
meeting of Pune municipal officials was held in the context of the municipal elections 2026
Maharashtra Local Body Elections : पुणे : राज्यामध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल हाती येणार आहे. यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसह महानगर पालिकांचे अधिकारी देखील कामाला लागले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची अंतिम मूदत आता संपली आहे. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आयुक्त तथा शहर निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आयुक्त तथा शहर निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त निवडणूक प्रसाद काटकर यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेणेकरिता सर्व नोडल अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली. निवडणूक कामकाज प्रभावीपणे पार पाडण्याकरिता एकूण २४ विषयांकरिता नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून खालीलप्रमाणे नोडल अधिकारी यांनी आपल्या विषयाशी निगडीत कामकाजाबाबत प्रेझेन्टेशन देखील सादर केले.
हे देखील वाचा : PM Modi on Budget 2026: २०२६-२७ अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात; PM मोदी यांनी घेतली अर्थतज्ज्ञांची भेट
यामध्ये पालिका अधिकाऱ्यांनी खालील मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले. तसेच अधिकाऱ्यांनी देखील पुणे पालिका विना अडथळा पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. याबैठीमध्ये खालील मुद्द्यांवर चर्चा झाली.
त्याचप्रमाणे सर्व मतदान केंद्रावर ASSUARED MINIMUN FACILITIES पुरविण्यात येणार असून सर्व मतदान केंद्र साहित्य वाटप व स्विकृती केंद्र, मतमोजणी केंद्र या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी दिव्यांग मतदारांकरिता व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
सदर बैठकीमध्ये निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष प्रमुखांनी सर्व उमेदवारांनी दररोज विहित नमुन्यात दैनंदिन खर्च हा निवडणूक खर्च व्यवस्थापन पथकाकडे न चुकता सादर करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच याकरिता बाबनिहाय रेट लिस्ट देखील प्रसिद्ध करण्यात आल्याचे सांगितले.