
crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे: पुणे शहरात सातत्याने काही ना काही घटना या फसवणुकीच्या पाहायला मिळतात. अनेक जण सरकारी नोकरी लावून देतो अस सांगत आर्थिक फसवणूक करतात किवा अधिकारी असल्याच सांगत कागदपत्रांची अफरातफर करताना आपण पाहील आहे. पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पुण्यातील पोलीस आयुक्तालयात एक जण आयपीएस अधिकारी आहे अस सांगत आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटला आणि माझे मित्र पण आयपीएस आहेत अस सांगितलं. कोणत्या बॅचचा आहे अस विचारल्यावर त्याच पितळ उघड पडलं आणि तो बोगस अधिकारी असल्याचं समोर आल. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर वाघमोडे अस या बोगस अधिकाऱ्याच नाव आहे. तो मूळचा हा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील रहिवाशी आहे. तो पुणे पोलीस आयुक्तालयात गेला आणि या जाळ्यात अडकला. वरिष्ठ पोलिसांना तो नक्की का भेटला? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर बाता मारत असताना त्याच्यावर संशय आला आणि त्याला सध्या ताब्यात घेण्यात आल आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ बंडगार्डन पोलिसांत बोलवून घेतलं आणि ताब्यात दिल आहे. त्याच्यावर आता पोलीस चौकशी करत आहेत.
सागर वाघमोडे कशासाठी आयपीएस आहे सांगत होता?
तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. पुण्यात किती वर्षापासून आहे त्याचा व्यवसाय काय? याची माहिती सध्या पोलीस गोळा करत आहेत. मात्र त्याने पोलीस आयुक्तालयात येवून स्वतः आयपीएस अधिकारी आहे हे सांगणे हे धाडसाचे म्हणाव लागेल. मात्र तो खरच कोणत्या उद्देशाने आला होता हे तपासणे आता गरजेच आहे. पोलीस आयुक्तालयात येताना सर्वसामान्य व्यक्तींना गेटवर विचारल जात कोणाला भेटायचं आहे? काय काम आहे? मात्र अशा पद्धतीने फसवणूक करून थेट पोलीस आयुक्तलयात येत असतील तर हे धक्कादायक म्हणाव लागेल. तो खरच आयपीएस आहे अस सांगून कोणाची फसवणूक करतोय की त्याचा काय उद्देश होता याचा तपास आता केला जात आहे. मात्र आयपीएस असल्याचं सांगितलं आणि बाता मारत असताना स्वतःच जाळ्यात अडकला.
Uttar Pradesh Crime: मथुरेत वडील-मुलातील वादातून गोळीबार; आधी वडिलांची हत्या केली नंतर स्वतःवर…