'...म्हणून उद्धव ठाकरेंना सोडून काढावा लागला दुसरा पक्ष'; शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांचं मोठं विधान (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मुंबई : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. यापूर्वी शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट हे तयार झाले. यावरच आता शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं विधान केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे अनुयायी असलेली शिवसेना कधीही काँग्रेसच्या विचारांशी सहमत होऊ शकत नाही, असे म्हटले आहे.
महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. त्यात दीपक केसरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे अनुयायी असलेली शिवसेना कधीही काँग्रेसच्या विचारांशी सहमत होऊ शकत नाही. काँग्रेस सोडल्यानंतर महायुती सरकार स्थापन झाले. भाजप आणि शिवसेनेची हिंदुत्व विचारसरणी सामायिक आहे आणि म्हणूनच महायुती युती मजबूत आहे. तसेच काँग्रेस नेहमीच वीर सावरकरांच्या विरोधात आहे. परिणामी, काँग्रेसला पाठिंबा देणारी शिवसेना (यूबीटी) गेल्या निवडणुकीत जनतेने पराभूत केली.
हेदेखील वाचा : भाजप–शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र, “कलंकित आमदार…” प्रताप सरनाईकांचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप
दरम्यान, राहुल गांधींनी वीर सावरकरांचा सर्वात जास्त अपमान केला आहे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष त्या विचारसरणीच्या बाजूने उभा आहे. महायुतीचा मित्रपक्ष असलेला भाजप अनैतिक युतींना महत्त्व देणार नाही. अंबरनाथबाबत शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावावर भाजप सकारात्मक विचार करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजप वरिष्ठ नेत्यांनी कठोर कारवाई करावी
अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि अकोटमध्ये एमआयएमशी भाजपच्या युतीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, भाजप नेत्यांना या युतीबद्दल विचारले पाहिजे. स्थानिक भाजप नेत्यांनी सत्तेच्या लोभापोटी ज्या काँग्रेस पक्षाविरुद्ध भाजप आणि शिवसेना वर्षानुवर्षे लढत आहेत त्याच काँग्रेस पक्षाशी युती केली आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करावी.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…






