Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवार साहेब, दारुवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच; पण…; आमदार अनिल बोंडेंचं शरद पवारांना खरमरीत पत्रं

पवार साहेब, (Sharad Pawar) मुख्यमंत्री (Chief Minister) फक्त तुमचचं ऐकतात. दारुवाल्यांसाठी (Drunkards) तुम्ही कळकळीने पत्र लिहिले. दारुवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच. किंबहुना दारुवाल्यांच्या आशीर्वादावरच तुमची मदार असेल. परंतु, महाराष्ट्रातील 150 लाख शेतकरी कुटुंब (150 lakh farming families in Maharashtra) अडचणीत आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 12, 2021 | 06:58 PM
पवार साहेब, दारुवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच; पण…; आमदार अनिल बोंडेंचं शरद पवारांना खरमरीत पत्रं
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती (Amaravati).  पवार साहेब, (Sharad Pawar) मुख्यमंत्री (Chief Minister) फक्त तुमचचं ऐकतात. दारुवाल्यांसाठी (Drunkards) तुम्ही कळकळीने पत्र लिहिले. दारुवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच. किंबहुना दारुवाल्यांच्या आशिर्वादावरच तुमची मदार असेल. परंतु, महाराष्ट्रातील 150 लाख शेतकरी कुटुंब (150 lakh farming families in Maharashtra) अडचणीत आहेत. शेतमजूर (Agricultural laborers) सुद्धा सरकारकडे आशेने पाहत आहेत. बारा बलुतेदारांनाही (Twelve Balutedars) जगण्यासाठी सरकारची मदतीची आवश्यकता आहे. या सर्वांजवळ दारुवाल्यांसारखी मालमत्ता (assets as the drunkards) नाही.

मा. शरदचंद्रजी पवार साहेब शेतकरी, शेतमजुरांच्यासाठीही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहाना….#आक्रोश_शेतकऱ्यांचा @PawarSpeaks @BJP4Maharashtra pic.twitter.com/3KoVPTxMwB

— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) May 11, 2021

या सर्व दुखीतांच्या पीडीतांच्या मदतीसाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहाना, अशी टीका आमदार आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रातून पत्रातून केली आहे.

पवार यांनी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. पवारांच्या या पत्रावर विरोधकांकडून प्रचंड टिका करण्यात येत आहे. भाजपचे आमदार आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनीही पवार यांना खरमरीत पत्र लिहून जोरदार टीका केली आहे.

[read_also content=”वृक्षरोपणाचा ध्यास/ जालना जिल्ह्यात वृक्षवल्लींची संख्या वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविला अनोखा उपाय; प्रति व्यक्तीमागे तीन झाडे लावण्याचा आदेश https://www.navarashtra.com/jalna-news-marathi/district-collector-suggests-unique-measures-to-increase-the-number-of-trees-in-jalna-district-order-to-plant-three-trees-per-person-nrat-127865/”]

अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना हे पत्रं लिहिलं आहे. हे पत्रं बोंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर अपलोड केलं आहे. तसेच या पत्रातून शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि बारा बलुतेदारांच्या समस्यांकडे पवार यांचे लक्ष वेधून घेत या वर्गासाठीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा आग्रह शरद पवार यांना केलेला आहे.

वीज बिल माफीसाठी तरी पत्रं लिहा
करोना काळातील घरगुती वीज बिल माफ करू. अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, पहिली लाट ओसरताच महावितरणने शेतकरी, शेतमजूर, आणि सामान्यांच्या घराची वीज कापण्यास निर्दयीपणे सुरुवात केली. विधानसभेत दिलेली वीज कापण्याची स्थगिती ऊर्जा मंत्र्यांनी उठवली. ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तोंडाला कुलूप लावले. आणि आता तर पुन्हा लॉकडाऊन लावला. मजुरी नाही, रोजगार नाही. रोजच्या खाण्यापिण्याचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे कोरोना काळातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांचे वीज बिल माफ करण्यासाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना एक पत्रं लिहाना, असं त्यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांसाठी तरी पत्रं लिहा
महाराष्ट्रातील शेतकरी या वर्षी संकटात आहेत. करोनामुळं कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. धान्य, कांदा, भाजीपाला सुद्धा विकता येत नाही. शेतातून माल काढूनही विकला जात नाही. काही काळासाठी तरी शेतकऱ्यांना विक्री करण्याची सवलत देण्यासाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहाना, असं सांगतानाच अवकाळीची नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला आणि १० हजार रुपये हेक्टरवर बोळवण केली.

अतिवृष्टीचे निकष लावून अवकाळीनं बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आलं. गेल्या दोन महिन्यांत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अवकाळी पाऊस, वादळं झालीत. शेतकऱ्यांचा कांदा, आंबा याचं अतोनात नुकसान झालं. परंतु सरकारनं साधी दाखलही घेतली नाही. या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Pawar saheb the drunkards will bless you but mla anil bondes letter to sharad pawar nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2021 | 06:58 PM

Topics:  

  • Liquor Dealers
  • Restaurants
  • Uddhav Thackeray
  • मुख्यमंत्री

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
3

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
4

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.