झुंड सिनेमाचं खास स्क्रिनिंग नुकतच आमीर खानसाठी ठेवलं होतं यावेळी आमीरने परश्याला पाहिलं आणि तो त्याच्या प्रेमातच पडला. स्क्रीनिंगनंतर आमीर आणि आकाश ठोसरची भेट झाली या पहिल्याच भेटीत आमीरने आकाशला कडकडून मिठी मारली आणि आय लव्ह यू म्हणत त्याची पाठ थोपटली. एकप्रकारे आता आकाशने मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानलाही येडं लावलं आहे.
आकाश पुन्हा एकदा नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ (Jhund) या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.