हिसार (हरियाणा): काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे मुस्लिम समाजातील तरुणांना आजही सायकलींचे पंक्चर दुरुस्त करत उदरनिर्वाह करावा लागत आहे. देशभरात वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमीन आहे. या मालमत्तेचा उपयोग गरीब, असहाय्य महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी व्हायला हवा होता. जर या मालमत्तेचा योग्य वापर झाला असता, तर माझ्या मुस्लिम तरुणांना पंक्चर झालेल्या सायकली दुरुस्त करण्यात आपले आयुष्य घालवावे लागले नसते.” अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. हरियाणातील हिसार येथे बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
मोदी यांनी काँग्रेसवर संविधानाच्या भावनांशी प्रतारणा केल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, काँग्रेसने सत्तेत येण्यासाठी आणि राहण्यासाठी घेतलेल्या निर्णयांनी कोणाचेही भले झाले नाही. वक्फ कायद्याद्वारे काँग्रेसने मुस्लिम समाजातील कट्टरपंथीयांना खूश करण्याचा प्रयत्न केला. यामुळे गरीब आणि असहाय्य लोक वंचित राहिले. वक्फ कायद्याला संविधानापेक्षा वर मानणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा अपमान आहे. पण नवीन वक्फ कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणा म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा आणि संविधानाचा आदर आहे, असं सांगत त्यांनी नव्या कायद्याचे कौतुकही केले.
Ranjit Kasale on Bogus Encounter: कसा असतो बोगस एन्काऊंटर..? रणजित कासलेंचे थेट फडणवीसांवर आरोप
मोदी म्हणाले की, वक्फने निर्माण केलेले भूमाफिया आज दलित, मागासवर्गीय आणि गरीब लोकांच्या जमिनी लुटत आहेत. शेकडो विधवा मुस्लिम महिलांनी भारत सरकारला पत्रे लिहिली, त्यानंतरच हा कायदा चर्चेला आला. वक्फ कायद्यात बदल झाल्यानंतर गरिबांची लूट थांबणार आहे, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं. पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच मुस्लिम कट्टरपंथीयांना आनंदी ठेवण्यासाठी गरीब वर्ग दुःखात लोटून दिले. ‘काँग्रेसच्या तुष्टीकरणामुळे मुस्लिम समुदायालाही त्रास सहन करावा लागला आहे.’ काँग्रेसने फक्त काही कट्टरपंथीयांनाच खूश केले आहे. उर्वरित समाज दयनीय, अशिक्षित आणि गरीब राहिला. काँग्रेसच्या या दुष्ट प्रथेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे वक्फ कायदा, असा धडधडीत आरोपही त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान म्हणाले की, व्होट बँकेसाठी काँग्रेसने २०१३ मध्ये वक्फ कायद्यात अशी दुरुस्ती केली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २०१३ पर्यंत वक्फ कायदा लागू होता, परंतु निवडणुका जिंकण्यासाठी, तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी, मतपेढीच्या राजकारणासाठी, २०१३ च्या शेवटच्या अधिवेशनात काँग्रेसने इतक्या वर्षांपासून लागू असलेल्या वक्फ कायद्यात घाईघाईने सुधारणा केल्या, जेणेकरून निवडणुकीत मते मिळतील. मतपेढीला खूश करण्यासाठी, हा कायदा अशा प्रकारे बनवण्यात आला की बाबा साहेब आंबेडकरांचे संविधान उद्ध्वस्त झाले! ते संविधानापेक्षा वरचढ ठेवले. हा बाबा साहेबांचा सर्वात मोठा अपमान होता.
New Waqf Act : ‘वक्फ’नुसार पहिली कारवाई! मध्य प्रदेशात बेकायदेशीर मदरसा स्वतःहून पाडला
जर काँग्रेस इतकी मुस्लिम समर्थक आहे, तर ती एका मुस्लिम व्यक्तीला आपला अध्यक्ष का बनवत नाही. ‘ते म्हणतात की त्यांनी ते मुस्लिमांच्या हितासाठी केले.’ मी त्यांना विचारू इच्छितो, मी या मतपेढीच्या भुकेल्या राजकारण्यांना सांगू इच्छितो – जर तुमच्या मनात खरोखरच मुस्लिमांबद्दल थोडीशीही सहानुभूती असेल, तर काँग्रेस पक्षाने एका मुस्लिमाला आपला अध्यक्ष बनवावे. ते का करत नाहीस? ते संसदेत तिकीट देतात, ५०% मुस्लिमांना द्या, जर ते जिंकले तर ते त्यांची बाजू सांगतील. पण ते हे करणार नाहीत. त्यांच हेतू कधीही कोणाचेही भले करण्याचा नव्हता, अगदी मुस्लिमांचेही भले करण्याचा नव्हता. हे काँग्रेसचे सत्य आहे.