ना IPL, ना विजय हजारे ट्रॉफी; पृथ्वी शॉच्या करिअर धोक्यात; आकाश चोपडाने दिला मोलाचा सल्ला
Prithvi Shaw’s Career Downslide : एकेकाळी भारतीय क्रिकेटचा उगवता तारा मानला जाणारा पृथ्वी शॉ सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. मुंबईच्या निवड समितीने त्याला विजय हजारे करंडक संघातून वगळले होते. यापूर्वी, IPL 2025 च्या लिलावातही कोणतीही फ्रेंचायझी त्याच्यावर सट्टा लावायला तयार नव्हती. त्याच्या फिटनेस, जीवनशैली आणि वागणुकीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत असताना त्याची क्रिकेट कारकीर्द संकटात सापडली आहे.
पृथ्वी शॉच्या सध्याच्या स्थितीवर चिंता
भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने पृथ्वी शॉच्या सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. तो म्हणाला, ‘पृथ्वी शॉला आपला दृष्टिकोन आणि सवयी बदलाव्या लागतील. तसे झाले नाही तर त्याची कारकीर्द आणखी खाली जाऊ शकते. शॉला पुनरागमनाची संधी आहे, मात्र त्यासाठी त्याला कठोर परिश्रम करावे लागतील’ असेही आकाश चोप्राने सांगितले.
प्रशिक्षण सत्रे चुकवणे व रात्री उशिरा पार्ट्या
आकाश चोप्राने खुलासा केला की, पृथ्वी शॉ प्रशिक्षण सत्रे चुकवतो आणि रात्री उशिरा पार्ट्या करून सकाळी 6 वाजता हॉटेलमध्ये परततो. चोप्रा म्हणाले, ‘त्याच्या फिटनेस आणि कामाच्या नैतिकतेच्या गंभीर समस्या आहेत. मी माझ्या मुलीला सांगत होतो की, वयाच्या 19 व्या वर्षी त्याने भारतासाठी अंडर-19 विश्वचषक जिंकला. तो रणजी करंडक, दुलीप आणि कसोटी पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा एकमात्र खेळाडू आहे. IPLमध्ये पहिल्यांदा 1 करोड तर नंतर 7 करोड घेणारा असा तो खेळाडू आहे, आता त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये स्थान नाही. अशी वेळ त्याच्यावर का आली हे त्याने ओळखले पाहिजे.’
पृथ्वी शॉकडे प्रतिभा
आकाश चोप्राने पृथ्वी शॉकडून आशा व्यक्त केली. तो म्हणाला, ‘पृथ्वी शॉ हा एक पतित नायक आहे, पण त्याच्याकडे वय आणि प्रतिभा दोन्ही आहे. त्याला तंदुरुस्त राहावे लागेल आणि त्याचे करिअर वाचवण्यासाठी स्वत: ला बदलावे लागेल. मुंबई संघाबाहेर राहणे हा त्याच्यासाठी एक इशारा आहे. जर त्याने असे केले तर सुधारले नाही तर भविष्य खूप कठीण असू शकते.