
Din Vishesh
आज स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांची पुण्यतिथी आहे. भारतीय शास्त्रीय संगीताातील एक तेजस्वी पर्व म्हणून त्यांना ओळखळे जाते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात गदग येथील कन्नड भाषिक ब्राह्मण कुटुबांत झाला होता. त्यांनी आई सुमधुर भजने म्हणत, तर त्यांचे वडील वेदान्तपारंगत होते. भीमसेन जोशी यानी आपल्या स्वरांची ताकद, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि अभंग-भजनातून उमटणाऱ्या भक्तीने रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांना त्यांच्या गायकीसाठी भारतरत्न पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात १९९७ मध्ये वंदे मातरम्, मिले सूर मेरा तुम्हा, अभंग, जुगलबंदी आणि मैफीलींमधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. (Dinvishesh)
24 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
24 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष