Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अतिक्रमणमुक्त केलेल्या मुंबईल्या ५०० एकर जमिनींचा…”; Mangal Prabhat Lodha यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई शहरातल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनींवर आणि कांदळवनावर अतिक्रमण होत आहे. प्रामुख्याने शासनाच्या मोकळ्या जमिनींवर हे अतिक्रमण होत असून याला आळा घालणे गरजेचे झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 26, 2025 | 08:07 PM
“अतिक्रमणमुक्त केलेल्या मुंबईल्या ५०० एकर जमिनींचा…”; Mangal Prabhat Lodha यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

वाचनालये, अभ्यासिका, जिम,उद्याने आणि मनोरंजक केंद्र उभारणार 
उपनगर जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
मोकळ्या जमिनींवर अनधिकृत बांधकामामुळे समस्या 

मुंबई: एकीकडे मुंबईत मोकळी जागा शिल्लक नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे, तर दुसरीकडे सरकारी मोकळ्या जमिनींवर अनधिकृत बांधकाम झाल्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण ही होत आहेत. या स्थितीत अनधिकृत बांधकामाला प्रतिबंध करणे महत्वाचे असून मुंबईतील ५०० एकर जमिनींचा ताबा घेऊन जनतेसाठी त्या जमिनींचा वापर करणार असल्याचे मुंबई उपनगरचे सह पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई उपनगरातील अतिक्रमित जमीन सरकारच्या ताब्यात घेण्यासंदर्भात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलते होते.

मुंबई शहरातल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनींवर आणि कांदळवनावर अतिक्रमण होत आहे. प्रामुख्याने शासनाच्या मोकळ्या जमिनींवर हे अतिक्रमण होत असून याला आळा घालणे गरजेचे झाले आहे. मालाड – मालवणी परिसरात अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कडक कारवाई सुरु असून पहिल्या टप्प्यात ९ हजार वर्ग मीटर जमीन प्रशासनाने अतिक्रमणमुक्त केली आहे. मात्र मोकळ्या झालेल्या या जमिनीवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मंत्री लोढा यांनी म्हटले असून त्या जमिनींचा लवकरात लवकर ताबा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिले. तसेच मुंबई तल्या मानखुर्द, कुर्ला, गोवंडी या भागातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहे. त्या ठिकाणीही अधिकार्यांनी सरकारी जमिनींवरील अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम उभारावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Mumbai: मंत्री लोढांना धमकी देणारे अस्लम शेख अडचणीत; भाजपनेत्यांसह नागरिकांचा मालवणी पोलीस ठाण्यावर ठिय्या!

मुंबई शहर आणि उपनगर मिळून प्रथम दर्शनी हजारो एकर जमिनींवर अतिक्रमण असल्याचे दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने मुंबईकरांना प्राथमिक सुविधा देणेही प्रशासनाला अतिशय अवघड जात आहे. मात्र सध्या मोकळ्या असलेल्या जमिनी वाचवणे क्रमप्राप्त असल्याचेही ते म्हणाले. पहिल्यांदा मुंबई परिसरातील ५०० एकर मोकळ्या जमिनींची नोंद घेऊन त्यावर सेवाभावी आणि सामाजिक संस्थांना विधायक उपक्रम राबवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. त्या जमिनींवर क्रीडांगण, वाचनालय, व्यायामशाळा,अभ्यासिका या सारखे उपक्रम राबवता येतील.त्यामुळे शहरातल्या मोकळ्या जमिनी सुरक्षित राहतील,असेही मंत्री लोढा म्हणाले.

अतिक्रमणमुक्त मुंबईसाठी एक महत्त्वाचे पाऊल मुंबई शहर आणि उपनगरातील हजारो एकर सरकारी जमिनींवर अतिक्रमण झालेले आहे. हा पॅटर्न रोखायलाच हवा आणि आपली शहरं वाचवायलाच हवीत. त्यासाठीच मुंबई उपनगर जिल्ह्याचा सहपालकमंत्री या नात्याने पुढील वर्षात मुंबईतील ५०० एकर सरकारी जमिनी… pic.twitter.com/luZuVgqJrU — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) November 26, 2025

या बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सध्या मालाड आणि मालवणी परिसरात सुरु असलेल्या अतिक्रमण विरोधातील पहिल्या टप्प्यातील कारवाईची माहितीही यावेळी दिली. या परिसरात २८ अंगणवाड्यावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी मांस विक्री, पानटपरी, अन्य व्यवसायासह अनधिकृत बांधकाम करून त्या जागेचा कब्जा घेतला होता. त्या ठिकाणी कारवाई होत असताना कब्जा घेतलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश ही मंत्री लोढा यांनी यावेळी दिले.

MLA अस्लम शेखांविरुद्ध नागरिक एकवटणार; बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात मालवणीत मोर्चा

मालाड मालवणी परिसरात स्थानिक आमदाराचा वरदहस्त असल्याने मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे अवैध रित्या राहत असल्याचे निदर्शनाला आले आहे. अवैध आधारकार्ड ,रेशनिंग कार्ड वापरून ते घुसखोर मतदार यादीत नोंदणी करत आहेत. या भागात गेल्या दहा वर्षात मतदारांची संख्या दुपटीने वाढली असल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला. या घुसखोरीमुळे मुंबईच्या सुरक्षेला बाधा पोहचत असून त्यावर कठोर कारवाई करावी,असेही निर्देश मंत्री लोढा यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, मुंबई उपनगरातील मोकळ्या जमिनींची वर्गवारी करून त्या ठिकाणी लवकरात लवकर विधायक उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने प्रशासन कार्यवाही करेल असे यावेळी उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले. तसेच सरकारी जमिनीवर कब्जा केलेल्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील असेही पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांनी सांगितले.

 

Web Title: Mangal prabhat lodha said 500 acres of encroachment free land mumbai to used for public purposes mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:05 PM

Topics:  

  • illegal construction
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Maharashtra News: महाराष्ट्राची प्रतिमा धुळीला; महिला अत्याचार, भ्रष्टाचारानंतर कर्जबाजारीपणातही राज्य अव्वल
1

Maharashtra News: महाराष्ट्राची प्रतिमा धुळीला; महिला अत्याचार, भ्रष्टाचारानंतर कर्जबाजारीपणातही राज्य अव्वल

BMC Election: मुंबईतील मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; निवडणूक आयोगाची कबुली
2

BMC Election: मुंबईतील मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; निवडणूक आयोगाची कबुली

26/11 Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम
3

26/11 Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”
4

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.