crime (फोटो सौजन्य: social media)
नागपूर: नागपूरमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून प्रियकर पोलीस कर्मचारी व अन्य दोघांसह घरात शिरला आणि प्रेयसीच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही घटना लखडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रेयसीच्या आईला मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे.
Crime News : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला
नेमकं काय प्रकरण?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लकडगंज भागात राहणारी तरुणी मिहानमधील एका कंपनीत काम करते. याच कंपनीत तिचा प्रियकर अदनान काम करत होता. रविवारी सकाळी दोघेही गोरेवाडा परिसरात फिरायला गेले. दुपारी अदनान याने प्रेयसीला घरी सोडले. याबाबत तरुणीच्या आईला समजले. सायंकाळी तिचा पती व मुलगा घरी आले. या दोघांना तरुणीच्या आईने याबाबत माहिती दिली. कुटुंबीयांनी मुलीला फटकारले. दरम्यान रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तरुणीने अदनानच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्याला सांगितले की ‘कुटुंबीय मारहाण करीत आहेत, मला येथून घेऊन जा’ अशी ती म्हणाली.
त्यानंतर अदनान तीन साथीदारांसह लाकडगंजमध्ये आला. अदनानसह चौघे घरात घुसले. तरुणीच्या आईने विरोध केला तेव्हा अदनाने विनयभंग करीत तरुणीच्या आईला मारहाण केली. आईने आरडाओरड केल्याने नागरिक जमले. त्यांनी अदनानला मारहाण करायला सुरुवात केली. अन्य तिघे तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी अदनानला अटक केली. त्यानंतर अन्य तिघांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी तरुणीच्या प्रियंकारसह चौघांविरुद्ध विनयभंग, मारहाणीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. चौघांना दोन दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. प्रियकर अदनान खान, मुख्यालयात तैनात पोलिस कर्मचारी मोहसीन खान, माझ अमजद खान व मुद्दसीर शेख (सर्व रा. गिट्टीखदान), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
अल्पवयीन मुलीचा रस्त्यात गाठून विनयभंग
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला इस्टाग्रामवर वारंवार मॅसेज करून तसेच तिचा पाठलाग करून तिच्या भावाला मारहाण केली. त्याला हत्याराचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोहेल उमर शेख याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत मुलीच्या भावाला जेव्हा आरोपी धमकी देत होते, तेव्हा आजुबाजुला जमलेले लोक पाहात असताना लोकांसमोर हवेत हत्यार फिरवुन कोणी आमच्या जवळ आले तर एक एकाला मारून टाकून असे म्हणत दहशत देखील माजवली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. मागील चार वर्षापासून आरोपी हे पिडीत मुलीला त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भावाला मारहाण तसेच धमकावल्यानंतर पिडीत कुटूंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून वाद; एका विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार