Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra Vision S लाँच होण्यापूर्वी हिमालयात हाय-अल्टिट्यूड टेस्टिंग! पाहा पॅनोरॅमिक सनरुफची झलक

महिंद्राची आगामी 'व्हिजन S' सब-४ मीटर एसयूव्ही लाँच होण्यापूर्वी स्पिती व्हॅलीमध्ये हाय-अल्टिट्यूड चाचणीदरम्यान स्पॉट झाली आहे. पॅनोरॅमिक सनरुफ, मस्क्युलर लुक आणि दमदार इंजिनसह ही एसयूव्ही लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 27, 2026 | 08:10 AM
Mahindra Vision S लाँच होण्यापूर्वी हिमालयात हाय-अल्टिट्यूड टेस्टिंग! पाहा पॅनोरॅमिक सनरुफची झलक
Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा व्हिजन S सब-४ मीटर एसयूव्हीची स्पिती व्हॅलीमध्ये हाय-अल्टिट्यूड रस्ते चाचणी पार पडली आहे.
  • या आगामी कारमध्ये पॅनोरॅमिक सनरुफ, अपराईट डॅशबोर्ड आणि ६ एअरबॅग्जसारखे प्रीमियम फीचर्स मिळणार आहेत.
  • नवीन NU_IQ प्लॅटफॉर्मवर आधारित ही एसयूव्ही १.२L टर्बो-पेट्रोल व १.५L डिझेल इंजिनसह बाजारात येईल.

महिंद्रा कंपनी आपल्या आगामी ‘व्हिजन S’  या सब-४ मीटर एसयूव्हीच्या प्रोडक्शन वर्जनची भारतात जोरदार टेस्ट घेत आहे. ही एसयूव्ही पुढील वर्षाच्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता असून नुकतीच स्पिती व्हॅलीतील आव्हानात्मक रस्त्यांवर हाय-अल्टिट्यूड चाचणीदरम्यान ती कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दमदार डिझाईन आणि मस्क्युलर लुक

स्पिती व्हॅलीत दिसलेल्या टेस्ट मॉडेलवरून या एसयूव्हीचा बॉक्सी आणि मस्क्युलर लुक स्पष्टपणे दिसून येतो. तिची उंच रचना, जास्त ग्राउंड क्लिअरन्स आणि शॉट ओव्हरहँग्समुळे हिला जबरदस्त ‘रोड प्रेझन्स’ मिळतो. समोरच्या बाजूला ६-स्लॉट रेडिएटर ग्रिल, एलइडी हेडलाईट्स आणि सपाट बॉनेट देण्यात आले आहे.

बाजूच्या भागाचा विचार केल्यास यात मस्क्युलर व्हील आर्चेस, स्क्वेअर विंडोज, फ्लश-फिटेड डोअर हँडल्स आणि ५-डबल-स्पोक अलॉय व्हील्स पाहायला मिळतात. तसेच पाठीमागील बाजूस उघडणारे टेलगेट दिले असून त्यावर स्पेयर व्हील बसवण्यात आले आहे, जे हिला अस्सल ऑफ-रोडर लुक देते.

महिंद्राच्या या ५ आयकॉनिक ‘लिमिटेड एडिशन’ गाड्या तुम्हाला माहित आहेत का? पहा एका क्लिकवर

प्रीमियम फिचर्स आणि केबिन

या एसयूव्हीच्या इंटेरियरमध्ये व्हर्टिकल एसी व्हेंट्ससह अपराईट डॅशबोर्ड पाहायला मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात पॅनोरॅमिक सनरुफ दिलेला आहे, ज्यामुळे केबिन अतिशय हवेशीर आणि प्रीमियम वाटते.

याशिवाय या कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि वायरलेस स्मार्टफोन चार्जर यांसारखे आधुनिक फिचर्स मिळण्याची दाट शक्यता आहे.

महिंद्राच्या चाकणमधील कारखान्यातून ३० लाख वाहनांचे उत्पादन पूर्ण, ‘BE 6’ च्या रोल-आउटसह ऐतिहासिक विक्रम पूर्ण

सुरक्षा आणि इंजिन क्षमता

सुरक्षेच्या दृष्टीने महिंद्रा या एसयूव्हीमध्ये ६ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा सिस्टीम आणि ADAS सारखी फीचर्स देऊ शकते.

ही एसयूव्ही महिंद्राच्या नवीन ‘NU_IQ’ मोनोकॉक प्लॅटफॉर्मवर आधारित असून ती १.२-लीटर टर्बो-पेट्रोल आणि १.५-लीटर टर्बो-डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

भारतीय बाजारातील स्पर्धा

ही नवी एसयूव्ही बाजारात आल्यानंतर तिची थेट स्पर्धा भविष्यात येणाऱ्या रेनो ब्रिज आणि टाटाच्या ‘स्कार्लेट’ या येणाऱ्या एसयूव्हीशी पाहायला मिळेल.

Web Title: Mahindra vision s high altitude testing spiti valley panoramic sunroof

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 08:10 AM

Topics:  

  • best suv cars
  • Mahindra
  • SUV cars

संबंधित बातम्या

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
1

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती
2

महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
3

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

2026 होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट लाँच; ₹11.80 लाखांपासून किंमत! 360-डिग्री कॅमेरा आणि ZX+ व्हेरिएंट अपडेट
4

2026 होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट लाँच; ₹11.80 लाखांपासून किंमत! 360-डिग्री कॅमेरा आणि ZX+ व्हेरिएंट अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.