उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. वडील आणि मुलाच्या झालेल्या वादातून गोळीबार झाला आहे आणि यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणातील मृतकांनी वडील आणि मुलगा हे प्रतिष्ठित बीडी व्यापारी असल्याचं सांगितलं जात आहे. ‘दिनेश बिडी वाले’ नावाचा त्यांचा एक व्यवसाय आहे. ही घटना शुक्रवारी (31 ऑक्टोबर) रात्री मथुरा येथील वृंदावन कोतवाली परिसरातील गोरा नगर कॉलोनीमध्ये घडली आहे. मृतकाचे नाव सुरेश चंद्र अग्रवाल आणि नरेश अग्रवाल असं आहे.
Pune Crime News: दौंडमध्ये मध्यरात्री दुहेरी दरोडा! लाखोंचा ऐवज लंपास, संपूर्ण घटना CCTV कैद
काय घडलं नेमकं?
संपूर्ण उत्तर प्रदेशात ‘दिनेश बीडी वाले’ नावाने हे कुटुंब प्रसिद्ध आहे. या व्यवसायाचे मालक सुरेश चंद्र अग्रवाल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आपल्या मुलासोबत त्यांच्या घरी होते. त्यावेळी, अचानक दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला आणि हा वाद इतक्या टोकाला पोहोचला की नरेशने आपली पिस्तूल बाहेर काढली आणि त्यातून गोळी चालवली. त्याच्या वडिलांच्या छातीत लागली. वडिलांनी गोळी लागल्याचं समजताच नरेशने आपल्या डोक्यात सुद्धा गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील लोक गोळा झाले. घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने दोघांना रामकृष्ण मिशन सेवाश्रम रुग्णालयात नेलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
तपास सुरु
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत वडील आणि मुलामध्ये कोणत्या तरी कारणावरून कौटुंबिक वाद झाला. त्यानंतर, नरेशने त्याचे वडील सुरेशवर गोळी झाडली. वडिलांना गोळी लागल्याने नरेशने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. आता या प्रकरणासंदर्भात कुटुंबियांची चौकशी केली जात असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीने उचलले टोकाचे पाऊल, ३५ वर्षीय तरुणाने पार्कमध्ये…
उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात एका पार्कमध्ये शुक्रवारी (31 ऑक्टोबर)ला घडली आहे. त्याने आत्मत्या करणाऱ्या आधी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्याने आत्महत्या करण्याचं कारण लिहिलं होत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी जवळपास ८ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मंगोलपुरीच्या नवारिया पार्कमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.






