खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार, MPSC विद्यार्थी आंदोलन आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून जोरदार भूमिका मांडली. संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चात लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून २५० ते ३०० खासदार सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी विरोधकांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन केले.