Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोज ठवकर मृत्यू प्रकरण: राजकीय दबावानंतर पोलिस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई; तपास ‘सीआयडी’कडे

नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर (Manoj Thawkar) या तरुणाचा मृत्यू झाल्या प्रकरणी पीएसआयसह (PSI) तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त (Nagpur Police Commissioner) अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 19, 2021 | 05:37 PM
मनोज ठवकर मृत्यू प्रकरण: राजकीय दबावानंतर पोलिस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई; तपास ‘सीआयडी’कडे
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर (Manoj Thawkar) या तरुणाचा मृत्यू झाल्या प्रकरणी पीएसआयसह (PSI) तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त (Nagpur Police Commissioner) अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विरोधी पक्ष नेते (Opposition leader) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनीही मनोज ठवकर मृत्यू प्रकरणी आरोपी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीत सात जुलैच्या रात्री ही घटना घडली होती. आधी तिघा पोलिसांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. मात्र आता पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मास्क न घातल्यामुळे तीन पोलिसांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे. मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून कारवाईची मागणी केली होती.

[read_also content=”शौर्याचं कौतुकच! चिमुकल्या मुलांमुळे वाचले आईचे दागिने; चोराचा ३ कि.मी. पर्यंत केला पाठलाग https://www.navarashtra.com/latest-news/mother-jewelry-saved-by-children-the-thief-3-km-chased-up-to-nrat-158044.html”]

काय आहे प्रकरण?
35 वर्षीय मनोज ठवकर हा दिव्यांग होता. मेकॅनिक म्हणून तो नागपुरात काम करत होता. नागपूर शहरातील पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात सात जुलैच्या रात्री पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. रात्री साडेआठ-नऊ वाजताच्या सुमारास मनोज या मार्गाने घरी चालला होता. मनोजची दुचाकीही थांबवण्यात आली, मात्र वेळीच ब्रेक न लागल्याने त्याची दुचाकी पोलीस वाहनावर धडकली.

पोलिसांच्या मारहाणीनंतर बेशुद्ध
मनोजने मुद्दाम धडक मारल्याचा पोलिसांचा समज झाला, असा दावा केला जातो. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे याच्यासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्येही नेण्यात आले. मात्र शुद्ध हरपलेल्या मनोज ठवकरला नागपुरातील भवानी मल्टिस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्याआधीच मृत घोषित करण्यात आलं होतं.

हॉस्पिटलबाहेर मोठा जमाव
पोलिसांच्या मारहाणीत मनोजचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर रुग्णालय परिसरात त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. मनोजच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना वीस लाख रुपयांची नुकसान भरपाई, पत्नीला सरकारी नोकरी आणि दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर खटला चालवण्याची मागणी जमावाने केली होती. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरल्यानंतर रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटल परिसरात तणाव होता.

Web Title: Manoj thavkar death case suspension of police sub inspector after political pressure investigation to cid nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2021 | 05:37 PM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • devendra fadnavis
  • Nitin Gadkari
  • Union Minister

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
2

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
3

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
4

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.