बंगळुरूच्या प्रसिद्ध ‘द रामेश्वरम कॅफे’मध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी (Bengaluru Cafe Blast) मोठी अपडेट समोर येत आहे. रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी एनआयएने एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. शब्बीर असं या व्यक्तीचं नाव असल्याचं समोर आलं आहे. 1 मार्च रोजी रामेश्वरम कॅफेमध्ये IED स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटात नऊ जण जखमी झाले होते. अटक करण्यात आलेला माणूस हा मुख्य संशयिताचा साथीदार असल्याचं सांगण्यात येत आहे, जो स्फोटाच्या दिवशी कॅफेजवळील सुरक्षा कॅमेरा फुटेजमध्ये दिसत होता.
[read_also content=”मुंबईतील उच्चभ्र परिसरात वृद्ध महिलेची हत्या, फ्लॅटमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ https://www.navarashtra.com/crime/63-year-old-killed-in-mumbai-nepean-sea-road-area-nrps-514864.html”][read_also content=”मुंबईतील उच्चभ्र परिसरात वृद्ध महिलेची हत्या, फ्लॅटमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ https://www.navarashtra.com/crime/63-year-old-killed-in-mumbai-nepean-sea-road-area-nrps-514864.html”]
या स्फोटाचा तपास करताना एनआयएने हल्ल्यातील मुख्य आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये एनआयएलाही यश मिळालं आणि त्यांनी कॅफेच्या सीसीटीव्ही फुटेज, तसेच मेट्रो स्टेशन आणि बसेसच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली. याशिवाय मुख्य संशयिताची ओळख पटवण्यासाठी त्यांनी जनतेची मदत मागितली आणि माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आणि ओळखीची माहिती गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासनही दिले.
एनआयएने सीसीटीव्ही फुटेजची ओळख पटवताना आढळले की आरोपीने आपले कपडे बदलले आणि आपली ओळख लपवण्यासाठी बसमधून वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला. मात्र, या संदर्भातही आरोपी बल्लारीमार्गे पुण्याला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बंगळुरू शहरातील रामेश्वरम कॅफेचे कामकाज कडेकोट बंदोबस्तात पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करून, मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत आणि ग्राहक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी हँडहेल्ड डिटेक्टर वापरून ग्राहकांची तपासणी केली जात आहे.






