Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहम्मद शमीच्या पदरी निराशा! संघात स्थान मिळवण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून होणार बाहेर

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या फिटनेसवर काम करणाऱ्या शमीबाबत असे म्हटले जात आहे की त्याच्या घोट्याची दुखापत पुन्हा झाली आहे. अशा स्थितीत तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर पडू शकतो.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 02, 2024 | 03:37 PM
Mohammed Shami's Disappointment Waiting to get a Place in The Indian team Border-Gavaskar will be out of the Trophy

Mohammed Shami's Disappointment Waiting to get a Place in The Indian team Border-Gavaskar will be out of the Trophy

Follow Us
Follow Us:

Mohammed Shami : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद शमीबाबत एक वाईट बातमी येत आहे. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकात आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून देणाऱ्या शमीच्या घोट्याच्या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्याची शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली आणि शमी मैदानात परतण्याच्या तयारीत होता. शमीही नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला. याशिवाय तो काही दिवसांपासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करीत होता. मात्र, त्याच्या फिटनेसशी संबंधित एक अपडेट समोर आली आहे.

घोट्याला सूज आल्याची तक्रार
रिपोर्टनुसार, शमीने पुन्हा एकदा त्याच्या घोट्याला सूज आल्याची तक्रार केली आहे ज्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशा परिस्थितीत शमीला पूर्णपणे बरा होण्यासाठी 6 ते 8 आठवडे लागू शकतात. यानंतर त्यांना त्यांचा फिटनेसही सिद्ध करावा लागेल. यावर्षी नोव्हेंबरमध्ये टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. अशा परिस्थितीत शमीचे या दौऱ्यासाठी जाणे अडचणीत येऊ शकते.

शमीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळायची होती इच्छा
शस्त्रक्रियेनंतर शमी बरा झाल्यावर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, दुलीप करंडक आणि इराणी चषकासाठी त्याला कोणत्याही संघात स्थान देण्यात आले नव्हते. अशा परिस्थितीत शमीला बंगालसाठी फक्त रणजी ट्रॉफीमध्ये खेळायचे राहिले होते, परंतु आता घोट्याच्या दुखापतीमुळे हे देखील कठीण दिसते आहे.
टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य
याशिवाय बीसीसीआयने असेही स्पष्ट केले आहे की, जर कोणत्याही खेळाडूला टीम इंडियामध्ये पुनरागमन करायचे असेल तर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे अनिवार्य असेल. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतल्याशिवाय कोणताही खेळाडू टीम इंडियामध्ये निवडीसाठी पात्र होणार नाही.

Web Title: Mohammed shamis disappointment waiting to get a place in indian team border gavaskar will be out of the trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • bcci
  • Border-Gavaskar trophy
  • cricket
  • india
  • Mohammed Shami
  • National Cricket Academy

संबंधित बातम्या

Red Fort Blast: अफगाणिस्तानात जाता आले नाही, म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? लाल किल्ला हल्ल्याच्या तपासात धक्कादायक खुलासे
1

Red Fort Blast: अफगाणिस्तानात जाता आले नाही, म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? लाल किल्ला हल्ल्याच्या तपासात धक्कादायक खुलासे

IPL Breaking: मोठा धमाका होणार! ‘हे’ झाल्यास पोरं नाय ऐकणार; 2028 मध्ये दोन नवीन संघ एन्ट्री घेणार?
2

IPL Breaking: मोठा धमाका होणार! ‘हे’ झाल्यास पोरं नाय ऐकणार; 2028 मध्ये दोन नवीन संघ एन्ट्री घेणार?

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या पक्षाला पाकिस्तानात 30 हजारांहून अधिक मते; तरीही निवडणुकीत पराभव!
3

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या पक्षाला पाकिस्तानात 30 हजारांहून अधिक मते; तरीही निवडणुकीत पराभव!

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर! कसोटी, वनडे अन् टी-20 साठी घोषणा; स्मृती मंधानाला मोठी जबाबदारी
4

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर! कसोटी, वनडे अन् टी-20 साठी घोषणा; स्मृती मंधानाला मोठी जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.