उत्तरप्रदेश येथील बुलंदशहर जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या पतीसोबत मिळून आपल्या भाच्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत तरुणाला आपल्या मामीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे होते, असं सांगितलं जात आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास एक ३५ वर्षीय इमरान नावाचा तरुण शिकारपुर नगर परिसरातील आपल्या मामाच्या घरी गेला होता. तरुणाच्या मामाचं नाव जावेद असून त्याच्या मामीच नाव रुकसाना असल्याचे समोर आलं आहे. त्यावेळी, कोणत्या तरी कौटुंबिक कारणावरून इमरानचं त्याच्या मामी आणि मामासोबत भांडण झालं. आरोपी इमरानने त्याच्या मामीचा विनयभंग केला आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
Uttar Pradesh Crime: मथुरेत वडील-मुलातील वादातून गोळीबार; आधी वडिलांची हत्या केली नंतर स्वतःवर…
डोक्यावर हातोडीने केला वार
त्यानंतर, त्यांच्यातला वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात रुकसानाने तिच्या भाच्याच्या डोक्यावर हातोडीने वार केला. या हल्ल्यात इमरान गंभीररीत्या जखमी झाला. त्यानंतर, जावेदने सुद्धा इमरानवर चाकूने हल्ला केला आणि यामुळे त्याची प्रकृती आणखी बिघडली. या घटनेनंतर, दोन्ही आरोपींनी इमरानला गंभीररित्या जखमी झालेल्या अवस्थेत तिथे घरातच सोडलं. दरवाजाला बाहेरून कुलूप लावलं. यानंतर दोन्ही आरोपींनी शिकारपुर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वत:ला सरेंडर केलं. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
रुग्णालयात नेत असतांना वाटेत मृत्यू
पोलिसांना कळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजाचा कुलूप तोडून आत प्रवेश केला आहे. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात इमरानचा मृतदेह आढळला. त्यांनतर गंभीररीत्या जखमी झालेल्या तरुणाला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. इम्रानची प्रकृती नाजूक असल्या कारणाने तिथून त्याला मेरठ येथे रेफेर करण्यात आलं आहे. रुग्णालयात नेत असतांनाच पीडित तरुणाचा वाटेत मृत्यू झाला आहे. पोलिसांनी इमरानचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृतकाच्या कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे, आरोपी जावेद आणि मामी रुक्षणाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.






