स म्हणजे महाकाय दगड हे वेल्स आणि स्कॉटलँडमधून शेकडो दूर सॅलिबरी प्लेनपर्यंत कसे पोहोचले यावर संशोधन सुरु होते. काही तज्ज्ञांनी दावा केला होता कीहे महाकाय दगड हिमयुगातील ग्लेशियर्स हिमनद्यांमुळे वाहून आले असावेत. याला ग्लेशियर्स ट्रान्सपोर्ट थेअर म्हटले जाते. परंतु कम्युनिकेशन अर्थ अँड एनव्हायर्नमेंट या संशोधनपत्रिकेत हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियातील कर्टिन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नुकतेच एक शोधपत्रिका प्रसिद्ध केली आहे. या शोध पत्रिकेत ५००० वर्षापूर्वाचा दावा फेटाळण्यात आला आहे. युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी स्टोनहेंज परिसरातील माती आणि नद्यांचा गाळातील झिरकॉन आणि ॲपेटाइट या सूक्ष्म जीवांचा अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांना मोठ्या रहस्याचा उलगडा झाला आहे. या संशोधनानुसार, महाकाय दगडांमदजील खनिजे आणि सॅलिबरी प्लेनच्या जमिनीतील खनिजे पूर्णपमे वेगळी आहेत. यामुळे हे दगड तेथील मूळचे नाहीत.
संशोधकांच्या मते हे दगड हिमनद्यामुळे वाहून आले असते तर त्यामध्ये प्रवासाच्या वाटेवर दगडांचे छोटे तुकडे, कण, खुणा सापडल्या असते. पण या मार्गावर कोणत्याही प्रकारचे दगडांचे फुटप्रिंट सापडलेले नाहीत. संशोधकांच्या मते बर्फाच्या नद्या दक्षिण लंडनमध्ये कधी आल्याच नाहीत यामुळे हे महाकाय दगड वाहून आलेले नाहीत.
मानवाने आणले दगड?
या संशोधनात सांगण्याता आले आहे की, स्टोनहेंजमधील ब्लूस्टोन्स २२५ किलोमीटर दूर असलेल्या वेल्समधून आणले गेले आहेत, तर अल्टर स्टोन हा स्कॉटलँडमधून ५०० ते ७०० मीटर दूर आणला गेला आहे. पंरुत हे बर्फाच्या नद्यांमधून वाहत आलेले नाहीत, तर मानवानेच आणले असल्याचे या संशोधनात सांगण्यात आले आहेत.
संशोधकांच्या मते, हे महाकाय दगड मावनवानेच बोटींच्या मदतीने किंवा जमिनीमार्गे उचलून आणले आहेत. परंतु अजूनही असा प्रश्न पडतो की एवढे मोठे स्टोन्स मानवाने कशा प्रकारे आणले असतील. यासाठी किती मोठ्या बोटीचा वापर करावा लागला असेल? दगड आणण्यासाठी वापरलेली बोट कुठे आहे? हे प्रश्न सध्या अनुत्तरितच आहेत.
ॲमेझॉनच्या काळजात काय दडलंय? हजारो वर्षे जगापासून लपलेल्या ‘त्या’ जमातीचा उलगडा






