Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गडकरींच्या लोकसभा उमेदवारी अर्जावर आक्षेप; सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा याचिकाकर्त्याचा मानस

केंद्रीय मंत्री (Union Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (the Nagpur Bench of the High Court) आव्हान देण्यात आल्यानंतर या याचिकेतील काही भाग वगळण्याचे आदेश उच्च न्यायालयाने....

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 17, 2021 | 05:54 PM
गडकरींच्या लोकसभा उमेदवारी अर्जावर आक्षेप; सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा याचिकाकर्त्याचा मानस
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur). केंद्रीय मंत्री (Union Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (the Nagpur Bench of the High Court) आव्हान देण्यात आल्यानंतर या याचिकेतील काही भाग वगळण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे याचिकाकर्त्यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात (the Supreme Court) जाणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे न्या. अतुल चांदुरकर आणि न्या. गोविंद सानप यांनी सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली.

[read_also content=”नागपूर/ पंढरपुरचे विठ्ठल मंदिर वारीसाठी उघडे करा; पालख्यांना मर्यादित संख्येने परवानगी द्यावी- विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन https://www.navarashtra.com/latest-news/open-the-vitthal-temple-of-pandharpur-for-wari-palkhis-should-be-allowed-in-limited-numbers-vishwa-hindu-parishad-agitation-nrat-157029.html”]

नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा उमेदवारी अर्ज भरताना खोटी माहिती सादर केली. त्यांनी आपल्या उत्पन्नासोबतच खासगी माहितीही चुकीची सादर केली. मतदारांना चुकीची माहिती दिल्याप्रकरणी त्यांची निवडणूक अवैध ठरवण्याची मागणी करणारी याचिका नफीस खान यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिकेतील काही मुद्दे वगळण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले होते.

दरम्यान, आज शुक्रवारी सुनावणी झाली असता याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले की, वगळण्यासाठी सांगण्यात आलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या मुद्यांवरूनच गडकरी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती सादर केल्याचे स्पष्ट होते. ते मुद्दे हटवल्यास याचिकाच निष्प्राण होईल. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती खान यांनी यावेळी दिली. त्याकरिता न्यायालयाने सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीधर पुरोहित यांनी बाजू मांडली.

वर्धेचे खासदार रामदास तडस आणि बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन वेगवेगळया याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्या असून खासदारांनी अर्ज दाखल करून या याचिका रद्द करण्याची विनंती केली. त्यावर न्या. अतुल चांदुरकर आणि न्या. गोविंद सानप यांनी सर्व पक्षकारांना सविस्तर ऐकण्याचे मत व्यक्त केले असून पुढील सुनावणी ३० जुलैला ठेवली आहे. धनराज वंजारी आणि बळीराम शिरसकर यांनी या याचिका दाखल केल्या आहेत.

रवी राणा यांनी मर्यादेपक्षा अधिक खर्च करून विधानसभा निवडणूक जिंकली. यासंदर्भात जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी खर्चाचा तपशीलाची चौकशी केली. यात राणा यांनी निवडणुकीत ४१ लाख ८८ हजार रुपये खर्च केल्याचे समजले. त्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भारतीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून कारवाई न करण्यात आल्याने सुनील भालेराव आणि सुनील खराटे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राणा यांची निवड अवैध ठरवण्याची विनंती केली.

Web Title: Objection to gadkari lok sabha candidature application petitioner intention to go to the supreme court nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2021 | 05:54 PM

Topics:  

  • High court
  • Lok Sabha Election
  • Nitin Gadkari
  • Ravi Rana
  • Union Minister

संबंधित बातम्या

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन
1

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन
3

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

Kabutar Khana News: “… हे अत्यंत महत्वाचं आहे; कबुतरखान्याच्या प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान
4

Kabutar Khana News: “… हे अत्यंत महत्वाचं आहे; कबुतरखान्याच्या प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.