Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार श्रीकांत शिंदे काँगो प्रजासत्ताकामध्ये पाकिस्तानवर कडाडले; म्हणाले, “व्यापार आणि…”

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, जे जागतिक दहशतवाद आणि सीमा पार अतिवाद यांच्याविरुद्ध चालू असलेल्या राजनैतिक संपर्क मोहिमेचा भाग आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 26, 2025 | 09:55 PM
खासदार श्रीकांत शिंदे काँगो प्रजासत्ताकामध्ये पाकिस्तानवर कडाडले; म्हणाले, "व्यापार आणि..."

खासदार श्रीकांत शिंदे काँगो प्रजासत्ताकामध्ये पाकिस्तानवर कडाडले; म्हणाले, "व्यापार आणि..."

Follow Us
Close
Follow Us:

किनशासा: काँगो प्रजासत्ताक अनेक वर्षांपासून संघर्षग्रस्त भागात आहे. त्यांना माहित आहे की दहशतवाद, सीमापार दहशतवाद आणि प्रायोजित दहशतवाद याचा एखाद्या देशावर कसा परिणाम होतो. व्यापार आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत, तसेच व्यापार आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, असे प्रतिपादन भारताच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे प्रमुख शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आफ्रिकेतील काँगो प्रजासत्ताकमध्ये दाखल झाले. आज सोमवारी त्यांनी काँगो प्रजासत्ताकच्या मंत्र्यांशी भेटीगाठी घेऊन ऑपरेशन सिंदूर आणि भारताची दहशतवादविरोधातील भूमिका पटवून दिली.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, आज माझ्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काँगो लोकशाही प्रजासत्ताकाच्या परराष्ट्र राज्यमंत्री मा. थेरेस कायिकवांबा वॅगनर यांची भेट घेतली. या बैठकीत भारताने दहशतवादाविरोधात कसा लढा दिला आहे हे मांडले. आम्ही त्यांना देखील दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचा आमचा ठाम संदेश दिला. या बैठकीत भारताच्या दहशतवादाविरोधातील भूमिकेचा पुनरुच्चार केला. दहशतवादाच्या विरोधातील लढ्यात काँगो लोकशाही प्रजासत्ताक सरकारने भारताला पूर्ण पाठिंबा दिला.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, जे जागतिक दहशतवाद आणि सीमा पार अतिवाद यांच्याविरुद्ध चालू असलेल्या राजनैतिक संपर्क मोहिमेचा भाग आहे. आफ्रिकेतील महत्त्वाच्या राष्ट्रांबरोबर भारताच्या धोरणात्मक व जनसंपर्क संबंधांना बळकटी देण्यासाठी आणि दहशतवादाविरुद्ध जागतिक सहमती तयार करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ लोकशाही प्रजासत्ताक काँगो (DRC) देशाच्या दौऱ्यावर आहेत.

याआधी युएईमधील सर्व मान्यवर व मंत्र्यांची भेट घेतली. तिथे चांगला प्रतिसाद मिळाला. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचा आमचा संदेश युएईने खूप चांगल्या प्रकारे स्वीकारला आहे. युएईने गेली अनेक वर्षे भारतासोबत उभं राहून साथ दिली आहे आणि ती साथ भविष्यातही कायम राहील, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान

पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असून पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला, अशी घणाघाती टीका संयुक्त अरब अमिरात दौऱ्यावर गेलेले शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी यूएईमधील विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केली, यावेळी ते बोलत होते.

Shrikant Shinde : पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची घणाघाती टीका

यावेळी खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, आता संपूर्ण देशासाठी पाकिस्तानचं खरं रूप जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो आहे. जैश-ए-मोहम्मद किंवा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांची कार्यपद्धती एकसारखीच आहे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशवातवादी संघटनेने घेतली होती. मात्र पाकिस्तानच्या दबावानंतर त्यांनी ट्विट नष्ट केले. दहशतवादाने भारतालाच नाही तर यूएई, युके, अमेरिका अशा देशांना फटका बसला. जगाच्या पाठिवर असा एकही देश नाही ज्याने दहशतवादाचे परिणाम भोगलेले नाही, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

Web Title: Mp dr shrikant shinde criticizes to pakistan about terrorism in republic of congo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Shrikant Shinde : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज; राज्यभर 288 मतदारसंघांत BLA नियुक्तीवर भर
1

Shrikant Shinde : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज; राज्यभर 288 मतदारसंघांत BLA नियुक्तीवर भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.