मंत्री मंगल प्रभात लोढा (फोटो- सोशल मीडिया)
रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात उद्या मालवणीत मोर्चा
शेख यांच्या घरासमोर स्थानिक नागरिक एकवटणार
अस्लम शेख यांनी मंत्री लोढा यांना दिली धमकी
मुंबई/Mangal Prabhat Lodha: बांगलादेशी आणि रोहिंग्यांची मुंबईत मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असून या विरोधातील लढा आता अधिक तीव्र होत आहे. यासंदर्भात मालवणी मध्ये स्थानिक नागरिक उद्या रविवार 23 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मालवणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार आहेत. तसेच स्थानिक काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या घरावरही मोर्चा नेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरणारे मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी संपवण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समाज माध्यमात चर्चिले जात आहे. यासंदर्भात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे पत्र लिहून तक्रार देखील केली आहे.
दरम्यान अस्लम शेख यांच्या धमकी नंतर अनेक स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. या मोर्चाच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांनीही आता घुसखोर बांग्लादेशीं विरोधातील मोहिमेत सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या मंत्र्यांना संपवण्याची धमकी देणे हे अतिशय गंभीर असून यावर कडक कारवाईची मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमितजी साटम यांनी केली आहे. घुसखोर बंगलादेशी आणि रोहिंग्यांना वसवून त्यांच्या मतांवर आमदारकीचा मिळवण्याचा नाव मालवणी पॅटर्न राबवला जात असून , आम्ही आता हा पॅटर्न उखडून फेकणार आहोत, या शब्दात साटम यांनी आपला संताप व्यक्त केला होता.
Mangal Prabhat Lodha: ४५ ‘आयटीआय’मध्ये सुसज्ज प्रयोगशाळा अन् 8 हजार…; Toyota सोबतचा करार काय?
अस्लम शेख यांची मंत्री लोढा यांना धमकी
राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा सातत्याने मुंबईच्या सुरक्षेबाबत भाष्य करत असतात. तसेच ते सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान याच कारणावरून मुंबईमधील कॉँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांना संपवण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले मंत्री लोढा?
मालाड मालवणीचे आमदार अस्लम शेख यांनी मला व माझ्या कुटुंबाला दिलेल्या धमकी विरुद्ध कारवाई करण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्त श्री देवेन भारती जी यांना पत्राद्वारे केली. आमदार अस्लम शेख सारख्या विघटनवादी शक्तींनी कितीही धमक्या दिल्या तरी देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर कसलीही तमा न बाळगता रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात कठोर कारवाईचा पाठपुरावा करत राहणार आहे.
जीवे मारण्याची धमकी मिळताच मंत्री लोढा आक्रमक; म्हणाले, “अस्लम शेख सारख्या विघटनवादी…”
अमित साटम यांनी व्यक्त केला संताप
मालाड – मालवणीचे आमदार हे सातत्याने रोहिंगे आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीला प्राधान्य देऊन त्यांनी मालवणी पॅटर्न राबवला आहे. चौक सभा घेऊन त्यांनी दिलेल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. उलट त्यांचा मालवणी पॅटर्न आम्ही मुळापासून उपटून टाकणार आहोत,असा संताप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला आहे. मंत्री लोढा यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई करावी.






