Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून
Nashik Kumbh Mela Tender Scam: केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
Nashik Kumbamla Scam: नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावावर बनावट ऑफलाईन निविदा व वर्क ऑर्डर तयार करून तब्बल ५०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या कथित रॅकेटमध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील दोन आणि धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती स्वतः कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
स्वतंत्र कुंभमेळ्यासाठी शासनाने प्राधिकरण स्थापन केले असून, त्यात पाच आयएएस अधिकारी कार्यरत आहेत, त्यामुळे कुंभमेळ्याशी संबंधित निविदा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होत असताना, या कथित टोळीने प्रशासनाच्या नावाचा गैरवापर करून बनावट ऑफलाईन ऑर्डर्स तयार केल्याचे समोर आले आहे.
11 Aug 2026 05:59 PM (IST)
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील विविध भागांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
१३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तर १४ ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील परिस्थिती, त्यावेळी नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या यातना आणि फाळणीमुळे झालेल्या परिणामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
याचबरोबर १४ ऑगस्ट रोजी तिरंगा रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. देशभक्तीची भावना जागृत करणे आणि नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, कल्याण जिल्हा भाजपच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व भागांमध्ये हे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.या संदर्भात कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब,केडीएमसी उपमहापौर राहुल दामले,, भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि केडीएमसीचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषद घेत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
11 Aug 2026 05:48 PM (IST)
वसई-विरार महानगरपालिका परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज आंदोलन पुकारलं. वसई पूर्वेकडील सातिवली येथील मनपा बस डेपोमध्ये बसगाड्या उभ्या करून कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. मोठ्या संख्येने परिवहन कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
व्हीओ :
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वेतनवाढ, नियमानुसार ओव्हरटाईमचा मोबदला, रेस्टसह ८ तासांची ड्युटी आणि परिवहन सेवेत लागू असलेली बूम ठेका पद्धत तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चालक आणि वाहकांवर कामाच्या वेळी मानसिक आणि शारीरिक दबाव टाकला जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला. विविध कारणांवरून मनमानी पद्धतीने आर्थिक दंड आकारला जात असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणांसाठी जबाबदार असल्याचा आरोप असलेले महाव्यवस्थापक रवीकरण शेरेकर यांना पदावरून हटवण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
11 Aug 2026 05:36 PM (IST)
मिरा-भाईंदर महानगरपालिकेची पहिली CBSE शाळा सुरू करण्याऐवजी त्याच इमारतीतील वर्गखोल्या धनाढ्य खाजगी शिक्षण संस्थेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव समोर आल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाईंदर (पूर्व) येथील जुन्या आरक्षण क्र. 115 मधील पालिकेच्या नव्या शाळा इमारतीतील 24 वर्गखोल्या एन.एल. दालमिया शाळेला एका वर्षासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव 13 ऑगस्टच्या महासभेसमोर ठेवण्यात आला आहे.
हीच ती इमारत आहे जिथे महानगरपालिकेची पहिली CBSE शाळा सुरू करून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा 2023 पासून करण्यात आली होती. मात्र शाळा आजतागायत सुरू झालेली नाही.
महासभेच्या प्रस्तावानुसार, एन.एल. दालमिया शाळेच्या इमारतीला आग लागल्याने तात्पुरत्या स्वरूपात वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली असून त्यातून पालिकेला सुमारे 1.46 कोटी रुपयांचे वार्षिक भाडे मिळणार आहे.
11 Aug 2026 05:28 PM (IST)
केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या एका अल्पवयीन तरुणीला कथितरित्या गर्भवती असल्याचे सांगण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हिमोग्लोबिन कमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या या अल्पवयीन तरुणीच्या गर्भधारणेची चाचणी एक-दोन नव्हे, तर तीन वेळा करण्यात आल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर केडीएमसीच्या चाचणी करताना कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये करण्यात आलेल्या तपासणीतही गर्भधारणेचा अहवाल पॉझिटिव्ह आले मात्र बाहेरून प्रेग्नेंसी टेस्ट कुटुंबीयांनी चेक केला तर रिपोर्ट निगेटिव्ह होता ही मुलगी गर्भवती नाही या प्रकरणाचा खुलासा भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणात कारवाईची मागणी देखील केली आहे.या प्रकारामुळे अल्पवयीन तरुणीला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
11 Aug 2026 05:19 PM (IST)
टीव्हीस्टार गजाननबुवा पाटील यांनी स्वरबद्ध केलेली भजने सकाळी रेडिओवर वाजवली जात असतात. तर टीव्ही वर कार्यक्रम करणारे भजनी बुवा म्हणून त्यांचा आदराने भजनी क्षेत्रात उल्लेख होत असतो.कर्जत येथील श्री गजाननबुवा पाटील स्मारक येथे श्री भजनभूषण गजाननबुवा पाटील यांची ५५ वि गुरुपौर्णिमा शिष्यगण यांनी आयोजित केली होती.रायगड,ठाणे जिल्ह्यातून गजाननबुवा पाटील यांचे शिष्य उपस्थित होते आणि अनेक वर्षांनी प्रचंड मोठ्या संख्येने शिष्यगण गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला उपस्थित होते.पंचपदीने सायंकाळी पाच वाजता सुरु झालेली गुरुपौर्णिमा रात्री दहा वाजेपर्यंत सुरु होती.
11 Aug 2026 05:06 PM (IST)
माथेरान मध्ये पर्यावरण पूरक ई रिक्षा या कमी पडत असल्याची बोंब मारली जात आहे.पण माथेरान शहरातील एका तरुणीला रात्री दहा वाजता इ रिक्षा सेवा देत नसल्याचे लेखी निवेदन पालकांनी केले आहे. संबंधित तरुणीला उद्धट उत्तरे देणाऱ्या रिक्षाचालक याच्याबद्दल शिवसेना पक्षाच्या महिला संपर्कप्रमुख यांनी तक्रार करण्याची भाषा करून देखील संबंधित रिक्षाचालक मग्रूरपणे वागत राहिला.दरम्यान, इ रिक्षा चालक यांच्या मग्रुरीची दखल रिक्षा संघटना घेणार काय? असा प्रश्न निर्माण झाला असून माथेरान मध्ये रात्रभर इ रिक्षा सुरू असतात हे कोणत्या नियमाखाली सुरू आहे,पर्यटकांकडून जास्त पैसे घेऊन इ रिक्षा मधून सेवा दिली जात असल्याचे दिसून आल्याने विभागीय परिवहन अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे देखील लक्ष लागून राहिले आहे.
11 Aug 2026 04:42 PM (IST)
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरील वादाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कपिल सिब्बल यांच्या मते, शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेली फूट ही प्रत्यक्षात विधिमंडळ पक्षातील होती. ती मूळ राजकीय पक्षातील फूट म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. केवळ आमदारांच्या संख्येच्या आधारे राजकीय पक्षावर दावा करता येत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.
11 Aug 2026 04:37 PM (IST)
श्चिम बंगाल एसआयआर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे मत: सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) महत्त्वाच्या निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान पश्चिम बंगालमधील ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती, त्यांच्या अपीलांच्या निकालाबाबत माहिती द्यावी, असे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने काँग्रेसचे (INC) नेते अधीर रंजन चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. या याचिकेत पश्चिम बंगालच्या प्रत्येक तालुक्यात एसआयआर न्यायाधिकरणे स्थापन करण्याची आणि अपीलांचा वेळेवर निपटारा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
11 Aug 2026 04:32 PM (IST)
डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ११ ऑगस्ट २०२६पर्यंत ४,३८१ पुष्टी झालेली प्रकरणे आणि २,०११ पुष्टी झालेले मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. सध्याचा उद्रेक देशातील १७वा असून, मृतांचा आकडा २ हजारांच्या पुढे जाण्याचा वेग मागील उद्रेकांच्या तुलनेत अत्यंत जास्त आहे. विशेष म्हणजे १,००० वरून २,००० मृत्यू होण्यासाठी एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी लागला, ज्यामुळे या उद्रेकाच्या वेगाबाबत आरोग्य यंत्रणेत मोठी चिंता निर्माण झाली आहे.
11 Aug 2026 04:27 PM (IST)
राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या म्हणजेच आरटीओच्या आवारात लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. ही सर्व चार्जिंग स्टेशन सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकसित केली जाणार असून, यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.
11 Aug 2026 04:22 PM (IST)
यूपीएससी मेन्सची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षा २०२६ च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. ही परीक्षा २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. अहवालांनुसार, यूपीएससी मुख्य परीक्षेचे ॲडमिट कार्ड ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच परीक्षा सुरू होण्याच्या साधारण एक ते दोन आठवडे आधी जारी केले जाऊ शकते. जे उमेदवार प्रीलिम्स परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, तेच मुख्य परीक्षेसाठी ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकतील. त्यामुळे सर्व उमेदवारांना आयोगाची अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून ॲडमिट कार्ड जारी होताच ते वेळेवर डाउनलोड करता येईल.
11 Aug 2026 04:17 PM (IST)
वर्धा : अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांनी आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सोमवारी वर्ध्यात जोरदार आंदोलन केले. आयटक आणि सिटू संलग्न विविध संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चातून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत मागण्यांचे निवेदन साद केले. यावेळी बजाज चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.
11 Aug 2026 04:14 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांनी सध्या राजकीय वातावरण तापले आहे. प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याची चर्चा असून, ही बैठक तब्बल सहा तास चालल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीनंतर पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पदावरून हटवण्याबाबत प्रशांत किशोर यांनी सल्ला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. वाचा सविस्तर...
11 Aug 2026 04:12 PM (IST)
क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ब्लिंक इट’च्या एका गोदामातील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA ) कारवाई केली आहे. कंपनीने मालाड वेस्ट मधील डार्क स्टोरचे फूड लायसंस सस्पेंड केले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एफडीएच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान स्टोरमध्ये असंख्य झुरळं, एक्सपायर फूड स्टॉक आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. विभागाने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई फक्त एका स्टोरवर करण्यात आली असून ब्लिंकिटच्या संपूर्ण फ़ूड ऑपरेशनला निलंबित करण्यात आलेलं नाही.
11 Aug 2026 04:07 PM (IST)
कर्जत तालुक्यातील विद्यार्थिनींच्या व्हायरल व्हिडिओमुळे खांडपे-कोंडिवडे रस्ता देशात पोहचला होता. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुरुवात केली आहे. या रस्त्याची केवळ तात्पुरती दुरुस्ती करून घेतली जात असून पावसाळा थांबल्यावर रस्त्याचे मजबुतीकरण केले जाईल, असे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले आहे.
11 Aug 2026 04:03 PM (IST)
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरने मंगळवारी (११ ऑगस्ट) आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कोलाघाट येथे उतरवावे लागले. मुख्यमंत्री दमदमहून केशपूरला जात होते, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून पायलटने हेलिकॉप्टर कोलाघाट येथील एका मोकळ्या मैदानात उतरवण्यात आले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
11 Aug 2026 04:03 PM (IST)
लवकरच राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक घेणार आहेत. त्याचसोबत नवनियुक्त अध्यक्ष आणि सृजन संघटनेचीही बैठक आणि शिबीर स्वतः राहुल गांधी घेणार आहेत.
11 Aug 2026 04:02 PM (IST)
खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मध्य रेल्वे प्रशासनाला आदेश
-नवी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांचा होणार प्रवास सुखकर
-ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड्स-दरावे आणि बेलापूर या स्थानकांची देखभाल व दुरुस्ती बरोबरच मुलभूत सुविधा आता मध्य रेल्वे प्रशासन देणार
11 Aug 2026 02:56 PM (IST)
अकोल्यात एकनाथ शिंदे शिवसेनेकडून मोठा राजकीय मासा गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2024 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार असलेल्या डॉ. अभय पाटील यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोघांच्यात तासभर चर्चा झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अभय पाटील हे तब्बल 4 लाख 16 हजार मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिले होते. काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून वर्षभरापूर्वी डॉ. पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता.
11 Aug 2026 02:45 PM (IST)
पुण्यातील औद्योगिक विकासावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. चाकणमधून उद्योग बाहेर जाण्याच्या चर्चेवर त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी बैठका सुरू असल्याचे सांगितले. चाकणमधील रस्त्यांसाठी 100 ते 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
11 Aug 2026 02:36 PM (IST)
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहेत. त्यांचा हा दौरा सांगली जिल्ह्यात आला असता त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीतील कडेगाव येथून विटा शहराकडे त्यांचा ताफा निघाला असताना ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये मनोज जरांगे यांचे समर्थक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्यांना मनोज जरांगे यांनी स्वतः आपल्या कारमध्ये बसवून रुग्णालयात दाखल केलं आहे.
11 Aug 2026 02:24 PM (IST)
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक उगले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला असून, या व्हिडिओमध्ये राजकीय विरोधकांकडून होत असलेल्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे.
11 Aug 2026 02:15 PM (IST)
TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. भिवंडी पोलिसांनी सोलापूरमधील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्थेचा चालक प्रकाश पवार याला अटक केली. तपासात त्याने यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना विद्यार्थ्यांची कागदपत्रे दिल्याचे समोर आले. ही कागदपत्रे का पुरवली, याचा शोध पोलीस घेत आहेत. प्रकरणातील अटकसंख्या 16 झाली आहे.
11 Aug 2026 02:06 PM (IST)
गडचिरोलीतील साप-विंचू चावल्याने झालेल्या मृत्यूंच्या घटनांवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "मंत्र्यांच्या घरात साप-विंचू सोडा, मग मृत्यूचं भय कळेल," अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. आदिवासींच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही केली. दरम्यान, काँग्रेस संस्थाचालकांच्या आश्रमशाळांवर प्रश्न उपस्थित करत भाजपने राऊतांवर पलटवार केला.
11 Aug 2026 02:00 PM (IST)
गेल्या काही दिवसांत देशभरात विविध मुद्द्यांवरून विद्यार्थ्यांचे निदर्शने आणि विरोध प्रदर्शन पाहायला मिळाले, ज्यापैकी सर्वात चर्चेत राहिलेले आंदोलन म्हणजे नीट पेपर लीक प्रकरणाशी संबंधित आहे. देशात नीट विवाद झाल्यानंतर केंद्र सरकारने उच्च शिक्षण विभागात मोठे फेरबदल केले आहेत. याद्वारे वरिष्ठ आयएएस अधिकारी दीप्ति गौर मुखर्जी यांची उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
11 Aug 2026 01:55 PM (IST)
बहुतांश प्रोफेशनल्ससाठी गुगल सारख्या प्रतिष्ठित ग्लोबल कंपनीकडून सुमारे ५५ लाख रुपयांच्या पॅकेजची ऑफर मिळणे हा करिअरमधील एक मोठा सुवर्णकाळ मानला जाऊ शकतो. उत्तम पगार, आंतरराष्ट्रीय ब्रँडसोबत काम करण्याचा अनुभव आणि भविष्यातील करिअर ग्रोथची शक्यता या प्रकारच्या ऑफरला खूप आकर्षक बनवते. पण जास्त पगाराचा अर्थ नेहमीच उत्तम जीवन असा होतो का? नोएडा येथे काम करणाऱ्या एका टेक प्रोफेशनलच्या प्रकरणामुळे याच प्रश्नावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
11 Aug 2026 01:50 PM (IST)
देशातील मोठ्या आणि गजबजलेल्या रेल्वे स्थानकांवरील परवानाधारक पोर्टर्स असतात. तुमचं सामान घेऊन जाण्यासाठी त्यांची मदत होते. पण बऱ्याच वेळेला त्याच्या अरेरावीचे अनुभव तुम्हालाही आले असतील. तुमचं सामान त्यांच्या नजरेत जास्त मोठं झालं की मग ते आपली मनमानी करत वेगळं अतिरिक्त पैसे चार्ज करायला सांगायला सुरुवात करतात. हा अनुभव तर नेहमीचाच आता तर अशीच एक घटना घडली. त्यात 500, 1000 नाही तर तब्बल 4700 रुपये आकारले. ( Railway Porter Loot ) नेमका काय घडला हा प्रकार? समजून घेऊयात.
11 Aug 2026 01:45 PM (IST)
डिझेलच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्च आणि प्रक्रिया खर्चाचा वाढलेला भार लक्षात घेता राज्यातील सहकारी आणि खासगी डेअऱ्यांची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ मंगळवार, ११ ऑगस्टपासून लागू होणार आहे. यासोबतच दुग्धजन्य उपपदार्थांच्या किंमतीतही १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.
11 Aug 2026 01:40 PM (IST)
अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुननगर येथे झालेल्या खळबळजनक गोळीबाराच्या घटनेचा गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासात छडा लावला आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, घरमालक तथा निलंबित तलाठी विपूल भानुदास ठाकरे यानेच स्वतःच्या घरावर गोळीबार घडवून आणल्याचा बनाव रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक केली असून, मुख्य सूत्रधार विपूल ठाकरे पसार आहे. त्याचा शोध सुरू आहे.
11 Aug 2026 01:35 PM (IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील (India vs Sri Lanka Test 2026) दोन सामन्यांची टेस्ट मालिका १५ ऑगस्ट २०२६पासून सुरू होणार आहे. पहिला टेस्ट सामना श्रीलंकेतील गॉल येथे होईल. मालिकेपूर्वी भारतीय संघाने श्रीलंका XI विरुद्ध सराव सामनाही खेळला आहे. ही मालिका ICC World Test Championship 2025-27 चक्राचा भाग असल्याने दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. मालिकेतील प्रत्येक सामन्याचा WTC गुणतालिकेतील स्थानावर परिणाम होणार आहे.
11 Aug 2026 01:25 PM (IST)
माणगंगा नदीपात्रातील यात्रा पठाण परिसरातील बंधारा तोडल्याच्या प्रकरणावरून म्हसवडमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी प्रशासनाला दहा दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी म्हसवड येथील अपर तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
11 Aug 2026 01:15 PM (IST)
बारामतीमध्ये २३ वर्षीय तरुणीच्या अचानक झालेल्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एका तरुणासोबत बाहेर गेल्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि काही तासांतच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत्यूच्या काही वेळ आधी तिने आईशी फोनवर केलेले संभाषण आता या प्रकरणातील महत्त्वाचा भाग ठरले आहे. या फोनमध्ये संबंधित तरुण तिला एक गोळी देणार असल्याचे तिने सांगितल्याचा दावा आईने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.
11 Aug 2026 01:08 PM (IST)
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio ने त्यांच्या यूजर्ससाठी तीन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. हे तिन्ही रिचार्ज प्लॅन्स ओटीटी आणि डेटा बेनिफिट्सने सुसज्ज आहे. यासोबतच, या प्लॅन्समध्ये यूजर्सना 1 हजारहून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळणार आहे. जिओचे हे रिचार्ज प्लॅन्स अशा यूजर्ससाठी फायद्याचा ठरणार आहे, ज्यांना कमी खर्चात ओटीटी ॲप्स आणि लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस पाहिजे आहे. यासोबतच, यूजर्सना हाय स्पीड डेटा देखील मिळणार आहे. कंपनीच्या या तिन्ही प्लॅन्सबाबत जाणून घेऊया.
11 Aug 2026 01:02 PM (IST)
जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर दुचाकीवरून येऊन गोळीबार करत तिघांनी त्यांच्याकडील ११ लाख रुपये किंमतीचे २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यावसायिक त्यांच्या कारमध्ये होता तरीही चोरट्यांनी त्यांच्या खिडकीजवळ येऊन गोळी झाडली. गोळीबारात काच फुटून त्यांना लागली. गोळीबारात व्यवसायिक संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५०, रा. गावडेवाडी, शिरसवाडी, ता. शिरुर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या तोंडाला गोळी लागली आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संतोष यांचे चुलत बंधू दत्तात्रय गावडे (वय ५०) यांनी लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघा अनोळखी चोरट्यांविरुद्ध आर्म ॲक्टनुसार खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गावडेवाडी शिरसवाडी येथील पंडीत गावडे यांच्या बंगल्यासमोर घडली आहे.
11 Aug 2026 12:48 PM (IST)
पत्नीला तिच्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरताना पाहिल्यानंतर पतीने याबाबत विचारणा केली. तेव्हा मात्र, पतीला तिघांनी लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीनंतर त्याच्या खिशातील १८ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. लोहगाव परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गणेश अशोक रेड्डी (वय ३५), राजूराव धोत्रे (वय ४६) व रेखा (वय ३५, सर्व रा. बोपोडी) यांच्यावर लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेच्या पतीने तक्रार दिली आहे.
11 Aug 2026 12:36 PM (IST)
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते, पदपथ आणि इतर सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीच्या कामांना महापालिका प्रशासनाने गती दिली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्याच्या दृष्टीने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांच्या तक्रारींची वाट न पाहता सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करून आवश्यक कामांची स्वतःहून नोंद घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खड्डे बुजवताना कामाचा दर्जा, टिकाऊपणा आणि नागरिकांची सुरक्षितता याबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
11 Aug 2026 12:24 PM (IST)
पुण्यातील मुंढवा भागात रिक्षा चालक तरुणाला चार ते पाच जणांच्या टोळक्याने भरवस्तीत बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे, मुंढवा पोलिसांच्या अंसेवदनशीलतेचा नमुना मात्र, यावरून दिसून आला असून, याप्रकरणात पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे पोलिस किती संवेदनशील आहेत, हेही यावरून स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी पवन शिवाजी उबाळे (वय २७, रा. घोरपडी) असे मारहाण झालेल्या रिक्षाचालक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीचा प्रकार ७ ऑगस्ट रोजी दुपारी घोरपडी येथील बालाजीनगर येथे घडला आहे.
11 Aug 2026 12:12 PM (IST)
पुण्याचा मध्यभाग असलेल्या गणेश पेठ परिसरात वडापाव खरेदीसाठी गेल्यानंतर पायाला धक्का लागल्यावरून वाद झाल्यानंतर तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश पेठेतील डुल्या मारूती चौक परिसरात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे (वय २४, रा. गणेश पेठ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
11 Aug 2026 11:55 AM (IST)
जिल्हा बँकेची सोसायटी मतदारसंघातील ठराव प्रक्रिया पूर्ण झाली असून, जावळी तालुक्यातील ४९ पैकी ४८ सोसायटींचे ठराव होऊन मतदार निश्चित झाले आहेत. यामधील तब्बल 32 मतदार आत्तापासूनच बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून सहलीवर पाठवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी देखील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा बँकेत जाण्याचा मार्ग खडतरच दिसत आहे.
11 Aug 2026 11:45 AM (IST)
समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर रस्त्यात उभे असलेले वाहन म्हणजे मोठ्या अपघाताला निमंत्रणच ! त्यामुळे महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध परिवहन विभागाने आता कठोर कारवाईची भूमिका घेतली. वाहन बंद पडल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव थांबावे लागल्यास वाहन तात्काळ सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
11 Aug 2026 11:35 AM (IST)
अमेरिकेतील ह्यूस्टनमधून एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. येथील सुप्रसिद्ध फास्ट फूड ब्रँड Popeyes वर अत्यंत गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. कपलने दावा केला आहे की, पॉपईजचे फ्राईड चिकन ऑर्डर केले असता त्यांना आत काँडम आढळून आला. मुख्य म्हणजे फ्राय केलेल्या चिकनच्या आत या काँडमला ठेवण्यात आलं होतं ज्यामुळे खायला घेताना हा प्रकार उघडकीस आला.
11 Aug 2026 11:25 AM (IST)
दोन वर्षे टीम इंडियाच्या बाहेर राहिल्यानंतर सरफराज खानच्या पुनरागमनाची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. लोकांना वाटत असेल की रणजी ट्रॉफीमधील द्विशतक आणि १५-१७ किलो वजन कमी केल्यामुळे त्याला श्रीलंका दौऱ्यावर स्थान मिळाले. पण चित्र दिसते तितके स्पष्ट नाही.
11 Aug 2026 11:15 AM (IST)
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरात नगरपरिषद व शिक्षण विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे उड्डाण पुल ते जिल्हा परिषद मैदानपर्यंत भव्य ‘तिरंगा रैली’ चे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि भाजपच्या कार्यकत्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. देशभक्तीची भावना नागरिकांच्या मनात अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, एवढ्या मोठ्या आयोजनात सर्वसामान्य नागरिकांचा प्रतिसाद अत्यंत अत्यल्प राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
11 Aug 2026 11:07 AM (IST)
कामशेत येथून महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांच्या कारला शिरवळजवळ भीषण अपघात झाला. सातारा-पुणे महामार्गावर हॉटेल शिवालयसमोर मंगळवारी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत चार तरुणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
11 Aug 2026 11:00 AM (IST)
अमेरिकेतील ह्यूस्टनमधून एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. येथील सुप्रसिद्ध फास्ट फूड ब्रँड Popeyes वर अत्यंत गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. कपलने दावा केला आहे की, पॉपईजचे फ्राईड चिकन ऑर्डर केले असता त्यांना आत काँडम आढळून आला. मुख्य म्हणजे फ्राय केलेल्या चिकनच्या आत या काँडमला ठेवण्यात आलं होतं ज्यामुळे खायला घेताना हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने संतप्त जोडप्याने कंपनीवर खटला दाखल केला असून हे प्रकरण आता न्यायालयापर्यंत पोहचले आहे. कपलने या प्रकरात १५ लाख डाॅलर्सहून अधिक भरपाईची मागणी केली आहे. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत असून मोठ्या ब्रँडच्या खाद्यपदार्थात हा प्रकार आढळल्याने यूजर्समध्ये खळबळ उडाली आहे.
11 Aug 2026 10:55 AM (IST)
खरं तर, सरफराज खानचे टीम इंडियामधील पुनरागमन केवळ त्याच्या मेहनतीवरच नाही, तर नशिबावरही अवलंबून होते. अखेरीस, या उजव्या हाताच्या फलंदाजाचे नशीब त्याच्या बाजूने उभे राहिले. जेव्हा साई सुदर्शन निर्धारित वेळेत उजव्या पायाच्या बोटाच्या दुखापतीतून सावरू शकला नाही, तेव्हा निवड समितीकडे त्याची जागा भरण्यासाठी तीन पर्याय होते. सध्याच्या संघात, कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या व्यतिरिक्त, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद आणि सरफराज खान हे फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळण्यात सर्वात पारंगत आहेत. मात्र टीममध्ये सरफराज खानची वर्णी लागली.
11 Aug 2026 10:50 AM (IST)
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरात नगरपरिषद व शिक्षण विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे उड्डाण पुल ते जिल्हा परिषद मैदानपर्यंत भव्य ‘तिरंगा रैली’ चे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि भाजपच्या कार्यकत्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. देशभक्तीची भावना नागरिकांच्या मनात अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, एवढ्या मोठ्या आयोजनात सर्वसामान्य नागरिकांचा प्रतिसाद अत्यंत अत्यल्प राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
11 Aug 2026 10:44 AM (IST)
कामशेत येथून महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांच्या कारला शिरवळजवळ भीषण अपघात झाला. सातारा-पुणे महामार्गावर हॉटेल शिवालयसमोर मंगळवारी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत चार तरुणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
11 Aug 2026 10:30 AM (IST)
मिरा-भाईंदर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी अत्याचार केल्याचा, तर अन्य तीन जणांनी तिला मानसिक त्रास देत धमकावल्याचा गंभीर प्रकार काशिमिरा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी सहा जणांविरोधात पोक्सोसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.
11 Aug 2026 09:59 AM (IST)
मुंबई : महाराष्ट्रात अनधिकृत शाळांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांच्याविरोधातील शिक्षण विभागाची कारवाई मात्र अत्यंत संथ असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकूण ५२६ अनधिकृत शाळा आढळून आल्या आहेत. त्यापैकी केवळ १५५ शाळांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर ४२९ शाळांना दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्या असल्या, तरी केवळ ८ शाळांकडून दंड वसूल करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे.






