Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्रियंका गांधींना सन्मानाने सोडलं नाही तर उद्यापासून देशभर जेलभरो’ काँग्रेसचा इशारा

शात पुन्हा एकदा हुकूमशाही पाहायला मिळत आहे. मात्र, लोकच त्यांना त्यांची जागा दाखवणार आहेत. सध्या भ्रष्टाचाराचे आरोप असणारे मंत्री सत्तेत पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकारच्या काळ्या कायद्या विरोधात देश पेटलेला पहायला मिळत आहे. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 06, 2021 | 04:33 PM
‘प्रियंका गांधींना सन्मानाने सोडलं नाही तर उद्यापासून देशभर जेलभरो’ काँग्रेसचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथे पीडितांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्यांना आधी त्यांना नजरकैदे नंतर अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

सन्मानाने सोडले नाही तर उद्यापासून देशभर जेलभरो

नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ४ ऑक्टोबर १९७७ ला त्यावेळेसच्या जनता पार्टीने इंदिरा गांधींना अटक केली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती होत आहे. प्रियंका गांधी यांना अटक करून भाजपने ही पुनरावृत्ती केली आहे. त्यावेळेच्या जनता पार्टीची जी अवस्था झाली होती, आता तीच अवस्था भाजपची होणार आहे. प्रियंका गांधी यांना भाजपने सन्मानाने सोडले नाही तर आम्ही उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करणार आहोत, असे पटोले म्हणाले.

काळ्या कायद्या विरोधात देश पेटलेला

ते म्हणाले की, देशात पुन्हा एकदा हुकूमशाही पाहायला मिळत आहे. मात्र, लोकच त्यांना त्यांची जागा दाखवणार आहेत. सध्या भ्रष्टाचाराचे आरोप असणारे मंत्री सत्तेत पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकारच्या काळ्या कायद्या विरोधात देश पेटलेला पहायला मिळत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशला जाणार होते. त्यांनाही विमानतळावरून माघारी परतावे लागले. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार गांधी कुटुंबाला घाबरलेले दिसत आहे, असेही ते म्हणाले.

राज्यात भाजप मागे पडला आहे

राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केले. आतापर्यंत जो कल आपण पाहतोय ते पाहता भाजप मागे पडला आहे. अजून निकाल यायला वेळ आहे. पण काँग्रेस बऱ्याच जागेवर आघाडीवर आहे, असा दावा त्यांनी केला.

Web Title: Priyanka gandhi will not be released with honor but will be jailed across the country from tomorrow the congress warned nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2021 | 04:33 PM

Topics:  

  • Congress
  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi
  • Uttar Pradesh police

संबंधित बातम्या

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’
1

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाडा सज्ज; भाजप, काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये संघर्ष
2

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाडा सज्ज; भाजप, काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये संघर्ष

Bihar Election Result 2025: बिहारमध्ये मतमोजणी किती वाजता होणार सुरु? कुठे पाहता येईल LIVE निकाल? संपूर्ण माहिती घ्या जाणून
3

Bihar Election Result 2025: बिहारमध्ये मतमोजणी किती वाजता होणार सुरु? कुठे पाहता येईल LIVE निकाल? संपूर्ण माहिती घ्या जाणून

अजित पवार सत्तेसाठी लाचार, सत्ता सोडून ते राहू शकत नाहीत; हर्षवर्धन सपकाळांची टीका
4

अजित पवार सत्तेसाठी लाचार, सत्ता सोडून ते राहू शकत नाहीत; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.