Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET Paper Leak: उमेदवारांचा कोणताही दोष नाही…; रद्द झालेल्या परीक्षेबाबत उपायुक्त प्रिया शिंदे यांची मोठी घोषणा

TET Paper Leak: ठाणे आणि भिवंडी येथे प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाची सध्या सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आतापर्यंत ३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 27, 2026 | 04:08 PM
MSCE Exam, PaperLeak 2026, Priya Shinde, Maharashtra Government, Thane Bhiwandi News, Re Exam Update

MSCE Exam, PaperLeak 2026, Priya Shinde, Maharashtra Government, Thane Bhiwandi News, Re Exam Update

Follow Us
Follow Us:
  • या संपूर्ण गैरप्रकारात प्रामाणिक उमेदवारांचा कोणताही दोष नाही- परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे
  • ठाणे-भिवंडीत पेपर लीक झाल्याचे समजताच प्रशासनाने वेगाने पावले उचलत परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याचा निर्णय
  • चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणि परीक्षेची गोपनीयता सुनिश्चित केल्यानंतर पुनरपरीक्षेचे नवीन वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले जाईल
MSCE Exam Paper Leak: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET- Teacher Eligibility Test) परीक्षेचा पेपर अवघ्या एक दिवस आधी लीक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे जिल्ह्यातून पेपरलीक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात TET परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पेपरलीक नंतर शिक्षण विभागाकडून उद्याचा पेपर रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भातील सुचनादेखील जारी करण्यात आली आहे. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा विभागाने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर, परीक्षा परिषदेने पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. या संपूर्ण प्रकरणात उमेदवारांचा कोणताही दोष नसल्यामुळे, रद्द झालेली परीक्षा पुन्हा देण्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी (Re-registration) करण्याची किंवा कोणतेही परीक्षा शुल्क देण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी दिली आहे.

TET Exam Cancelled: उद्या होणारी टीईटी परीक्षा खरोखरच रद्द? पेपर .

ठाणे आणि भिवंडी येथे प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाची सध्या सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आतापर्यंत ३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ज्या उमेदवारांनी आधीच यशस्वीरित्या रजिस्ट्रेशन केलेलं होतं, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तसेच त्यांच्याकडून कोणतीही अतिरिक्त फी आकारली जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. चौकशीच्या अंतिम अहवालात जे कोणी दोषी निष्पन्न होतील, मग ते अधिकारी असोत की बाहेरील व्यक्ती, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या पेपरफुटी प्रकरणी सध्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

TET Exam Cancelled: उद्या होणारी टीईटी परीक्षा खरोखरच रद्द? पेपर ..

लक्षणीय बाब म्हणजे अशा यंदाच्या शिक्षक पात्रता परीक्षेला उमेदवारांची रेकॉर्डब्रेक नोंदणी झाली होती. अशातच आता पेपर लीक झाल्यामुळे शिक्षण विभागाने ही परीक्षा रद्द करत परीक्षा स्थगितीचा निर्णय घेतला. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी साधारणपणे तीन आठवड्यांची (२१ दिवस) प्रक्रिया आवश्यक असते. त्यामुळे परीक्षेचे पुढील नियोजन अत्यंत लवकरच अधिकृतपणे जाहीर केले जाईल.

परीक्षेचे भव्य स्वरूप (आकडेवारी ):

महाराष्ट्र भरात ही परीक्षा अत्यंत मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आली होती.

एकूण उमेदवार: ६ लाख १६ हजार १२५ (6,16,125)
परीक्षा केंद्रे: १,७२८
एकूण ठिकाणे: ३७

 

 

Web Title: Maharashtra exam council paper leak no re registration fee priya shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Paper Leak Case

संबंधित बातम्या

गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’; रुग्णालयनिहाय सुविधा निश्चित- मंत्री प्रकाश आबिटकर
1

गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’; रुग्णालयनिहाय सुविधा निश्चित- मंत्री प्रकाश आबिटकर

महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल; एकनाथ शिंदेंचे ‘मिशन मोड’वर काम करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश
2

महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल; एकनाथ शिंदेंचे ‘मिशन मोड’वर काम करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश

मोठी बातमी ! बोगस लाडक्या बहिणींचा 9605 कोटींवर डल्ला; राज्य सरकार आता ‘त्या’ महिलांकडून पैसे करणार वसूल?
3

मोठी बातमी ! बोगस लाडक्या बहिणींचा 9605 कोटींवर डल्ला; राज्य सरकार आता ‘त्या’ महिलांकडून पैसे करणार वसूल?

महाराष्ट्रात ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन होणार? CSR निधीच्या प्रभावी वापरासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
4

महाराष्ट्रात ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन होणार? CSR निधीच्या प्रभावी वापरासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.