Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर करणारे स. गो. बर्वे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 03 मार्चचा इतिहास

स. गो. बर्वे यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिले अर्थसचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि नव्या राज्याच्या आर्थिक घडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 03, 2026 | 10:16 AM
Death anniversary of S. Go. Barve renowned administrative officer who presented the first budget of Maharashtra

Death anniversary of S. Go. Barve renowned administrative officer who presented the first budget of Maharashtra

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनिक आणि आर्थिक पायाभरणीत मोलाचा वाटा उचलणारे स. गो. बर्वे हे दूरदृष्टीचे आणि कर्तव्यनिष्ठ प्रशासक होते. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिले अर्थसचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि नव्या राज्याच्या आर्थिक घडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यामागे त्यांचे नियोजन, अभ्यासू वृत्ती आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती होती. बर्वे यांनी आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि विकासाभिमुख धोरणांवर भर दिला. औद्योगिक प्रगती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास यासाठी त्यांनी भक्कम आर्थिक नियोजन केले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राला स्थैर्य आणि प्रगतीची दिशा मिळाली. (Dinvishesh)

 

03 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1845: फ्लोरिडा हे अमेरिकेचे 27 वे राज्य बनले.
  • 1865: हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
  • 1885: अमेरिकन टेलिफोन आणि टेलिग्राफ कंपनी (AT&T) ची स्थापना झाली.
  • 1923: टाईम मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1938: सौदी अरेबियामध्ये तेलाचा शोध लागला.
  • 1966: डॉ. धनंजय राव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू बनले.
  • 1969: अपोलो कार्यक्रम: चंद्र मॉड्यूलची चाचणी घेण्यासाठी नासाने अपोलो-9 लाँच केले.
  • 2003: महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिलेल्या शरच्चंद्र चट्टोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
  • 2005: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर विमानातून ६७ तासांत जगाची एकट्याने, इंधन न भरता केलेली प्रदक्षिणा पूर्ण केली.
  • 2015: 20 डिसेंबर 2013 रोजी, संयुक्त राष्ट्रांनी ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला.
हे देखील वाचा : जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस? काय आहे मानवी जीवनात वनस्पती अन् प्राण्यांचे महत्त्व 

03 मार्च रोजी जन्म दिनविशेष

  • 1839: ‘जमशेदजी टाटा’ – टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 19 मे 1904)
  • 1845: ‘जॉर्ज कँटर’ – जर्मन गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1918)
  • 1847: ‘अॅलेक्झांडर ग्राहम बेल’ – टेलिफोनचा जनक यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑगस्ट 1922)
  • 1920: ‘मुकुंद शंकरराव किर्लोस्कर’ – किर्लोस्कर मासिकाचे संपादक यांचा जन्म.
  • 1923: ‘प्रा. सदाशिव नथोबा आठवले’ – इतिहासकार आणि ललित लेखक यांचा जन्म.
  • 1926: ‘रवि शंकर शर्मा’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 7 मार्च 2012)
  • 1928: ‘पुरुषोत्तम पाटील’ – कवी आणि लेखक यांचा जन्म.
  • 1948: ‘स्टीव्ह विल्हाइट’ – अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, GIF इमेज फॉरमॅटचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 14 मार्च 2022)
  • 1967: ‘शंकर महादेवन’ – गायक आणि संगीतकार यांचा जन्म.
  • 1977: ‘अभिजित कुंटे’ – भारताचा चौथा ग्रँडमास्टर यांचा जन्म.
  • 1987:’ श्रद्धा कपूर’ – भारतीय अभिनेत्री, गायिका आणि डिझायनर यांचा जन्म.
हे देखील वाचा : अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे विश्व रक्तरंजित; हत्येमुळे इराणच्या स्वाभिमानाला तडा

03 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1703: ‘रॉबर्ट हूक’ – इंग्लिश वैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1635)
  • 1707: ‘औरंगजेब’ – सहावा मोघल सम्राट याचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1618)
  • 1919: ‘हरी नारायण आपटे’ – कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 8 मार्च 1864)
  • 1924: ‘वूड्रो विल्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे 28वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1965: ‘अमीरबाई कर्नाटकी’ – पार्श्वगायिका आणि अभिनेत्री यांचे निधन.
  • 1967: ‘स. गो. बर्वे’ – माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक यांचे निधन.
  • 1982: ‘रघुपती सहाय’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1896)
  • 1995: ‘पं. निखील घोष’ – तबलावादक यांचे निधन.
  • 2000: ‘रंजना देशमुख’ – मराठी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन.

Web Title: Death anniversary of s go barve renowned administrative officer who presented the first budget of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvisheh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 मार्चचा इतिहास
1

Dinvisheh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 मार्चचा इतिहास

Dinvishesh : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती; जाणून घ्या 01 मार्चचा इतिहास
2

Dinvishesh : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती; जाणून घ्या 01 मार्चचा इतिहास

प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २८ फेब्रुवारीचा इतिहास
3

प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २८ फेब्रुवारीचा इतिहास

अष्टपैलू साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती; जाणून घ्या 27 फेब्रुवारीचा इतिहास
4

अष्टपैलू साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती; जाणून घ्या 27 फेब्रुवारीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.