Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅलिलिओ गॅलिलीने आजच्या दिवशी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 08 जानेवारीचा इतिहास

मुळचे इटलीचे असणाऱ्या गॅलिलिओ गॅलिलीने खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ  म्हणून नावलौकिक मिळवला. तसेच दुर्बिणीचा महत्त्वपूर्ण शोध लावला.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 08, 2026 | 10:47 AM
Italian scientist and astronomer Galileo Galilei death anniversary January 8th history

Italian scientist and astronomer Galileo Galilei death anniversary January 8th history

Follow Us
Close
Follow Us:

Galileo Galileo Death Anniversary : आधुनिक विज्ञानाचे जनक म्हणून संपूर्ण विश्वात आपली ओळख निर्माण करणारे गॅलिलिओ गॅलिली यांची आज पुण्यतिथी. मुळचे इटलीचे असणाऱ्या गॅलिलिओ गॅलिलीने खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ  म्हणून नावलौकिक मिळवला. निरीक्षण, प्रयोग आणि तर्कशुद्ध पद्धतींचा वापर करून खगोलशास्त्र व भौतिकशास्त्रात क्रांती घडवली; त्यांनी दुर्बिणीचा वापर करून गुरूचे चंद्र आणि शुक्राच्या कला शोधल्या, तसेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते या सूर्यकेंद्रित सिद्धांताला पाठिंबा दिला. गॅलिलिओ गॅलिली यांनी दुर्बिणीचा वापर करून अनेक महत्त्वाचे खगोलीय शोध लावले.

08 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1835 : युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदा आणि एकदाच शून्यावर आले.
  • 1889 : डॉ. हर्मन हॉलरिथ यांना संख्यात्मक डेटाचे विश्लेषण करण्यासाठी कॅल्क्युलेटिंग मशीनसाठी युनायटेड स्टेट्समध्ये पेटंट मिळाले.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
  • 1947 : राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1957 : मोहन रानडे यांच्यासह 23 जणांना गोव्यातील लष्करी न्यायालयाने 24 वर्षांची शिक्षा सुनावली.
  • 1963 : लिओनार्डो दा विंचीची मोनालिसा अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शित करण्यात आली.
  • 1973 : सोव्हिएत अंतराळ मोहीम ‘लुना 21’ प्रक्षेपित करण्यात आली
  • 2000 : लता मंगेशकर यांची 1999 च्या एन.टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली.
  • 2001 : भारत आणि व्हिएतनाम यांच्यात संस्कृती, पर्यटन आणि अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर यासंबंधी तीन करार झाले.
  • 2002 : युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी ‘नो चाइल्ड लेफ्ट बिहाइंड’ कायद्यावर स्वाक्षरी केली.
हे देखील वाचा : पृथ्वीला इतकी घाई कशाची? दिवसाचे 24 तास आता अपुरे; शास्त्रज्ञांनी दिला ‘निगेटिव्ह लीप सेकंद’चा इशारा

08 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1881 : ‘विल्यम टी. पायपर’ – पाईपर एअरक्राफ्टचे संस्थापक, अमेरिकन अभियंते आणि उद्योगपती (मृत्यू : 15 जानेवारी 1970)
  • 1909 : ‘आशापूर्णा देवी’ – पहिला भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला लेखिका यांचा जन्म.
  • 1924 : ‘गीता मुखर्जी’ – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या (मृत्यू : 4 मार्च 2000)
  • 1925 : ‘राकेश मोहन’ – हिंदी नाटककार (मृत्यू : 5 डिसेंबर 1973)
  • 1926 : ‘केलुचरण महापात्रा’ – भारतीय ओडिसी नर्तक – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (मृत्यू : 7 एप्रिल 2004)
  • 1929 : ‘सईद जाफरी’ – अभिनेते
  • 1931 : ‘तरुण मजुमदार’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक – पद्मश्री (मृत्यू : 4 जुलै 2022)
  • 1935 : ‘एल्विस प्रेसली’ – अमेरिकन गिटारवादक, किंग ऑफ द रॉक अँड रोल (मृत्यू : 16 ऑगस्ट 1977)
  • 1936 : ‘ज्योतिंद्रनाथ दिक्षीत’ – परराष्ट्रसचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू : 3 जानेवारी 2005)
  • 1939 : ‘नंदा’ – अभिनेत्री
  • 1942 : ‘स्टिफन हॉकिंग’ – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक यांचा जन्म.
  • 1944 : ‘सुनील कांती रॉय’ – पद्मश्री, भारतीय उद्योजक यांचा जन्म. (मृत्यू : 8 मे 2022)
  • 1945 : ‘प्रभा गणोरकर’ – मराठी लेखिका यांचा जन्म.
हे देखील वाचा : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंना सोडून काढावा लागला दुसरा पक्ष’; शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांचं मोठं विधान

08 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1642 : ‘गॅलेलिओ गॅलिली’ – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 फेब्रुवारी 1564)
  • 1825 : ‘एली व्हिटनी’ – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक यांचे निधन. (जन्म : 8 डिसेंबर 1765)
  • 1884 : ‘केशव चंद्र’ – सेन ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक यांचे निधन. (जन्म : 19 नोव्हेंबर 1838)
  • 1941 : ‘लॉर्ड बेडन पॉवेल’ – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते यांचे निधन. (जन्म : 22 फेब्रुवारी 1857)
  • 1966 : ‘बिमल रॉय’ – प्रथितयश दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 12 जुलै 1909)
  • 1967 : ‘श्रीपाद कृष्ण बेलवलकर’ – प्राच्यविद्या पंडित यांचे निधन. (जन्म : 10 डिसेंबर 1880 – नरसोबाची वाडी, शिरोळ, कोल्हापूर)
  • 1973 : ‘ना. भि. परुळेकर’ – सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक यांचे निधन.
  • 1973 : ‘स. ज. भागवत’ – तत्वज्ञ आणि विचारवंत यांचे निधन.
  • 1976 : ‘चाऊ एन लाय’ – चीनचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 5 मार्च 1898)
  • 1984 : ‘सुषमा मुखोपाध्याय’ – पहिल्या भारतीय महिला वैमानिक यांचे निधन.
  • 1992 : ‘दं. प्र. सहस्रबुद्धे’ – आनंद मासिकाचे माजी संपादक यांचे निधन.
  • 1994 : ‘श्री. चंद्रशेखर सरस्वती’ – 68वे शंकराचार्य परमाचार्य यांचे निधन.
  • 1996 : ‘फ्रान्सवाँ मित्राँ’ – फ्रान्सचे 21वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 26 ऑक्टोबर 1916)
  • 2017 : ‘जेम्स मंचम’ – सेशेल्स देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 11 ऑगस्ट 1939)

Web Title: Italian scientist and astronomer galileo galilei death anniversary january 8th history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

देशासाठी वयाच्या 19 व्या वर्षी प्राणांची आहुती देणाऱ्या अनंत कान्हेरे यांचा जन्मदिन; जाणून घ्या 07 जानेवारीचा इतिहास
1

देशासाठी वयाच्या 19 व्या वर्षी प्राणांची आहुती देणाऱ्या अनंत कान्हेरे यांचा जन्मदिन; जाणून घ्या 07 जानेवारीचा इतिहास

दर्पणकार जांभेकर यांच्या जन्मदिनी मराठी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला झाली सुरुवात; जाणून घ्या 06 जानेवारीचा इतिहास
2

दर्पणकार जांभेकर यांच्या जन्मदिनी मराठी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला झाली सुरुवात; जाणून घ्या 06 जानेवारीचा इतिहास

Marathi Patrakar Din : जाणून घ्या ‘दर्पण’ ला सुरुवात करुन मराठी पत्रकारितेचा पाया रचणाऱ्या महापुरुषाबद्दल
3

Marathi Patrakar Din : जाणून घ्या ‘दर्पण’ ला सुरुवात करुन मराठी पत्रकारितेचा पाया रचणाऱ्या महापुरुषाबद्दल

Mamata Banerjee Birthday : राजकारणातील दीदी अर्थात ममता बॅनर्जी यांचा जन्मदिन; जाणून घ्या 05 जानेवारीचा इतिहास
4

Mamata Banerjee Birthday : राजकारणातील दीदी अर्थात ममता बॅनर्जी यांचा जन्मदिन; जाणून घ्या 05 जानेवारीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.